Carचं बेस मॉडल खरेदी करणं फायद्याचं की होतं नुकसान? खरेदीपूर्वी घ्या जाणून
- Published by:Mohini Vaishnav
Last Updated:
Car Base Model Purchase: कार खरेदी करताना अनेक जण विचार करतात की, कारचं बेस मॉडल खरेदी करु. पण ते कंफ्यूज असतात की, त्यांना वाटतं की, बेस मॉडल आपल्या गरजा पूर्ण करेल की नाही? पण आज आपण याविषयी सविस्तर जाणून घेणार आहोत.
Car Base Model Purchase: कार खरेदी करणं हे प्रत्येकाचं स्वप्न असतं. अनेकांना नवी कोरीच कार खरेदी करायची असते. मात्र नवी कार खरेदी करताना 'बेस मॉडल' हा नेहमीच वादाचा विषय राहिला आहे. काही लोकांना वाटते की, ही पैशांची बचत आहे. तर काही लोकांना वाटतं हा फीचर्ससोबत एक तडजोड आहे. तुमच्या मनातही बेस मॉडल खरेदी करण्याचा विचार चालू असेल आणि तुम्ही कन्फ्यूज्ड असाल, तर आम्ही तुमच्यासाठी 5 पॉइट्स घेऊन आलो आहोत. ज्यामुळे तुम्हाला बेस मॉडल निवडणं योग्य राहील की नाही हे कळण्यास मदत होईल.
1. बचत आणि बजेटचं कॅलक्यूलेशन करा
बेस मॉडल खरेदीचा सर्वात मोटा आणि स्पष्ट फायदा म्हणजे याची किंमत ही कमी आहे. टॉप मॉडलच्या तुलनेत बेस मॉडल हे लाखो रुपयांनी स्वस्त असते. यामुळे तुमचं डाउन पेमेंट कमी होतं. यासोबत मासिक हप्ताही कमी येतो. तुमचं बजेट कमी असेल आणि तुम्हाला एका ब्रँड किंवा खास कार खरेदीचं स्वप्न असेल तर तुम्ही बेस मॉडल खरेदी करणं हे हुशारीचं ठरेल.
advertisement
2. कमी इन्शुरन्स आणि रजिस्ट्रेशन चार्ज
कारची किंमत जेवढी कमी असेल, तेवढं इन्सरुन्स प्रीमियम आणि रजिस्ट्रेशन फीस कमी राहील. टॉप व्हेरिएंटच्या तुलनेत बेस मॉडलचं वार्षिक इन्शुरन्स रिन्यूअलही स्वस्त असतं. दीर्घकाळापासून ते तुमच्या हजारो रुपयांची बचत करते. या व्यतिरिक्त ते कमी अॅक्सेसरीज असल्यामुळे भविष्यात खराब झाल्यावर दुरुस्तीचा खर्चही खुप कमी असतो.
advertisement
3. कस्टमाइझ करण्याचे स्वातंत्र्य
ज्यांना त्यांची कार कस्टमाइझ करायची आहे त्यांच्यासाठी बेस मॉडेल बेस्ट आहे. उत्पादकाकडून महागड्या फीचर्सऐवजी, तुम्ही आफ्टर-मार्केटमधून अलॉय व्हील्स, टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम किंवा प्रीमियम सीट कव्हर्स निवडू शकता. आफ्टर-मार्केट अॅक्सेसरीज बहुतेकदा कंपनीच्या शोरूम किमतीपेक्षा खूपच स्वस्त असतात आणि अधिक फीचर्स देतात.
advertisement
4. रीसेल व्हॅल्यू आणि नुकसान अँगल
येथे एक छोटीशी अडचण आहे. बेस मॉडेलची रीसेल व्हॅल्यू टक्केवारीच्या बाबतीत चांगली असू शकते, परंतु जुन्या कार बाजारातील लोक फीचर्ससह वाहने शोधण्याचा प्रयत्न करतात. एसी नसलेली कार (जर ती खुप बेसिक कारअसेल) किंवा पॉवर विंडो नसलेली कार नंतर विकणे थोडे कठीण असू शकते. शिवाय, तुम्ही नंतर मोठ्या प्रमाणात बाहेरुन काम केले तर कारच्या मूळ वायरिंगशी तडजोड होण्याचा धोका असतो, ज्यामुळे कंपनीची वॉरंटी रद्द होऊ शकते.
advertisement
5. सेफ्टी फीचर्सशी तडजोड?
जुन्या काळात बेस मॉडलमध्ये सेफ्टी फीचर्स मिळत नव्हते. मात्र आता सरकाकडे नियमांमुळे Airbags, ABS, आणि EBD सारखे आवश्यक सेफ्टी फीचर्स बेस मॉडलमध्येही गरजेचे आहे. खरंतर बेस मॉडलमध्ये तुम्हाला ADAS किंवा 360-डिग्री कॅमेरासारखे अडव्हान्स टेक मिळणार नाही. तुमच्यासाठी बेसिक सेफ्टी आणि इंजीनचा परफॉर्मेंस महत्त्वाचा असेल तर बेस मॉडल एक फायदेशीर डील आहे. मात्र तुम्हाला 'लग्जरी' आणि 'हाय-टेक' एक्सपीरियन्स हवा असेल तर तुम्हाला हे अपूर्ण वाटू शकते
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Feb 03, 2026 6:41 PM IST








