Nag Panchami 2025: घर पितृदोष-कालसर्प दोषातून मुक्त होईल; नागपंचमी तिथीचा उपाय सर्वात प्रभावी

Last Updated:

Nag Panchami 2025: नाग पंचमीला नाग देवतेची पूजा केल्याने जीवनात सुख आणि समृद्धी येते अशी धार्मिक श्रद्धा आहे. अनेक लोकांच्या कुंडलीत कालसर्प दोष असतो, यासाठी शांती करण्याचा सल्ला तज्ज्ञ ज्योतिषी देतात.

News18
News18
मुंबई : हिंदू धर्मात नाग पंचमीला विशेष महत्त्व आहे. दरवर्षी श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षाच्या पंचमीला हा सण साजरा केला जातो. या दिवशी नागदेवता आणि शंभू महादेवाची विशेष पूजा केली जाते. नाग पंचमीला नाग देवतेची पूजा केल्याने जीवनात सुख आणि समृद्धी येते अशी धार्मिक श्रद्धा आहे. अनेक लोकांच्या कुंडलीत कालसर्प दोष असतो, यासाठी शांती करण्याचा सल्ला तज्ज्ञ ज्योतिषी देतात. आज २९ जुलै रोजी नागपंचमीचा सण साजरा केला जात आहे. तसेच, या दिवशी अनेक विशेष योगायोग जुळत आहेत. त्यानं या दिवसाचे महत्त्व आणखी वाढलं आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, या दिवशी नाग स्तोत्राचे पठण केल्याने कालसर्प आणि पितृ दोषांपासून सुटका मिळू शकते. कुटुंबात सुख आणि समृद्धी प्राप्त होते..
नागपंचमी 2025 तिथी - पंचांगानुसार, या वर्षी श्रावण शुक्ल पंचमी तिथी २८ जुलै रोजी रात्री ११:२३ वाजता सुरू होईल आणि ३० जुलै रोजी दुपारी १२:४५ पर्यंत असेल. या आधारावर नागपंचमीचा सण मंगळवार, २९ जुलै २०२५ रोजी साजरा केला जात आहे.
॥ नाग स्तोत्र ॥
ब्रह्म लोके च ये सर्पाःशेषनागाः पुरोगमाः।
नमोऽस्तु तेभ्यः सुप्रीताःप्रसन्नाः सन्तु मे सदा॥
advertisement
विष्णु लोके च ये सर्पाःवासुकि प्रमुखाश्चये।
नमोऽस्तु तेभ्यः सुप्रीताःप्रसन्नाः सन्तु मे सदा॥
रुद्र लोके च ये सर्पाःतक्षकः प्रमुखास्तथा।
नमोऽस्तु तेभ्यः सुप्रीताःप्रसन्नाः सन्तु मे सदा॥
खाण्डवस्य तथा दाहेस्वर्गन्च ये च समाश्रिताः।
नमोऽस्तु तेभ्यः सुप्रीताःप्रसन्नाः सन्तु मे सदा॥
सर्प सत्रे च ये सर्पाःअस्थिकेनाभि रक्षिताः।
नमोऽस्तु तेभ्यः सुप्रीताःप्रसन्नाः सन्तु मे सदा॥
प्रलये चैव ये सर्पाःकार्कोट प्रमुखाश्चये।
advertisement
नमोऽस्तु तेभ्यः सुप्रीताःप्रसन्नाः सन्तु मे सदा॥
धर्म लोके च ये सर्पाःवैतरण्यां समाश्रिताः।
नमोऽस्तु तेभ्यः सुप्रीताःप्रसन्नाः सन्तु मे सदा॥
ये सर्पाः पर्वत येषुधारि सन्धिषु संस्थिताः।
नमोऽस्तु तेभ्यः सुप्रीताःप्रसन्नाः सन्तु मे सदा॥
ग्रामे वा यदि वारण्येये सर्पाः प्रचरन्ति च।
नमोऽस्तु तेभ्यः सुप्रीताःप्रसन्नाः सन्तु मे सदा॥
पृथिव्याम् चैव ये सर्पाःये सर्पाः बिल संस्थिताः।
advertisement
नमोऽस्तु तेभ्यः सुप्रीताःप्रसन्नाः सन्तु मे सदा॥
रसातले च ये सर्पाःअनन्तादि महाबलाः।
नमोऽस्तु तेभ्यः सुप्रीताःप्रसन्नाः सन्तु मे सदा॥
(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
advertisement
view comments
मराठी बातम्या/राशीभविष्य/
Nag Panchami 2025: घर पितृदोष-कालसर्प दोषातून मुक्त होईल; नागपंचमी तिथीचा उपाय सर्वात प्रभावी
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement