आता पेट्रोल स्कुटरला करा बाय-बाय,आली बजाजची स्वस्त आणि मस्त Chetak 3001
- Published by:sachin Salve
Last Updated:
ईलेक्ट्रिक स्कुटर सेगमेंटमध्ये आघाडी घेतल्यानंतर आता बजाजने आपली चेतक सीरिजमधील स्वस्त मॉडेल लाँच केलं आहे.
मुंबई : भारतीय ऑटो इंडस्ट्रीमध्ये सध्या ईव्ही स्कुटर सगेमेंटमध्ये चांगलीच स्पर्धा रंगली आहे. टीव्हीएस मोटर्सने ईलेक्ट्रिक स्कुटर सेगमेंटमध्ये आघाडी घेतल्यानंतर आता बजाजने आपली चेतक सीरिजमधील स्वस्त मॉडेल लाँच केलं आहे. चेतक ३००१ (Bajaj Chetak 3001) नावाची नवी इलेक्ट्रिक स्कुटर अखेरीस मार्केटमध्ये उतरवण्यात आली आहे. ही स्कुटर चेतक २९०३ चं अपग्रेड केलेले मॉडेल आहे. या स्कुटरची किंमत फक्त ९९,९९० रुपये (एक्स-शोरूम) इतकी ठेवण्यात आली आहे. नवीन मॉडेलमध्ये चांगली रेंज आणि स्मार्ट असे फिचर्स देण्यात आले आहे.
चेतक 35 सिरीज प्लॅटफॉर्म
Bajaj Chetak 3001 ही चेतक ३५ सिरीज प्लॅटफॉर्मवर बनवलेली आहे. Chetak 3001 मध्ये फ्लोअरबोर्ड-माउंटेड ३.०kWh बॅटरी आहे, जी एका चार्जवर १२७ किमीची रेंज देते. नवीन बॅटरी आर्किटेक्चर स्कूटरचे ग्रेविटेशनल सेंटर कमी करते आणि रायडिंगसाठी चांगला सपोर्ट करते. Chetak 3001 मध्ये ३५ लिटर अंडरसीट बूट स्पेस दिला आहे. चार्जिंग सुविधा देखील चांगली केली आहे. चेतक ३००१ ७५०W चार्जरला सपोर्ट करते, जी फक्त ३ तास ५० मिनिटांत बॅटरी ० ते ८०% पर्यंत चार्ज करते.
advertisement
TecPac स्मार्ट कनेक्टिव्हिटी
Chetak 3001 मध्ये TecPac स्मार्ट कनेक्टिव्हिटी दिली आहे. ज्यामध्ये कॉल स्वीकारणे/नकारणे, म्युझिक मोड, हिल होल्ड असिस्ट, रिव्हर्स लाईट, ऑटो-फ्लॅशिंग स्टॉप लॅम्प आणि 'गाईड मी होम' लाईट्स यासारख्या फिचर्सचा समावेश आहे. भारतातील विविध रस्ते आणि हवामान परिस्थिती हाताळण्यासाठी डिझाइन केलेली चेतक 3001 एक मजबूत स्टील बॉडी आणि IP67-रेटेड पाणी आणि धूळ प्रतिरोधकतेसह येते. बजाज त्याच्या मजबूत सेवा नेटवर्कसह स्कूटरला समर्थन देते. बजाजचे देशभरात 3,800 हून अधिक सर्व्हिस सेंटर आहेत.
advertisement
किंमत किती?
"चेतक 3001 इलेक्ट्रिक स्कूटर रोजच्या वापरासाठी एक बेस्ट स्कुटर आहे. नेक्स्ट जेनरेशन प्लॅटफॉर्मवर बनवलेली भारतीय स्कूटर रायडर्सच्या मागणीला लक्षात ठेवून तयार केली आहे. चेतक 3001 ही पेट्रोल स्कूटरला एक बेस्ट पर्याय आहे, या स्कुटरची किंमत ही 99,990 रुपयांच्या एक्स-शोरूम जाहीर केली आहे, अशी माहिती बजाज ऑटोच्या अर्बनाइट बिझनेस युनिटचे अध्यक्ष एरिक वास यांनी दिली.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
June 18, 2025 11:52 PM IST