TVS ने आणली आणखी रेसिंग 'मशीन', Bike चा लूक पाहून पडाल प्रेमात, किंमतही कमी

Last Updated:

मागील अनेक वर्षांपासून 150 आणि 200 सीसी बाइक उत्पादनामध्ये TVS मोटर्स कंपनीने अनेक असे प्रयोग केले आहे.

News18
News18
मागील अनेक वर्षांपासून 150 आणि 200 सीसी बाइक उत्पादनामध्ये TVS मोटर्स कंपनीने अनेक असे प्रयोग केले आहे. आता  2025 Apache RTR 200 4V लाँच केली आहे. Apache सीरिजला २० वर्ष पूर्ण झाले आहे, त्यानिमित्ताने ही स्पेशल अशी Apache RTR 200 4V लाँच केली आहे. या बाइकमध्ये OBD2B (ऑन-बोर्ड डायग्नोस्टिक्स) उत्सर्जन मानकांचं पालन करतो. या बाइकच्या डिझाइनमध्ये अनेक बदल केले आहे.
2025 Apache RTR 200 4V मध्ये  आता आणखी चांगल्या प्रकारे हँडलिंग आणि कॉर्नरिंग स्थिरता आणण्यासाठी  37mm अपसाईड-डाउन (USD) फ्रंट सस्पेंशन दिले आहे. सोबतच एक नवीन हायड्रोफॉर्म्ड हँडलबार दिला आहे, ज्यात वेगवेगळ्या प्रकारे रायडिंग कंडिशन्स नियंत्रण सुधारणा दिली आहे. यामध्ये रिफ्रेश्ड ग्राफिक्स आणि बोल्ड रेड अलॉय व्हिल्स दिले आहे. ग्लॉसी ब्लॅक, मॅट ब्लॅक, आणि ग्रेनाइट ग्रे या ३ रंगाचा पर्याय दिला आहे.
advertisement
इंजिन आणि पॉवर
Apache RTR 200 4V मध्ये 197.75cc सिंगल-सिलेंडर, ऑयल-कूल्ड इंजिन दिलं आहे, जे 9,000rpm वर 20.8PS आणि 7,250rpm वर 17.25Nm टॉर्क  जनरेट करते. यामध्ये अनेक सेगमेंट-फर्स्ट फिचर्स दिले आहे.  या बाइकमध्ये ३ राइड मोड्स दिले आहेस अर्बन, स्पोर्ट, आणि रेन असे हे मोड्स आहे. तसंच डुअल-चॅनल ABS रिअर लिफ्ट-ऑफ प्रोटेक्शनसह रेस-ट्यून स्लिपर क्लच, एडजस्टेबल क्लच आणि ब्रेक लिवर्स आणि  TVS SmartXonnect ब्लूटूथ आणि वॉइस असिस्ट दिलं आहे.
advertisement
किंमत किती? 
2025 Apache RTR 200 4V मध्ये पूर्णपणे डिजिटल इंस्ट्रूमेंट क्लस्टर, LED हेडलॅम्प्स DRLs सह दिले आहे.  सिग्नेचर रेस-इंस्पायर्ड स्टाइलिंग आहे जे 2016 च्या बाइकनंतर तयार केले.  RTR 200 4V ही आपल्या सेगमेंटमध्ये सगळ्यात मजबूत आणि स्टायलिश बाइक आहे.  अपग्रेडेड 2025 TVS Apache RTR 200 4V ची किंमत एक्स शोरुम १.५३ लाख रुपये किंमत ठेवण्यात आली आहे.
मराठी बातम्या/ऑटो/
TVS ने आणली आणखी रेसिंग 'मशीन', Bike चा लूक पाहून पडाल प्रेमात, किंमतही कमी
Next Article
advertisement
Superstar Fathers Flop Sons: सुपरस्टार वडिलांची महाफ्लॉप मुलं, सिनेमे आपटले; मेकर्सही झाले कंगाल
सुपरस्टार वडिलांची महाफ्लॉप मुलं, सिनेमे आपटले; मेकर्सही झाले कंगाल
    View All
    advertisement