तुमची आहे का मीन रास? नोव्हेंबरमध्ये मिळणार अनेक लाभ, इथं पाहा मासिक राशीभविष्य
- Published by:News18 Marathi
Last Updated:
प्रत्येकाला आपल्या भविष्याबद्दल जाणून घ्यायचं असतं. मीन राशीच्या लोकांना नोव्हेंबर कसा असणार इथं पाहा.
वर्धा, 30 ऑक्टोबर: एखादा दिवस, आठवडा किंवा महिना आपल्याला कसा जाईल हे जाणून घेण्याची अनेकांना इच्छा असते. आता ऑक्टोबर महिना संपून नोव्हेंबर सुरू होत आहे. त्यामुळे अनेकजण आपलं मासिक राशीभविष्य जाणून घेण्यास उत्सुक असतील. राशी चक्रातील शेवटची राशी म्हणजे मीन राशी होय. मीन राशीच्या मंडळींना नोव्हेंबर महिना नेमका कसा जाईल? मीन राशीच्या मंडळींना नोव्हेंबर महिन्यात कोणत्या अडचणींचा सामना करावा लागेल आणि कोणत्या चांगल्या गोष्टी घडतील या संदर्भात वर्धा येथील ज्योतिष अभ्यासक वैभव सालोडकर यांनी माहिती दिली आहे.
या गोष्टींकडे द्यावे लागेल लक्ष
मीनचे नोव्हेंबर महिन्यातील राशिभविष्य: मीन राशीच्या लोकांना या महिन्यात त्यांचे आरोग्य, करिअर, आर्थिक जीवन, प्रेम तसेच वैवाहिक संबंधावर अधिक लक्ष केंद्रित करावे लागेल. कारण राहू-केतू आणि शनी महाराजांची स्थिती तुमच्यासाठी प्रतिकूल आहे. स्वराशीत बाराव्या भावातील शनी तुम्हाला साडेसाती सुरू असल्याचे दर्शवतो. या महिन्यात तुमचे राशी स्वामी म्हणजेच देवगुरु गृहस्पती तुमच्या कुंडलीत दुसऱ्या भावात उपस्थित आहेत. गुरूंच्या या अनुकूल स्थितीमुळे या महिन्यात तुम्हाला अनेक लाभ मिळणार, परंतु पहिल्या आणि सातव्याबाबत राहू केतूच्या सहयोगामुळे तुम्हाला पैसे कमवण्यात आणि बचत करण्यात अडचणी येऊ शकतात.
advertisement
आरोग्याकडे द्यावे लागेल लक्ष
तुम्हाला तुमच्या व्यवसायिक जीवनात काही समस्यांचा सामना करावा लागू शकतो. जसे की, कामामध्ये अनेक आव्हाने येणे, अधिक त्रास होणे, अचानक नोकरी बदलणे, याशिवाय अचानक प्रवास देखील होऊ शकतात. याचा परिणाम तुमच्या जीवनशैलीवर होऊ शकतो. अशा परिस्थिती तुम्हाला तुमच्या आरोग्याकडेही लक्ष द्यावे लागेल, राहूच्या प्रभावामुळे मनात नकारात्मक विचार येणे, राग लवकर येणे, वाईट स्वप्न पडणे, मनात नकारात्मक विचार येणे, व्यसन, मांसाहार इत्यादींची इच्छा होणे, यासारख्या गोष्टी तुम्हाला जाणवतील, यावर नियंत्रण ठेवल्यास लाभ होऊ शकतो. मी पणातून होणारे वादविवाद टाळावे, जुन्या गुंतवणुकीतून लाभ होतील, पण नवीन गुंतवणूक करू नये. विद्यार्थ्यांनी पथ्य पाळावे, बाहेरचे खाऊ नये.
advertisement
कौटुंबिक जीवनात सकारात्मक परिणाम
16 नोव्हेंबरपासून द्वितीय आणि नवव्या भावाचा स्वामी मंगळ तुमच्या नवव्या भावात येणार यामुळं नातेसंबंध आणि कौटुंबिक जीवनात त्याचा सकारात्मक परिणाम दिसेल. म्हणजे या महिन्यात काही ग्रहांचा प्रतिकूल प्रभाव असल्यामुळे अडचणीतुन पुढे जाण्यासाठी आई भगवतीची कृपा आपल्याला हवी. त्यासाठी नियमित आपल्या कुलदैवतेची उपासना करावी आणि नित्य 108 वेळा हं हनुमतेय नमः हा मंत्रजप करावा किंवा किमान11 दिवस कुत्र्याला पोळी खाऊ घालावी, शुभ अंक 1 आणि शुभ रंग लाल, शुभ दिवस 4,5 आणि 26, 27असेल. असं जोतिष अभ्यासक वैभव सालोडकर सांगतात.
Location :
Wardha,Maharashtra
First Published :
Oct 30, 2023 5:17 PM IST
मराठी बातम्या/राशीभविष्य/
तुमची आहे का मीन रास? नोव्हेंबरमध्ये मिळणार अनेक लाभ, इथं पाहा मासिक राशीभविष्य







