7.50 कोटींची Ferrari जप्त, RTO ने फाडली 1.50 कोटींची 'पावती', कारचं महाराष्ट्र कनेक्शन उघड
- Published by:sachin Salve
Last Updated:
कारच्या मालकाने कर्नाटकात रोड टॅक्स भरला नव्हता. ही कार महाराष्ट्रात नोंदणीकृत होती, जिथं लक्झरी वाहनांवर कर कमी आहे.
जर चुकून तुम्ही सिग्नल तोडलं तर वाहतूक पोलीस तुम्हाला पकडणार आणि पावती फाडणार, किंवा वाहन तपासणी दरम्यान लायसन्स नसेल तर पावती नक्की, आता हे मध्यमवर्गीय कुटुंबीयांसोबत नेहमी घडतं. मात्र, बंगळुरूमधून एक धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे. टॅक्स चोरीच्या आरोपाखाली आरटीओच्या अधिकाऱ्यांनी ७.५ कोटी रुपये किंमतीची लाल रंगाची फेरारी (Ferrari) एसएफ९० स्ट्रॅडेल कार जप्त केली आहे. कारच्या मालकाने कर्नाटकात रोड टॅक्स भरला नव्हता. ही कार महाराष्ट्रात नोंदणीकृत होती, जिथं लक्झरी वाहनांवर कर कमी आहे. ही कार अनेकदा बंगळुरूमध्ये दिसली होती, परंतु मालकाने कर्नाटकात ती नोंदणीकृत केली नव्हती.
कर्नाटकात महागड्या वाहनांवर रोड टॅक्स खूप जास्त आहे. परंतु या कारच्या मालकाने बंगळुरूमध्ये त्याची नोंदणी केली नाही किंवा इथं रोड टॅक्स भरला नाही. माहिती मिळाल्यानंतर, बंगळुरू दक्षिण आरटीओने चौकशी सुरू केली आणि कागदपत्रे तपासल्यानंतर कार जप्त केली.
आरटीओने मालकाला नोटीस
सर्वात आधी आरटीओने मालकाला नोटीस पाठवण्यात आली होती, ज्यामध्ये स्पष्ट सांगितलं होतं, जर गुरुवारी संध्याकाळपर्यंत कर भरला नाही तर कायदेशीर कारवाई केली जाईल. यानंतर, मालकाने ताबडतोब १.४२ कोटी रुपये कर आणि दंड भरला. कर्नाटक परिवहन विभागाच्या ही सर्वात मोठ्या दंड वसुलींपैकी एक मानली जात आहे. हे प्रकरण कर्नाटकात सुरू असलेल्या मोठ्या तपासाचा एक भाग आहे, ज्यामध्ये आरटीओ लक्झरी वाहनांच्या करचोरीवर कडक भूमिका घेत आहे. फेब्रुवारीमध्येही विभागाने ३० महागड्या गाड्या जप्त केल्या होत्या, ज्यामध्ये फेरारी, पोर्शे, बीएमडब्ल्यू, रेंज रोव्हर सारख्या वाहनांचा समावेश होता.
advertisement
एका वर्षापेक्षा जास्त काळ चालणाऱ्या वाहनांसाठी नोंदणी आवश्यक
मुळात कायद्यानुसार, जर कर्नाटकात एखादे वाहन एक वर्षापेक्षा जास्त काळ चालत असेल तर त्याची तिथे नोंदणी करून रोड टॅक्स भरणे आवश्यक आहे. हा नियम रस्ते आणि पायाभूत सुविधांच्या देखभालीसाठी आहे. अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की, ही कारवाई आवश्यक आहे जेणेकरून सर्व वाहन मालक कर नियमांचे पालन करतील आणि राज्यातील रस्त्यांच्या देखभालीत योगदान देतील.
Location :
Bangalore [Bangalore],Bangalore,Karnataka
First Published :
July 04, 2025 11:41 PM IST
मराठी बातम्या/ऑटो/
7.50 कोटींची Ferrari जप्त, RTO ने फाडली 1.50 कोटींची 'पावती', कारचं महाराष्ट्र कनेक्शन उघड