Jaya Ekadashi 2026: गुरुवारी जया एकादशीचा शुभ संयोग; छोट्या उपायांनी सुख-समृद्धी, अफाट धन-दौलतीचे मानकरी
- Published by:Ramesh Patil
Last Updated:
Jaya Ekadashi 2026: एकादशीच्या दिवशी विष्णूची पूजा केली जाते. धार्मिक मान्यतेनुसार, विष्णू पूजनामुळे कुंडलीतील गुरु ग्रहदेखील मजबूत होतो. गुरु हा सुख, समृद्धी आणि ऐश्वर्याचा कारक आहे. जया एकादशीच्या दिवशी काही विशेष उपाय केल्यास करिअर आणि वैयक्तिक जीवनात सकारात्मक बदल घडून येतात.
मुंबई : हिंदू धर्मात प्रत्येक एकादशीचे विशेष महत्त्व आहे. जानेवारीच्या शेवटी जया एकादशी साजरी केली जाणार आहे. जया एकादशीचे व्रत दरवर्षी माघ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीला पाळले जाते. वर्ष 2026 मध्ये ही तिथी 29 जानेवारी रोजी येत आहे. या दिवशी भगवान विष्णूची पूजा केली जाते. धार्मिक मान्यतेनुसार, विष्णू पूजनामुळे कुंडलीतील गुरु ग्रह देखील मजबूत होतो. गुरु हा सुख, समृद्धी आणि ऐश्वर्याचा कारक आहे. जया एकादशीच्या दिवशी काही विशेष उपाय केल्यास करिअर आणि वैयक्तिक जीवनात सकारात्मक बदल घडून येतात.
केळीच्या झाडाची पूजा - जया एकादशीच्या दिवशी बृहस्पति म्हणजेच गुरू ग्रहाला मजबूत करण्यासाठी केळीच्या झाडाची पूजा करावी. सकाळी स्नान केल्यावर केळीच्या झाडाजवळ जाऊन धूप-दीप लावावा. त्यानंतर हळद आणि गूळ केळीच्या झाडाला अर्पण करावा. असे केल्याने देवगुरु बृहस्पतीचा आशीर्वाद मिळतो आणि धनधान्याची प्राप्ती होते.
मंत्राचा जप कसा करावा - एकादशीच्या दिवशी 'ॐ बृं बृहस्पतये नमः' या गुरु मंत्राचा जप करणे अत्यंत लाभदायक ठरते. कोणत्याही एकांत स्थळी बसून किमान 108 वेळा या मंत्राचा जप करणं लाभदायी ठरेल. यामुळे मानसिक शांती मिळते आणि कुंडलीतील गुरूचा अशुभ प्रभाव दूर होऊन शुभ फळे मिळू लागतात.
advertisement
पिवळ्या वस्तूंचे दान - जया एकादशीच्या शुभ दिवशी पिवळ्या रंगाच्या वस्तूंचे दान केल्याने सकारात्मक परिणाम मिळतात. या दिवशी हळद, हरभरा डाळ, पिवळे वस्त्र, केळी आणि केशर यांचे दान करावे. या दानामुळे कौटुंबिक आणि सामाजिक जीवनात आनंद निर्माण होतो. हा उपाय बृहस्पती देवा सोबतच भगवान विष्णूचा आशीर्वाद मिळवून देतो. जया एकादशीच्या दिवशी कपाळावर चंदन किंवा केशराचा टिळा लावणं खूप शुभ ठरेल. केशराचा टिळक लावल्याने बौद्धिक क्षमता वाढते आणि करिअर तसेच व्यवसायात प्रगतीचे योग जुळून येतात. गुरु ग्रह मजबूत करण्यासाठी या दिवशी धार्मिक पुस्तकांचे वाचन करणे आणि भगवान विष्णूच्या स्तोत्रांचे पठण करणे फायदेशीर ठरते.
advertisement
(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Jan 24, 2026 9:27 AM IST
मराठी बातम्या/राशीभविष्य/
Jaya Ekadashi 2026: गुरुवारी जया एकादशीचा शुभ संयोग; छोट्या उपायांनी सुख-समृद्धी, अफाट धन-दौलतीचे मानकरी










