GST Meeting: आता दसऱ्याला SUV येईल दारात, मोदी सरकारच्या निर्णयामुळे किंमती झाल्या कमी!
- Published by:Sachin S
Last Updated:
केंद्र सरकारने जीएसटीच्या करप्रणालीमध्ये मोठा बदल केला आहे. १८ आणि २८ टक्के जीएसटी कर प्रणाली आता रद्द करण्याचा ऐतिहासिक निर्णय केंद्र सरकारने घेतला
मुंबई : जर तुम्ही कार किंवा बाईक खरेदी करण्याचा प्लॅन करत असाल तर आताच ती वेळ आली आहे, असं समजा. कारण, केंद्र सरकारने जीएसटीच्या करप्रणालीमध्ये मोठा बदल केला आहे. १८ आणि २८ टक्के जीएसटी कर प्रणाली आता रद्द करण्याचा ऐतिहासिक निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. त्यामुळे याचा परिणाम प्रत्येक सेक्टरमध्ये होणार आहे. ऑटो इंडस्ट्रीमध्येही याचा मोठा परिणाम होणार आहे. कारण, ज्या गाड्यांवर २८ टक्के कर आकारला जात होता, आता तो १२ टक्के आकारला जाईल, त्यामुळे कारच्या किंमती कमी होणार आहे.
अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्या अध्यक्षतेखाली गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स (GST) दरांबाबत आणि सुधारणांबाबत मागील काही दिवसांपासून चर्चा सुरू होती. अखेरीस आज जीएसटी परिषदेच्या ५६व्या मॅरेथॉन बैठकीत कर रचनेत मोठा बदल करण्यात आला आहे. आता केवळ ५ टक्के आणि १८ टक्के हे दोनच कर स्लॅब राहणार असून, २२ सप्टेंबरपासून हा नवी कर प्रणाली लागू होणार आहे.
advertisement
कार होणार स्वस्त
ऑटो इंडस्ट्रीमध्ये याचा मोठा फायदा होणार आहे. कारण, 20 लाखांपेक्षा जास्त किमतीच्या लक्झरी इलेक्ट्रिक गाड्यांवर जीएसटी दर 5% वरून 18% होण्याची शक्यता आहे. ज्या SUVs ची लांबी ही 4 मीटर पेक्षा जास्त आहे, त्यांना GST कपातचा फायदा होणार आहे. उदाहरणार्थ, Tata Nexon ची लांबी 4 मीटरपेक्षा कमी आहे. त्यामुळे या कारच्या किंमतीत जवळपास 80 हजार रुपये कमी होणार आहे. त्यामुळे ज्या गाड्यांची लांबी ही ४ मीटरपेक्षा कमी आहे, त्या गाड्यांच्या किंमती कमी होणार आहे.
advertisement
दुचाकीच्या किंमतीही कमी होणार
कार प्रमाणे आता दुचाकीच्या किंमतीही कमी होतील. दुचाकीवरही २८ टक्के जीएसटी लागू होता. ३५० सीसीपेक्षा जास्त सीसी असलेल्या गाड्यांवर २८ टक्के जीएसटी आणि ३ टक्के सेस आकारला जात होता. आता तो रद्द झाला आहे. त्यामुळे ३५० सीसी दुचाकींवर आता १८ टक्के जीएसटी आकारला जाईल, त्यामुळे किंमती कमी होतील. उदाहरणार्थ, Hero Splendor Plus ची किंमत एक्स शोरूम 79 हजार 426 रुपये आहे. जर या बाइकच्या किंमतीत १० टक्के जीएसटी कमी झाला तर थेट 7900 रुपयांनी ही बाइक स्वस्त होईल.
advertisement
दरम्यान, सुमारे 175 वस्तूंवरील जीएसटी दर कमी होणार आहे. यामध्ये अन्न घटक: बदाम, स्नॅक्स, रेडी-टू-ईट पदार्थ, जॅम, घी, लोणी, लोणची, मुरंबा, चटणी
ऑटोमोबाईल व ट्रॅक्टर
इलेक्ट्रॉनिक्स: टीव्ही, एसी, फ्रिज
सोलर प्रॉडक्ट्स व कृषी उपकरणे
जर मंत्रिमंडळ गटाचा (GoM) प्रस्ताव कौन्सिलने मान्य केला तर देशातील सरासरी जीएसटी दर 11.5% वरून 10% पेक्षा खाली येईल.
advertisement
नवीन दर 22 सप्टेंबरपासून लागू
केंद्र सरकार हे दर 22 सप्टेंबरपासून लागू करू शकते. उद्देश आहे नवरात्री आणि फेस्टिव्हल सीझनमध्ये मागणी आणि विक्री वाढवणे.
सरकारने जीएसटी कौन्सिलला या बदलांना तत्काळ मान्यता देण्याची विनंती केली आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 03, 2025 10:51 PM IST
मराठी बातम्या/ऑटो/
GST Meeting: आता दसऱ्याला SUV येईल दारात, मोदी सरकारच्या निर्णयामुळे किंमती झाल्या कमी!