Nag Panchami 2025: दिव्य योगात आज नागपंचमीचा सण! अशी करावी विधीपूर्वक पूजा, पहा नागमंत्र-मुहूर्त
- Published by:Ramesh Patil
Last Updated:
Nag Panchami 2025: नाग पंचमीच्या दिवशी विधीपूर्वक सापांची पूजा केल्याने कालसर्प दोष, नागदोष आणि सर्पदंश यासारख्या भीतींपासून मुक्तता मिळते असे मानले जाते. नाग पंचमीचे महत्त्व, पूजा पद्धत आणि पूजा वेळ जाणून घेऊया.
मुंबई : आज आपल्याकडे नाग पंचमीचा सण साजरा केला जाणार आहे. दरवर्षी श्रावण महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पाचव्या दिवशी नागपंचमीचा सण साजरा केला जातो. नाग पंचमीसोबतच आज श्रावणातील पहिल्या मंगळा-गौरीचं व्रत साजरं केलं जाईल. हिंदू धर्म आणि वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार नाग पंचमी हा एक अतिशय पवित्र आणि रहस्यमय सण आहे. नाग पंचमीच्या दिवशी सर्पांची पूजा करण्याची परंपरा आहे. सांगली जिल्ह्यातील बत्तीस शिराळा हे ठिकाण नागपंचमीसाठी प्रसिद्ध आहे. नाग पंचमीच्या दिवशी विधीपूर्वक सापांची पूजा केल्याने कालसर्प दोष, नागदोष आणि सर्पदंश यासारख्या भीतींपासून मुक्तता मिळते असे मानले जाते. नाग पंचमीचे महत्त्व, पूजा पद्धत आणि पूजा वेळ जाणून घेऊया.
नाग पंचमीचे महत्त्व -
श्रीकृष्णाने यमुना नदीत कालिया नावाच्या विषारी नागाचा पराभव करून लोकांचे रक्षण केले. हा दिवस श्रावण शुद्ध पंचमीचा होता, त्यामुळे त्या दिवसापासून नागपूजा प्रचारात आली असे मानले जाते. या दिवशी नागपूजा केल्याने सर्पभय दूर होते आणि विषबाधेचे संकट टळते, अशी श्रद्धा आहे.
तसेच महाभारतात राजा जनमेजयाच्या सर्पयज्ञाची कथा आहे. राजा परीक्षितच्या सर्पदंशामुळे झालेल्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी जनमेजयाने सर्पयज्ञ सुरू केला, ज्यात अनेक सर्पांचा नाश होत होता. तेव्हा आस्तिक मुनींनी हस्तक्षेप करून तो यज्ञ थांबवला आणि सर्पांना जीवदान दिले. ज्या दिवशी सर्पांना अभय मिळाले, तो दिवस नागपंचमी म्हणून साजरा केला जातो.
advertisement
ज्या व्यक्तींच्या कुंडलीत कालसर्प दोष असतो, त्यांनी नागपंचमीच्या दिवशी नागदेवतेची विशेष पूजा केल्यास या दोषाचा नकारात्मक प्रभाव कमी होतो असे मानले जाते.
नागदेवता भगवान शंकराच्या गळ्यात वासुकी नागाच्या रूपात वास करतात. त्यामुळे नागपंचमीला नागाची पूजा करणे, म्हणजे सगुण रूपातील शिवाची पूजा केल्याप्रमाणे आहे. असे केल्याने भगवान शिव प्रसन्न होतात आणि भक्तांच्या मनोकामना पूर्ण करतात. शिवाय श्रीहरी विष्णू शेषनागावर विसावतात, त्यामुळे सर्पांना दिव्य स्थान प्राप्त झाले आहे. नागपंचमीला सर्पांची पूजा करून शिव आणि विष्णू दोघांच्याही कृपाशिर्वादास पात्र होता येते, अशी श्रद्धा आहे.
advertisement
प्रकृती आणि पर्यावरणाशी संबंध:
शेतकऱ्यांचा मित्र: नाग आणि साप हे शेताचे रक्षणकर्ते आणि शेतकरी बांधवांचा मित्र मानला जातो. ते शेतातील उंदीर आणि इतर कीटकांना खाऊन पिकांचे रक्षण करतात, त्यामुळे शेतीत संतुलन राखण्यास मदत होते. या दिवशी नागांची पूजा करून त्यांचे संरक्षण करण्याचे महत्त्व अधोरेखित केले जाते.
नाग पंचमी २०२५ पूजा मुहूर्त - आज सकाळी ५:४१ ते ८:२३ पर्यंत नाग पंचमीची पूजा करावी. त्यानंतर करायची असल्यास सकाळी ८:३० ते दुपारी १२:१५ पर्यंत करा. या मुहूर्तात नाग देवतेची पूजा करणे खूप शुभ आणि फलदायी ठरणार आहे.
advertisement
नाग पंचमी २०२५ शुभ योग
नाग पंचमीनिमित्त अनेक शुभ योग तयार होत आहेत, ज्यामुळे आजचे महत्त्व आणखी वाढले आहे. यावेळी नाग पंचमीला शिवयोग, रवियोग, सिद्ध असे महायोग तयार होत आहेत. तसेच मिथुन राशीत शुक्र आणि गुरूच्या युतीमुळे गजलक्ष्मी राजयोग तयार होत आहे. त्याच वेळी कर्क राशीत सूर्य आणि बुध यांच्या युतीमुळे बुधादित्य योग तयार होत आहे.
advertisement
नाग पंचमी पूजा विधी
सकाळी लवकर स्नान करून नागाच्या मूर्तीची, चित्राची किंवा वाळू/माती/पिठाने बनवलेल्या नागाची पूजा करावी.
अभिषेक: नागदेवतेला दूध, पाणी, हळद, कुंकू, फुले, तांदूळ, दुर्वा इत्यादी अर्पण करावे.
नैवेद्य: लाह्या, बत्ताशे, पुरणाचे दिंड किंवा उकडीचे पदार्थ यांचा नैवेद्य दाखवावा.
मंत्र जप: 'ॐ नागदेवताय नमः' किंवा 'ॐ भुजंगेशाय विद्महे, सर्पराजाय धीमहि, तन्नो नागः प्रचोदयात्' या मंत्रांचा जप करावा.
advertisement
कथावाचन: नागपंचमीची कहाणी वाचावी किंवा ऐकावी.
उपवास: काही स्त्रिया या दिवशी उपवास करतात.
शुभकार्य टाळा: या दिवशी जमिनीची खोदकाम, नांगरणे, झाडे तोडणे आणि धारदार वस्तूंचा वापर करणे टाळावे असे मानले जाते.
advertisement
(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
July 29, 2025 7:01 AM IST
मराठी बातम्या/राशीभविष्य/
Nag Panchami 2025: दिव्य योगात आज नागपंचमीचा सण! अशी करावी विधीपूर्वक पूजा, पहा नागमंत्र-मुहूर्त


