advertisement

Vastu Tips: घरात नवरा-बायकोचा फोटो लावण्याची सर्वात योग्य जागा? या दिशेकडून वाहतो प्रेमाचा झरा

Last Updated:

Vastu Tips Marathi: वास्तुशास्त्रानुसार घराच्या दक्षिण-पश्चिम दिशेला म्हणजेच नैऋत्य कोनात पती-पत्नीचा फोटो लावणे सर्वोत्तम मानले जाते. या दिशेला लावलेला फोटो वैवाहिक जीवनात स्थिरता आणतो आणि पती-पत्नीमध्ये प्रेम आणि सामंजस्य वाढवण्यास मदत करतो.

News18
News18
मुंबई : घर म्हटलं की आता वास्तुशास्त्रचे नियम पाळणाऱ्यांची संख्या मोठी आहे. वास्तुशास्त्रामुळे घरातील सुख, शांती आणि सकारात्मकता टिकवून ठेवता येते. वास्तुच्या नियमांचे पालन केल्यास जीवनातील अनेक अडचणी दूर होऊ शकतात आणि कुटुंबातील तणावही कमी होतो. आज आपण घराच्या कोणत्या दिशेला पती-पत्नीचा फोटो लावणे अत्यंत शुभ मानले जाते, जेणेकरून जोडप्यामध्ये प्रेम आणि ताळमेळ टिकून राहील, याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊया.
पती-पत्नीचा फोटो कोठे लावणे शुभ - वास्तुशास्त्रानुसार घराच्या दक्षिण-पश्चिम दिशेला म्हणजेच नैऋत्य कोनात पती-पत्नीचा फोटो लावणे सर्वोत्तम मानले जाते. या दिशेला लावलेला फोटो वैवाहिक जीवनात स्थिरता आणतो आणि पती-पत्नीमध्ये प्रेम आणि सामंजस्य वाढवण्यास मदत करतो. याशिवाय घराची उत्तर दिशा देखील जोडीदाराचा फोटो लावण्यासाठी शुभ मानली जाते. यामुळे नात्यात ओलावा राहतो आणि एकमेकांबद्दलचा विश्वास वाढतो. जर तुम्हाला असा फोटो दिवाणखान्यात म्हणजेच ड्रॉइंग रूममध्ये लावायचा असेल, तर तिथेही या दिशांना चालेल.
advertisement
फोटो कोणत्या ठिकाणी लावू नये - वास्तुशास्त्रानुसार पती-पत्नीचा फोटो कधीही बेडरुमच्या समोरच्या भिंतीवर लावू नये, कारण यामुळे नात्यात मानसिक तणाव वाढण्याची शक्यता असते. तसेच जोडप्याचे फोटो कधीही घरातील देव्हाऱ्याच्या समोर, बाथरुमच्या भिंतीवर किंवा बाथरुमच्या दरवाजाजवळ लावू नयेत. अशा ठिकाणी फोटो लावल्याने घरात नकारात्मक ऊर्जा पसरते आणि रिलेशनमध्ये दुरावा निर्माण होऊ शकतो.
advertisement
फोटोशी संबंधित काही महत्त्वाच्या गोष्टी - वास्तुच्या नियमांनुसार घरात एकाच ठिकाणी खूप सारे फोटो एकत्र करून लावू नयेत, असे करणे अशुभ मानले जाते. बेडरुम किंवा ड्रॉइंग रूममध्ये पती-पत्नीचा एकच पण सुंदर आणि हसमुख फोटो लावावा. फोटोमध्ये जोडपे आनंदी दिसत असेल तर जीवनातही आनंद टिकून राहतो. फोटोची फ्रेम तुटलेली नसावी किंवा तिचा रंग उडालेला नसावा, कारण यामुळे नकारात्मकता येते आणि नाते खराब होऊ शकते. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे पती-पत्नीच्या फोटोंसोबत कधीही पूर्वजांचे फोटो लावू नका, यामुळे वैवाहिक जीवनात अडचणी-कलह निर्माण होऊ शकतो.
view comments
मराठी बातम्या/राशीभविष्य/
Vastu Tips: घरात नवरा-बायकोचा फोटो लावण्याची सर्वात योग्य जागा? या दिशेकडून वाहतो प्रेमाचा झरा
Next Article
17 जागा अख्ख्या राज्याचं गणित फिरवणार, बंगालच्या सत्तेची चावी देणारा गेमचेंज फॅक्टर; हे मतदार ठरवणार नवा मुख्यमंत्री
17 जागा अख्ख्या राज्याचं गणित फिरवणार, बंगालच्या सत्तेची चावी देणारा गेमचेंज फॅक्टर; हे मतदार ठरवणार नवा मुख्यमंत्री
  • एकच फॅक्टर! 277 जागांवर भारी

  • भूकंपाची केंद्रबिंदू ठरणाऱ्या 17 जागा

  • बंगालच्या राजकारणात खळबळ

View All
advertisement