Vastu Tips: घरी कुंड्यांमध्ये या प्रकारची रोपे असल्यास वास्तु नियम पाळा; खर्च करून अधोगतीच्या मार्गावर याल
- Published by:Ramesh Patil
Last Updated:
Lucky Plants For Home: आपल्या घरात पाऊल टाकल्याबरोबर छान मस्त फ्रेश वाटावं, कामाचा कंटाळा निघून जावा. घरात असताना मनाला शांती मिळावी, अशी प्रत्येकाची इच्छा असते. या सगळ्यासाठी वास्तूशास्त्रातील काही सोप्या टिप्स
मुंबई : छोटं का असेना पण आपलं घर असावं आणि ते छान असावं, अशी प्रत्येकाची इच्छा असते. आपल्या घरात पाऊल टाकल्याबरोबर छान मस्त फ्रेश वाटावं, कामाचा कंटाळा निघून जावा. घरात असताना मनाला शांती मिळावी, अशी प्रत्येकाची इच्छा असते. या सगळ्यासाठी वास्तूशास्त्रातील काही सोप्या टिप्स खूप मदतीला येतात. घरात लावलेली झाडं, फक्त सजावटीसाठी नसून आपल्या आयुष्यात चांगले बदल घडवून आणण्याचं काम करतात.
घरात झाडं-रोपं लावत असाल तर ती योग्य दिशेला आणि योग्य जागी असावीत, याची दक्षता घ्यावी. त्यामुळे हवा तसा फायदा मिळत नाही. आपण योग्य पद्धतीने झाडं लावल्यास घराची शोभा तर वाढतेच त्यासोबत पैसा, शांती आणि आनंदही येतो. वास्तूशास्त्रानुसार खूप शुभ मानली जाणारी झाडे आणि ती कशी लावावीत याविषयीसुद्धा समजावून घेऊया.
तुळशीचे रोप: तुळस जवळपास प्रत्येक घरात असतेच आणि तिला अत्यंत पवित्र मानले जाते. पण फक्त तुळस लावली म्हणजे सगळं काही नीट होतंच असं नाही, तुळस योग्य दिशेला असणेही गरजेचे आहे. तुळस नेहमी उत्तर, पूर्व किंवा उत्तर-पूर्व दिशेला लावावी. या दिशेला तुळस लावल्याने घरात उत्साह वाढतो आणि वातावरण शांत राहते. तुळशीच्या आजूबाजूला कधीही घाण नसावी. तुळशीजवळ कधी चप्पल-बूट किंवा झाडू ठेवला जाणार नाही याची काळजी घ्या. या छोट्या गोष्टींची काळजी घेतली, तर घरात सुख-समृद्धी टिकून राहते.
advertisement
मनी प्लांट: या झाडाला पैसा आणि प्रगतीचे प्रतीक मानले जाते. वास्तूशास्त्रामध्ये मनी प्लांटला पैसा आणि समृद्धीचे प्रतीक मानले जाते. घरात योग्य दिशेला लावलेले हे रोप आर्थिक स्थिती सुधारण्यास मदत करू शकते. मनी प्लांट घराच्या दक्षिण-पूर्व दिशेला लावणे सर्वात उत्तम मानले जाते. हे झाड घराच्या आत लावणे जास्त फायद्याचे असते. महत्त्वाची गोष्ट म्हणजे याचा वेल जमिनीला टेकू नये. तो नेहमी वरच्या बाजूला वाढू द्या, कारण यामुळे तुमची प्रगती आणि वाढ होत राहते.
advertisement
बांबूचे झाड दिसायला जितके साधे असते, तितकेच ते जास्त फायदेशीरही असते. वास्तूमध्ये याला गुड लक आणि सकारात्मकतेचे प्रतीक मानले गेले आहे. हे झाड घराच्या उत्तर किंवा पूर्व दिशेला ठेवावे. यामुळे घरात आनंद येतो आणि नकारात्मक ऊर्जा दूर होते. बांबूचे झाड करिअरमध्ये प्रगती करण्यासाठी आणि आयुष्यात संतुलन राखण्यासाठी मदत करते. जर तुम्हाला आयुष्यात स्थिरता हवी असेल, तर हे झाड नक्की लावा.
advertisement
झाडे लावताना या गोष्टींची काळजी घ्या: घरात कधीही वाळलेली किंवा कोमेजलेली झाडे ठेवू नका. काटेरी झाडे लावणे टाळावे. झाडे नेहमी स्वच्छ आणि टवटवीत ठेवा. झाडं लावताना योग्य दिशेचे भान नक्की ठेवा. घराच्या आत आणि बाहेर लावलेल्या झाडांचा समतोल राखला जाईल असं पाहा.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Mar 24, 2026 4:45 PM IST
मराठी बातम्या/राशीभविष्य/
Vastu Tips: घरी कुंड्यांमध्ये या प्रकारची रोपे असल्यास वास्तु नियम पाळा; खर्च करून अधोगतीच्या मार्गावर याल










