Shukrawar Upay: शुक्रवारी ही कामं करणं टाळावं! आर्थिक अडचणींना तोंड द्यावं लागतं, धनहानी
- Published by:Ramesh Patil
Last Updated:
Shukrawar Upay: शुक्रवारी काही गोष्टी करणे अशुभ मानले जाते. या गोष्टी केल्याने व्यक्तीला आर्थिक संकटाचा सामना करावा लागू शकतो. पंडित रमाकांत मिश्रा यांच्या मते, शुक्रवारी कोणती कामे टाळावीत ते जाणून घेऊया.
मुंबई : ज्योतिषशास्त्रानुसार, शुक्रवार हा देवी लक्ष्मीला समर्पित आहे आणि हा दिवस शुक्र ग्रहाच्या उपायांसाठीही योग्य मानला जातो. दोन्ही संपत्ती, वैभव, समृद्धी आणि भौतिक सुखसोयींशी संबंधित आहेत. त्यामुळे या दिवशी कित्येक लोक देवी लक्ष्मीसाठी व्रत-उपवास करतात. त्यामुळे आयुष्यात कधीही धन आणि समृद्धीची कमतरता भासत नाही आणि कुंडलीत शुक्राची स्थिती चांगली राहते.
मात्र, शुक्रवारी काही गोष्टी करणे अशुभ मानले जाते. या गोष्टी केल्याने व्यक्तीला आर्थिक संकटाचा सामना करावा लागू शकतो. पंडित रमाकांत मिश्रा यांच्या मते, शुक्रवारी कोणती कामे टाळावीत ते जाणून घेऊया.
शुक्रवारी या गोष्टी करू नयेत: - मांसाहारी पदार्थ आणि मद्यपान टाळावे, यामुळे देवी लक्ष्मी रुष्ट होऊ शकते. शुक्रवार हा देवी लक्ष्मीला समर्पित मानला जातो. या दिवशी पैशाचे व्यवहार करू नयेत, उधार घेऊ नयेत किंवा देऊ नये, यामुळे देवी लक्ष्मी कोपते.
advertisement
शुक्रवारी कोणत्याही प्रकारचे भांडण टाळावे, कारण यामुळे कुंडलीतील शुक्र ग्रह कमकुवत होतो आणि परिणामी आर्थिक नुकसान होऊ शकते.
शुक्र ग्रहाला सौंदर्य आणि समृद्धीचा कारक मानले जाते, त्यामुळे या दिवशी अस्वच्छ, फाटलेले किंवा काळे कपडे घालू नयेत, अन्यथा नकारात्मक परिणाम होऊ शकतो आणि आर्थिक समस्या वाढू शकतात.
advertisement
शुक्रवारी चांदी, साखर दान करू नये कारण असे केल्याने भौतिक सुखांचा अभाव होऊ शकतो. स्वयंपाकघराशी संबंधित कोणत्याही वस्तू खरेदी करू नयेत, कारण यामुळे पैशाच्या आवकमध्ये घट होऊ शकतो. शुक्रवारी कोणाकडूनही काहीही मोफत घेऊ नये, कारण असे केल्याने कर्ज बुडण्याची शक्यता वाढू शकते.
advertisement
(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
April 03, 2025 5:06 PM IST
मराठी बातम्या/राशीभविष्य/
Shukrawar Upay: शुक्रवारी ही कामं करणं टाळावं! आर्थिक अडचणींना तोंड द्यावं लागतं, धनहानी