EV Car: आता बिनधास्त घ्या EV Car, येतेय नवी बॅटरी, 12 मिनिटात होईल 80 टक्के चार्ज!

Last Updated:

मार्केटमध्ये आता एकापेक्षा एक दमदार अशा ईलेक्ट्रिक दुचाकी, स्कुटर आणि कार दाखल झाल्या आहेत. पण सर्वात मोठी समस्या ही बॅटरीची आहे.

News18
News18
गेल्या काही वर्षांपासून वाढलेले इंधनाचे दर आणि वाढतं प्रदुषण यावर आळा घालण्यासाठी ईलेक्ट्रिक वाहनं हा बेस्ट पर्याय यशस्वी ठरला आहे. मार्केटमध्ये आता एकापेक्षा एक दमदार अशा ईलेक्ट्रिक दुचाकी, स्कुटर आणि कार दाखल झाल्या आहेत. पण सर्वात मोठी समस्या ही बॅटरीची आहे. कारण, बॅटरी चार्जिंगसाठी जास्त वेळ लागतो आणि एकदा चार्ज केल्यानंतर ती जास्त अंतर पार करत नाही. जर या दोन्ही समस्या सोडवल्या गेल्या तर लोकांना पेट्रोल आणि डिझेलपेक्षा ई-कार जास्त आवडतील. एका युरोपियन कंपनीने एकाच वेळी या दोन्ही समस्या सोडवल्या आहेत. या कंपनीने edge574 Blade नावाची बॅटरी बनवली आहे, जी फक्त 12 मिनिटांत 80 टक्के चार्ज होते आणि प्रत्येक मिनिटाला चार्जिंगवर 66 किलोमीटरची रेंज देते.
या बॅटरीचे सर्वात मोठं फिचर म्हणजे तिचा चार्जिंग वेळ. edge574 ला 10 ते 80 टक्के चार्ज होण्यासाठी फक्त 12 मिनिटे लागतात. ही बॅटरी ElevenEs नावाच्या कंपनीने बनवली आहे आणि तिचा दावा आहे की, ही बॅटरी प्रत्येक 1 मिनिटाच्या चार्जिंगवर 66 किलोमीटर अंतर कापू शकते. याचा अर्थ असा की, ती चार्जिंगच्या प्रत्येक सेकंदाला एक किलोमीटर अंतर कापेल.पण, हे चार्जिंग 25 अंश सेंटीग्रेड म्हणजेच खोलीच्या तापमानावर केले पाहिजे. हा चार्जिंग मोड सध्या रस्त्यावर चालणाऱ्या कोणत्याही EV पेक्षा वेगवान आहे.
advertisement
बॅटरीसाठी तापमान महत्त्वाचं
या बॅटरीची कार्यक्षमता वाढवण्यात तापमान सर्वात महत्त्वाची भूमिका बजावते. खोलीच्या तापमानाला जरी तिची सर्वोत्तम कामगिरी दिसून येते, तरी ती १० अंश सेंटीग्रेडवरही चांगली कामगिरी करते. बॅटरी पूर्णपणे चार्ज होण्यासाठी फक्त १८ मिनिटं लागतात. जर ही बॅटरी १० अंशांवर चार्ज केली तर ती ४४ किलोमीटर प्रति मिनिट रेंज देते. तर ० अंशांवर चार्ज केली तर तुम्हाला २५ किलोमीटर प्रति मिनिट चार्जिंगची रेंज मिळेल. बॅटरी पूर्णपणे चार्ज केल्यावर ४१५ किलोवॅटची पॉवर देते.
advertisement
लांबपल्ल्याच्या प्रवासाठी उत्तम बॅटरी
ElevenEs कंपनीची edge574 बॅटरी लांब ट्रिपसाठी बेस्ट पर्याय आहे. त्यात २१० सेल्सचा पॅक आहे, जो पूर्णपणे चार्ज झाल्यानंतर १ मेगावॅटची पॉवर देतो. ही बॅटरी केवळ मजबूत पॉवरच देत नाही तर तिची रेंज देखील खूप जास्त आहे. बॅटरी ५ लाख किलोमीटरपर्यंत वापरली जाऊ शकते, जी सध्याच्या इतर कोणत्याही बॅटरीपेक्षा खूपच जास्त आहे. ही बॅटरी कारच्या चेसिसमध्ये आरामात बसते आणि तापमान शून्यापेक्षा ३० अंश सेंटीग्रेड खाली आणि ६० अंशांपेक्षा जास्त असतानाच डिस्चार्ज होण्यास सुरुवात करते. ते ५५ अंश सेंटीग्रेडपर्यंतही सामान्य वीज देते. शून्यापेक्षा १० अंश कमी तापमानातही ते ७५ टक्के वीज देऊ शकते.
view comments
मराठी बातम्या/ऑटो/
EV Car: आता बिनधास्त घ्या EV Car, येतेय नवी बॅटरी, 12 मिनिटात होईल 80 टक्के चार्ज!
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement