Maruti Ertiga पेक्षा स्वस्त झाली ही 7 सीटर कार, 6 लाखांमध्ये करा दारात उभी, फिचर्सही भारी!
- Published by:sachin Salve
Last Updated:
देशातील सर्वात स्वस्त 7 सीटर एमपीव्ही म्हणून रेनॉ ट्रायबरकडे पाहिलं जातं. आता रेनॉ ट्रायबर आणखी स्वस्त झाली आहे.
भारतात सध्या फॅमिलीसाठी ७ सीटर एसयुव्ही खरेदी करण्याकडे लोकांचा कल वाढला आहे. जास्त मायलेज, प्रशस्त जागा आणि किंमत कमी असल्यामुळे सेडान कार घेण्याऐवजी एसूयुव्ही किंवा एमपीव्ही विकत घेणे आणखी सोप्पं झालं आहे. मागील काही वर्षांपासून ७ सीटर सेगमेंटमध्ये मारुती अर्टिगा आणि किआ कारेन्सने मार्केटमध्ये आपला दबदबा कायम राखल आहे. मारुतीने अर्टिगाचं प्रिमिअम मॉडेल एक्सएल 6 सुद्धा लाँच केलं आहे. पण मारुती सुझुकी आणि किआ मोटर्सला रेनॉल्ट मोटर्स चांगलीच टक्कर देत आहे. रेनॉने आपली ७ सीटर आता आणखी स्वस्त केली आहे.
देशातील सर्वात स्वस्त 7 सीटर एमपीव्ही म्हणून रेनॉ ट्रायबरकडे पाहिलं जातं. आता रेनॉ ट्रायबर आणखी स्वस्त झाली आहे. कंपनीने या एमपीव्हीची किंमत १ लाख रुपयांनी कमी केली आहे. त्यामुळे ७ सीटर गाडी खरेदी करण्यासाठी ही चांगली संधी आहे. तसंच कंपनीने रेनॉ काइगर आणि रेनॉ क्विड वर सुद्धा भक्कम डिस्काउंट दिला आहे.
advertisement
रेनॉ ट्राइबरवर किती डिस्काउंट?
रेनॉच्या 4 मीटर आणि 7 सीटर कार 2024 मध्ये तयार केलेल्या मॉडेलवर वर १ लाख रुपये डिस्काउंट देण्यात आला आहे. यामध्ये ५०,००० रुपये कॅश डिस्काउंट आणि ४० हजार रुपये एक्सचेंज बोनस दिला आहे. या शिवाय कंपनीने २०२५ मध्ये तयार झालेल्या मॉडेलवर ५०,००० रुपयांचा कॅश डिस्काउंट दिला आहे. या कारची किंमत ६.१५ लाखांपासून सुरू होते ती ८.९८ लाखांपर्यंत (एक्स शोरूम) आहे. या रेनॉ ट्राइबरमध्ये 1.0 लिटरचं पेट्रोल इंजिन दिलं आहे, जे ७२ एचपी पॉवर जनरेट करते.
advertisement
रेनॉ क्विड आणि रेनॉ काइगरवर खास ऑफर
मे महिन्यात कंपनीने आपुल्या सगळ्यात स्वस्त कार रेनॉ क्विडवर १ लाख रुपयांपर्यंत डिस्काउंट दिला आहे. २०२४ मध्ये तयार झालेल्या कारवर ही ऑफर असणार आहे, जर तुम्ही २०२५ मध्ये तयार झालेली रेनॉ क्विड विकत घेण्यासाठी गेला तर २५.००० रुपये डिस्काउंट दिला आहे. यामध्ये कॅश डिस्काउंट, एक्सचेंज बोनस आणि इतर सूट मिळणार आहे. या कारची किंमत ४.७० लाख रुपयांपासून सुरू होते. यामध्ये १.० लीटर पेट्रोल इंजिन दिलं आहे, जे ६९ एचपी पॉवर जनरेट करते. या कारचं टॉप व्हेरिएंट ६.४५ लाख रुपये आहे.
advertisement
रेनॉ कायगरवर किती डिस्काउंट?
तर रेनॉ कायगरवर सुद्धा १ लाख रुपये डिस्काउंट दिला आहे. ही एक कॉम्पॅक्ट एसयुव्ही आहे. २०२४ मध्ये तयार झालेल्या मॉडेलवर ट्राइबर सारखीच ऑफर आहे. तर २०२५ मॉडेलवर ५०,००० रुपयांपर्यंत ऑफर दिली आहे. या कारमध्ये १.० लिटर पेट्रोल इंजिन दिलं आहे. जे म्यॅनुअलवर ७२ एचपी इतकी पॉवर देतंय. ऑटोमेटिकवर १०० एचपी पॉवर जनरेट करते. या कारची किंमत ६.१५ लाख रुपयांपासून सुरू होते तर ११.२३ लाखांपर्यंत पोहोचते. ही एसयुव्ही निसान मॅगनाइट आणि हुदंई वेन्यूला टक्कर देते.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
May 16, 2025 6:02 PM IST
मराठी बातम्या/ऑटो/
Maruti Ertiga पेक्षा स्वस्त झाली ही 7 सीटर कार, 6 लाखांमध्ये करा दारात उभी, फिचर्सही भारी!