advertisement

108 Names Of Lord Shiva: महादेवाची संपूर्ण 108 नावं! एकाहून एक सरस, बाळाचं नाव यातून ठेवू शकता

Last Updated:

108 Names Of Lord Shiva: शिव अष्टोत्तर शतनामावलीनुसार, शंभ महादेवाची १०८ नावे सांगितली आहेत. प्रत्येक नावाचा एक विशेष अर्थ आहे. त्यातून शंकराचे गुण आणि स्वरूप स्पष्ट होते. जाणून घेऊया भगवान शिवाच्या १०८ नावांबद्दल.

News18
News18
मुंबई : देवाधिदेव महादेवाची पूजा केल्यानं सर्व इच्छा पूर्ण होतात. सोमवार, शिवरात्री, महाशिवरात्री शिवाय श्रावणातील सर्व दिवस शिवपूजेसाठी शुभ असतात. भगवान शिव हे सर्वात सहज प्रसन्न होणारे देवता मानले जातात. ते सर्वात निष्पाप देवता म्हणूनच त्यांना भोलेनाथ म्हणतात. शिव प्राण्यांचाही देव आहे, म्हणूनच त्याला पशुपतीनाथ म्हणतात. महादेवाचे भक्त त्याला अनेक नावांनी हाक मारतात. तो काळाच्या पलीकडे आहे, तो महाकाल आहे. शिव अष्टोत्तर शतनामावलीनुसार, शंभ महादेवाची १०८ नावे सांगितली आहेत. प्रत्येक नावाचा एक विशेष अर्थ आहे. त्यातून शंकराचे गुण आणि स्वरूप स्पष्ट होते. जाणून घेऊया भगवान शिवाच्या १०८ नावांबद्दल.

