Share Market Astrology: जानेवारीच्या ग्रहस्थितीचा शेअर मार्केटवर असा प्रभाव, 20 जानेवारीपासून सोन्याचे दर आणखी..
- Published by:Ramesh Patil
Last Updated:
Share Market Astrology: शेअर मार्केटसाठी नवीन वर्षाचा पहिला महिना कसा असेल याची अनेकांना उत्सुकता आहे. जानेवारी महिन्यामध्ये 14 तारखेला सूर्य मकर राशीत प्रवेश करेल. म्हणजेच मकर संक्राती साजरी होईल, वर्षाच्या सुरुवातीला चंद्र वृषभ राशीत असेल, तर महिनाअखेरीस मंगळ मकर राशीत गोचर करेल.
मुंबई : नवीन वर्ष 2026 सुरू झालं असून शेअर मार्केटसाठी नवीन वर्षाचा पहिला महिना कसा असेल याची अनेकांना उत्सुकता आहे. जानेवारी महिन्यामध्ये 14 तारखेला सूर्य मकर राशीत प्रवेश करेल. म्हणजेच मकर संक्राती साजरी होईल, वर्षाच्या सुरुवातीला चंद्र वृषभ राशीत असेल, तर महिनाअखेरीस मंगळ मकर राशीत गोचर करेल. बुधदेखील महिन्याच्या मध्यात मकर राशीत प्रवेश करेल. गुरू संपूर्ण महिना मिथुन राशीत असेल. शुक्र महिन्याच्या मध्यात मकर राशीत प्रवेश करेल, तर शनि मीन राशीत, राहू कुंभ राशीत आणि केतू सिंह राशीत स्थित असेल. या ग्रहस्थितीचा शेअर बाजारावर कसा परिणाम होईल, याविषयी ज्योतिष तज्ज्ञांनी दिलेली माहिती जाणून घेऊ.
महिन्याच्या सुरुवातीला शेअर बाजाराची स्थिती -
वर्ष 2026 च्या जानेवारी महिन्याची सुरुवात गुरुवार, पौष शुक्ल पक्ष त्रयोदशी तिथी आणि रोहिणी नक्षत्रात वृषभ राशीने होत आहे. महिन्याच्या सुरुवातीलाच शुक्र अस्त झाल्यामुळे हरभरा, ताग, जूट, मेंथॉल, तूर, धने, खसखस, लवंग, वेलची यासह सर्व प्रकारची तेले, चहा आणि कॉफी यांच्या किमतीत विशेष तेजी दिसून येईल. महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात म्हणजेच 6 जानेवारी रोजी रात्री 12:02 वाजता बुध पूर्वाषाढा नक्षत्रात प्रवेश करेल. याचा परिणाम तूर, उडीद, काळी मिरी, साखर, गूळ आणि जवसावर दिसून येईल. त्यानंतर भाव सामान्य होतील, मात्र मोहरी, गहू आणि वाटाणा यामध्ये तेजी कायम राहील.
advertisement
महिन्याच्या मध्यावर बाजाराची स्थिती -
महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात म्हणजेच 12 जानेवारी रोजी रात्री 03:59 वाजता शुक्र मकर राशीत प्रवेश करेल आणि 14 जानेवारी रोजी दुपारी 03:08 वाजता सूर्याचे मकर संक्रमण होईल. यामुळे सर्व प्रकारचे ड्रायफ्रूट्स, धातू, किराणा, लवंग, वेलची, रबर, सूत आणि तांदूळ यांच्या भावात चांगली वाढ पाहायला मिळेल. मोहरी, तीळ तेल, जवस, सोयाबीन, मेंथॉल आणि वनस्पती तूप यांच्या भावात सुरुवातीला मोठा बदल दिसणार नाही, मात्र नंतर हळूहळू भाव वधारतील.
advertisement
महिन्याच्या शेवटच्या टप्प्यात शेअर बाजार -
जानेवारीच्या तिसऱ्या आठवड्यात म्हणजेच 20 जानेवारी रोजी रात्री 02:50 वाजता शुक्र श्रवण नक्षत्रात प्रवेश करेल. याचा विशेष प्रभाव हिरव्या आणि पिवळ्या वस्तूंवर पडेल. उडीद, मोहरी, एरंडेल तेल, सरकी, भुईमूग, सोने, पितळ, तूर डाळ आणि हरभरा यांच्या किमतीत तेजी येईल. तसेच सोने, चांदी आणि सर्व धातूंच्या किमतीत मोठी उसळी येऊ शकते. लोखंड, स्टील, तांबे, जस्त, पारा, शिसे आणि प्लॅटिनम यासह किराणा वस्तू आणि कडधान्ये लवकरच तेजीच्या मार्गावर चालताना दिसतील.
advertisement
(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Jan 02, 2026 8:24 AM IST
मराठी बातम्या/राशीभविष्य/
Share Market Astrology: जानेवारीच्या ग्रहस्थितीचा शेअर मार्केटवर असा प्रभाव, 20 जानेवारीपासून सोन्याचे दर आणखी..








