bajaj Chetak: बजाजने टाकला मोठा डाव, आणतेय सगळ्यात स्वस्त EV Scooter, रेंजही दमदार!

Last Updated:

बजाज ऑटो लवकरच आपली एंट्री-लेव्हल सेकंड जनरेशन चेतक लाँच (bajaj chetak 3001) करणार आहे.

News18
News18
मुंबई: मध्यमवर्गीय कुटुंबीयांचा कल हा स्कुटर खरेदीकडे सर्वात जास्त आहे. अशातच भारतात सर्वात जास्त दुचाकी उत्पादक कंपनी बजाज ऑटो लवकरच आपली एंट्री-लेव्हल सेकंड जनरेशन चेतक लाँच (bajaj chetak 3001) करणार आहे. नवीन इलेक्ट्रिक स्कूटरचे नाव चेतक ३००१ असणार आहे. जर तुम्ही स्वस्त इलेक्ट्रिक स्कूटर शोधत असाल तर थोडी वाट पाहणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. वाहन विक्रीच्या आकडेवारीनुसार, मे २०२५ मध्ये इलेक्ट्रिक टू व्हीलर उद्योगाने १,००,२६६ युनिट्सची नोंदणी केली. जी मागील वर्षीच्या तुलनेत ३०% वाढ आहे. मे महिन्यात बजाज ऑटोने २१,७७० युनिट्ससह दुसऱ्या क्रमांकावर कब्जा केला, तर टीव्हीएस मोटरने २४,५६० युनिट्सची विक्री केली. १८,४९९ युनिट्सच्या विक्रीसह ओला इलेक्ट्रिक तिसऱ्या क्रमांकावर आहे.
सर्वात स्वस्त चेतक
सध्या, बजाज ऑटोने नवीन चेतक ३००१ ही सर्वात स्वस्त ट्रिम असलेल्या २९०३ मॉडेलची जागा घेईल की नाही, याची चर्चा आहे. नवीन आणि स्वस्त स्कुटरमुळे बजाजच्या विक्रीच्या संख्येत सुधारणा होण्याची शक्यता आहे. चेतक ३००१ मध्ये नवीन ३.१ किलोवॅट क्षमतेची इलेक्ट्रिक मोटर असेल. या स्कुटरचा टॉप स्पीड ६२ किमी/तास असेल. याशिवाय, त्यात ३ किलोवॅट क्षमतेची बॅटरी असेल. चेतक २९०३ मध्ये २.९ किलोवॅट क्षमतेची बॅटरी आहे ज्याचा टॉप स्पीड ६३ किमी/तास आहे आणि दावा केला आहे की, १२३ किमीचा रेंज आहे. ० ते ८०% पर्यंत चार्जिंग वेळ ४ तास आहे.
advertisement
क्लासिक डिझाइन
बजाज चेतकच्या क्लासिक डिझाइनसह त्याच्या सध्याच्या लूकमध्ये पाहण्यास मिळेल. चेतक ३००१ ची लांबी १,९१४ मिमी, उंची १,१४३ मिमी आणि रुंदी ७२५ मिमी असेल. इलेक्ट्रिक स्कूटरचा ग्राउंड क्लीयरन्स १६८ मिमी आहे आणि तो पुढच्या आणि मागच्या बाजूला १२-इंच व्हिल असणार आहे.
advertisement
किती असेल किंमत?
चेतकची सर्वात स्वस्त ट्रिम २९०३ आहे, त्यानंतर चेतक ३५०३, चेतक ३५०२ आणि टॉप मॉडेल चेतक ३५०१ आहेत. दुसऱ्या जनरेशनमधील चेतक लाइनअप ३५०३ साठी १.१० लाख रुपये, ३५०२ साठी १.२२ लाख रुपये आणि ३५०१ साठी १.३४ लाख रुपयांपासून सुरू होते. चेतक ३००१ ची एक्स-शोरूम किंमत सुमारे १ लाख रुपये असण्याची शक्यता आहे.
मराठी बातम्या/ऑटो/
bajaj Chetak: बजाजने टाकला मोठा डाव, आणतेय सगळ्यात स्वस्त EV Scooter, रेंजही दमदार!
Next Article
advertisement
Superstar Fathers Flop Sons: सुपरस्टार वडिलांची महाफ्लॉप मुलं, सिनेमे आपटले; मेकर्सही झाले कंगाल
सुपरस्टार वडिलांची महाफ्लॉप मुलं, सिनेमे आपटले; मेकर्सही झाले कंगाल
    View All
    advertisement