महादेवाची 108 नावे आणि त्याचा अर्थ

1. शिव - कल्याणकारी, संगळ्यांचे मंगल करणारा.
2. महेश्वर - महान ईश्वर, सर्वांचा स्वामी.
3. शंभु - सुख आणि आनंद देणारा.
4. पिनाकी - पिनाक धनुष धारण केलेला.
5. शशिशेखर - मस्तकावर चंद्र विराजमान असणारा.
6. वामदेव - सुंदर आणि दयाळू स्वरूपाचे.
7. विरूपाक्ष - विचित्र नेत्राचे.
advertisement
8. कपर्दी - जटाजूट धारण केलेले.
9. नीलकंठ - निळाकंठ असलेला.
10. स्थाणु - स्थिर आणि अटल.
11. भक्तवत्सल - भक्तांप्रति प्रेम असणारा.
12. भव - संसाराचा सृष्टिकर्ता.
13. सर्व - सर्वव्यापी, सर्वकाही.
14. त्रिलोचन - तीन नेत्र असलेला.
15. शितिकंठ - शीतल कंठाचा.
16. शिवप्रिय - शिवाला प्रिय.
17. जटाधर - जटा धारण केलेला.
advertisement
18. कैलाशवासी - कैलास पर्वतावर निवास असणारा.
19. कपाली - कपाल धारण केलेला.
20. कामारी - कामदेवाचा नाश केलेला.
21. अंधकारिपु - अंधकार म्हणजे अज्ञानाचा शत्रु.
22. गंगाधर - गंगेला जटांमध्ये धारण केलेला.
23. ललाटाक्ष - मस्तकावर नेत्र असणारा.
24. कालकाल - काल म्हणजे मृत्युचाही काळ.
25. कृपानिधि - करुणेचे भंडार.
advertisement
26. भीम - भयंकर आणि शक्तिशाली.
27. परशुहस्त - हातात परशु धारण केलेला.
28. मृगपाणि - हातात हरण असणारा.
29. जटिल - जटाधारी.
30. कैलाशपति - कैलासाचा स्वामी.
31. कृत्तिवास - वाघाची खाल धारण केलेला.
32. पुराराति- पूर म्हणजे त्रिपुराचे शत्रु.
33. भगवान - सर्व ऐश्वर्याचे स्वामी.
34. प्रमथाधिप - गणांचे स्वामी.
advertisement
35. मृत्युंजय - मृत्युला जिंकलेला.
36. सूक्ष्मतनु - सूक्ष्म शरीराचा.
37. जगद्व्यापी - विश्व व्याप्त.
38. जगद्गुरु - विश्वगुरु.
39. व्यास - सर्वांना विस्तार देणारा.
40. सर्वज्ञ - सर्वज्ञानी.
41. विनय - विनम्रतेचं प्रतीक.
42. विश्वनाथ - विश्वाचा स्वामी.
43. वृषभ - नंदीचा स्वामी.
44. वृषध्वज - बैलाचे चिह्नाचा ध्वज.
advertisement
45. सुरवन्दित - देवतांकडून पूजीत.
46. सिद्धनाथ - सिद्धींचा स्वामी.
47. सिद्धिद - सिद्धी देणारा.
48. सर्वद - सगळं काही देणारा.
49. शर्व - सगळा संहार करणारा.
50. श्रीकंठ - सुंदर कंठ असणारा.
51. शितकंठ - शीतल कंठ असणारा.
52. कपिलमुनि - कपिल मुनी स्वरूप.
53. आयुर्द - आयु देणारा.
advertisement
54. आदिदेव - प्रथम देवता.
55. महादेव - देवांचा देव.
56. नन्दीश्वर - नंदीचा स्वामी.
57. नागभूषण - सापांनी सुशोभित.
58. निकुंभ - दुष्टांचा नाश करणारा.
59. सनातन - अनादी आणि अनंत.
60. अनन्तदृष्टि - अनंतदृष्टीचा.
61. आनन्द - आनंद देणारा.
62. धूर्जटि - भरपूर जटा असणारा.
63. चन्द्रमौलि - चंद्राला मस्तकवर धारण करणारा.
64. नित्य - शाश्वत आणि अनश्वर.
65. निराधार - विनाआधार स्वयंभू.
66. निराकार - आकार नसलेला.
67. आदिकर्ता - प्रथम सृष्टिकर्ता.
68. नागेन्द्र - नागांचा स्वामी.
69. अभयंकर - भीतीचा नाश करणारा.
70. पशुपति - सर्व प्राण्यांचा स्वामी.
71. दक्षाध्वरहर - दक्ष यज्ञाचा नाश करणारा.
72. हर- पाप हरण करणारा.
73. भुजंगभूषण - सर्पांनी अलंकृत.
74. भर्ग - भय नष्ट करणारा.
75. गिरीश - पर्वतांचा स्वामी.
76. गिरिशाय - पर्वतावर निवास करणारा.
77. जगन्नाथ - विश्वाचा स्वामी.
78. कुबेरमित्र - कुबेर मित्र.
79. मृत्युंजय - मृत्युवर विजय मिळवलेला.
80. कृत्तिवास - वाघाची खाल धारण करणारा.
81. पुराराती - त्रिपुरासुरचे शत्रु.
82. नित्यसुन्दर - सदा सुंदर.
83. महायोगी - महान योगी.
84. महेश - महान ईश्वर.
85. चराचरगुरु - चर, अचरचे गुरू.
86. ईशान - उत्तर दिशाचे स्वामी.
87. सहस्राक्ष - हजारो डोळे असणारा.
88. सहस्रपाद - हजार पाय असलेला.
89. अपवर्गप्रद - मोक्ष देणारा.
90. अनघ - पापरहित.
91. सदा शिव - सदा कल्याणकारी.
92. अनन्त - अनंत स्वरूप.
93. शान्त - शांत स्वरूप.
94. सर्वज्ञ - सर्व जाणणारा.
95. परमात्मा - सर्वोच्च आत्मा.
96. सोमसुन्दर - चंद्रासमान सुंदर.
97. सुरेश्वर - देवतांचे स्वामी.
98. महासेन - महान सेनेचा स्वामी.
99. वेदकर्ता - वेद रचणारा.
100. वरद - वरदान देणारा.
101. विश्वेश्वर - विश्व के ईश्वर.
102. त्र्यम्बक - तीन नेत्रवाला.
103. विश्वरूप - विश्वाचे स्वरूप.
104. वीरभद्र - वीरभद्राचे स्वामी.
105. विशालाक्ष - विशाल नेत्रांचा.
106. वृषांक - बैलाचे चिह्न असलेला.
107. वृषवाहन - बैलावरून स्वारी करणारा.
108. अहिर्बुध्न्य - सापांचा आधार असणारा.
(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
view comments
मराठी बातम्या/राशीभविष्य/
108 Names Of Lord Shiva: महादेवाची संपूर्ण 108 नावं! एकाहून एक सरस, बाळाचं नाव यातून ठेवू शकता
Next Article
Yuvraj Singh : खरा व्हिलन धोनी नव्हेच, त्या दोघांनी युवराज करिअर उद्ध्वस्त केलं, एक नाव वाचून पायाखालची जमीन सरकेल
खरा व्हिलन धोनी नव्हेच, त्या दोघांनी युवराज करिअर उद्ध्वस्त केलं, एक नाव वाचून पायाखालची जमीन सरकेल
  • युवराज करिअर कुणामुळे संपलं?

  • धोनी नव्हे तर या दोघांची नावे घेतली

  • धोनीने कठीण काळात युवराजला आधार दिला

View All
advertisement