GST 2.0 चा असाही फटका, लोकांनी कार लोन रद्द करण्याचा लावला धडाका, बँका हैराण

Last Updated:

ऑटो इंडस्ट्रीमध्ये याचे पडसाद उमटायला सुरुवात झाले आहे. वाहन उत्पादक कंपन्यांनी आपल्या वाहनांच्या किंमती कमी केल्या आहे.

News18
News18
दिल्ली: केंद्र सरकारने जीएसटीच्या कर रचनेत बदल केला आहे. आता २८ टक्के जीएसटी स्लॅब रद्द झाला आहे. या निर्णयामुळे सर्वच क्षेत्रामध्ये परिणाम झाले आहे. पण, ऑटो इंडस्ट्रीमध्ये याचे पडसाद उमटायला सुरुवात झाले आहे. वाहन उत्पादक कंपन्यांनी आपल्या वाहनांच्या किंमती कमी केल्या आहे. तर दुसरीकडे दिल्ली आणि इतर शहरांमध्ये मात्र वेगळीच समस्या निर्माण झाली आहे. मोठ्या प्रमाणांमध्ये लोकांनी कार लोन रद्द करण्याची विनंती बँकांकडे केली आहे.
देशभरात २२ सप्टेंबरपासून नव्याने जीएसटी सुधारणा लागू होणार आहे. त्यानंतर वाहनांच्या किमती कमी होतील. नुकत्याच झालेल्या ५६ व्या जीएसटी कौन्सिलच्या बैठकीत लहान इंजिन वाहनांवरील (१,२०० सीसी पर्यंत) जीएसटी दर २८ टक्क्यांवरून १८ टक्के करण्याचा निर्णय घेण्यात आला. याचा परिणाम असा झाला आहे की, ज्या लोकांनी आधीच कार खरेदी करण्यासाठी कर्ज मंजूर केलं होतं ते आता २२ सप्टेंबरनंतर नवीन दरांवर कार खरेदी करण्याची वाट पाहत आहेत.
advertisement
ग्राहकांचा फायदा पण बँकेचं नुकसान
'अनेक ग्राहकांनी कार लोन रद्द करण्यासाठी विनंती केली आहे. यासाठी त्यांनी लोन रद्द करण्याचे शुल्कही भरण्याची तयारी केली आहे. नवीन दरांवर कार खरेदी केल्याने त्यांची अधिक बचत होईल. बँका आधीच होम आणि कार लोनवरील प्रक्रिया शुल्क माफ करून ग्राहकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करत आहेत, परंतु जीएसटी कपातीमुळे ग्राहकांना अचानक वाट पाहावी लागली आहे' अशी माहिती एका सार्वजनिक क्षेत्रातील बँकेच्या अधिकाऱ्याने दिली.
advertisement
नवीन जीएसटी दरामुळे १० टक्के फायदा
जर कार डीलरने पावती तयार केली असेल तर जुने दर लागू होतील. पण, जर अद्याप बिल तयार केले नसेल, तर ग्राहक २२ सप्टेंबरपासून कमी केलेल्या कराचा फायदा घेऊ शकतात. यामुळेच सध्या वाहनांच्या विक्रीत मंदी आहे. श्राद्ध पक्षामुळे ग्राहक खरेदी पुढे ढकलत आहेत. बरेच लोक आता नियोजित मॉडेलऐवजी चांगली आवृत्ती खरेदी करण्याचा विचार करत आहेत, कारण त्यांना नवीन दरांमुळे १० टक्क्यांपर्यंतचा फायदा मिळू शकतो.
advertisement
ऑटो कंपन्यांवर आणि नवीन कर रचनेवर परिणाम
आता जीएसटी दर कपातीसह सेस सुद्धा रद्द होणार आहे. त्यामुळे  सुमारे २,५०० कोटी रुपयांचा सेस ऑटो कंपन्यांच्या बुक्समध्ये अडकून राहील. सध्या, कारवरील एकूण कर २९% ते ५०% पर्यंत आहे, जो इंजिन क्षमता आणि लांबीवर अवलंबून असतो. परंतु, नवीन दरांनंतर, १,२०० सीसी पर्यंतच्या पेट्रोल वाहनांवर आणि १,५०० सीसी पर्यंतच्या डिझेल वाहनांवर फक्त १८% जीएसटी आकारला जाईल. मोठ्या इंजिन आणि एसयूव्हीवर ४०% पर्यंत जीएसटी सुरू राहील. याचा सर्वात जास्त फायदा लहान आणि मध्यम श्रेणीच्या कार खरेदीदारांना होईल.
मराठी बातम्या/ऑटो/
GST 2.0 चा असाही फटका, लोकांनी कार लोन रद्द करण्याचा लावला धडाका, बँका हैराण
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement