advertisement

जॅकपॉट लागणार! शनी-मंगळाची युती 3 राशींसाठी ठरणार वरदान, फायनान्स-करिअरमध्ये होणार फायदा

Last Updated:

ज्योतिषशास्त्रामध्ये ग्रहांच्या हालचालींना अत्यंत महत्त्व दिले जाते. जेव्हा दोन परस्परविरोधी स्वभावाचे पण शक्तिशाली ग्रह एकत्र येतात, तेव्हा त्याचे परिणाम संपूर्ण सृष्टीवर आणि 12 राशींवर दिसून येतात.

News18
News18
Shani-Mangal Yuti : ज्योतिषशास्त्रामध्ये ग्रहांच्या हालचालींना अत्यंत महत्त्व दिले जाते. जेव्हा दोन परस्परविरोधी स्वभावाचे पण शक्तिशाली ग्रह एकत्र येतात, तेव्हा त्याचे परिणाम संपूर्ण सृष्टीवर आणि 12 राशींवर दिसून येतात. 2 एप्रिल 2026 रोजी ग्रहांचा सेनापती मंगळ मीन राशीत प्रवेश करणार आहे, जिथे न्यायदेवता शनिदेव आधीच विराजमान आहेत. सुमारे 18 महिन्यांनंतर मीन राशीत होणारी ही 'शनि-मंगळ युती' अत्यंत दुर्मिळ मानली जात आहे. जरी शनि आणि मंगळ हे एकमेकांचे शत्रू ग्रह मानले जात असले, तरी काही राशींसाठी ही युती 'वरदान' ठरणार आहे. विशेषतः 3 राशीच्या जातकांसाठी आगामी काळ प्रगतीचे नवे दरवाजे उघडणारा असेल.
मिथुन: करिअरमध्ये 'रॉकेट' सारखी गती
मिथुन राशीच्या लोकांसाठी ही युती दहाव्या स्थानी होत आहे. हे स्थान करिअर आणि प्रतिष्ठेचे मानले जाते. जे लोक स्वतःचा व्यवसाय करतात, त्यांना या काळात मोठे कंत्राट किंवा परदेशी व्यापारातून धनलाभ होऊ शकतो. नोकरीत असलेल्यांना वरिष्ठांचं पूर्ण सहकार्य मिळेल. गेल्या अनेक दिवसांपासून अडकलेली कामे मार्गी लागतील. तुमच्या कार्यशैलीचे कौतुक होईल आणि नवीन जबाबदाऱ्यांमुळे तुमची पदोन्नती होईल .
advertisement
सिंह: अचानक धनलाभ आणि मान-सन्मान
सिंह राशीच्या जातकांसाठी शनि-मंगळ युती अष्टम भावात होत असली तरी, मंगळ तुमचा 'योगकारक' ग्रह असल्याने त्याचे शुभ फळ मिळेल. वारसाहक्काने मिळालेली संपत्ती किंवा जुन्या गुंतवणुकीतून अचानक मोठा धनलाभ होण्याचे योग आहेत. आर्थिक चणचण दूर होईल आणि बँक बॅलन्समध्ये झपाट्याने वाढ होईल. समाजात तुमचा मान-सन्मान वाढेल. तुमच्या धैर्यामुळे आणि पराक्रमामुळे तुम्ही कठीण आव्हानांवर मात कराल. मात्र, घाईघाईत निर्णय घेणे टाळावे, जेणेकरून यशाचा मार्ग सुकर होईल.
advertisement
कुंभ: आर्थिक नियोजनात मिळणार यश
कुंभ राशीच्या लोकांसाठी ही युती दुसऱ्या भावात होत आहे. कुंभ राशीचा स्वामी स्वतः शनि असल्याने हा काळ तुमच्यासाठी भाग्यकारक ठरेल. एकापेक्षा जास्त मार्गांनी पैसा येण्याचे संकेत आहेत. जर तुम्ही रिअल इस्टेट किंवा शेअर बाजारामध्ये गुंतवणूक केली असेल, तर तुम्हाला अनपेक्षित परतावा मिळू शकतो. कुटुंबात शुभ कार्ये ठरतील. तुमच्या बोलण्यातील प्रभाव वाढल्यामुळे तुम्ही लोकांना आकर्षित करू शकाल. जुनी देणी फेडण्यात तुम्हाला यश येईल, ज्यामुळे मानसिक तणाव कमी होईल.
advertisement
टीप : (वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहेत. न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आपला उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)
view comments
मराठी बातम्या/राशीभविष्य/
जॅकपॉट लागणार! शनी-मंगळाची युती 3 राशींसाठी ठरणार वरदान, फायनान्स-करिअरमध्ये होणार फायदा
Next Article
जगातील सर्वात आनंदी देश फिनलंड, सर्वात दुःखी कोण? भारताचा आनंद नेमका कुठे अडकला? या वर्षी पाकिस्तानच्या मागे
जगातील सर्वात आनंदी देश फिनलंड, सर्वात दुःखी कोण? भारताचा आनंद नेमका कुठे अडकला?
  • आर्थिक संकटात असलेला पाकिस्तान भारतापेक्षा जास्त आनंदी?

  • 'वर्ल्ड हॅप्पीनेस रिपोर्ट' वाचून चक्रावून जाल

  • सर्वात आनंदी देश फिनलंड, तर सर्वात दुःखी अफगाणिस्तान

View All
advertisement