E Bike Taxi: राज्यात आता ई-बाईक टॅक्सी सुरू होणार, पहिल्या 1.5 किमीसाठी भाडे जाहीर

Last Updated:

“महाराष्ट्र बाईक टॅक्सी नियम, २०२५” अंतर्गत राज्यात सेवा देणाऱ्या इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांचे भाडेदर राज्यात प्रथमतः करण्यात येत आहेत.

News18
News18
मुंबई: महायुती सरकारने अलीकडे खासगी टॅक्सी आणि दुचाकी कंपन्यांना मुंबई आणि पुण्यात परवानगी दिली आहे. आता ईलेक्ट्रिक वाहनांमधील परवाना प्राप्त दुचाकी ॲग्रीगेटर धारकांना आता यापुढे राज्य परिवहन प्राधिकरणाने १८ ऑगस्ट २०२५ रोजी झालेल्या बैठकीत निश्चित केलेल्या भाड्याप्रमाणे भाडे आकारणी करणे बंधनकारक असणार आहे. त्यामुळे पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे आकारावे लागणार आहे.
महाराष्ट्र सरकारने अलीकडे ओला, उबेर या खासगी कार सेवेप्रमाणेच रॅपिडो टॅक्सी सेवेला परवानगी दिली होती.  मुंबईत बाईक टॅक्सी बाबत परिवहन विभागाने असा निर्णय घेतला आहे. मुंबईत आता रॅपिडो सारख्या बाइक सर्विस मुंबईत सुरू होणार आहे. बाईक टॅक्सी सुरू करतांना महिला सुरक्षेची विशेष काळजी घेतली जाणार आहे. बाईक चालकाला मागे बसलेल्या महिला प्रवाशांसाठी बाईकच्या मधोमध पार्टीशन लावणे बंधनकारक असणार आहे.
advertisement
किती आकारणार भाडे? 
“महाराष्ट्र बाईक टॅक्सी नियम, २०२५” अंतर्गत राज्यात सेवा देणाऱ्या इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांचे भाडेदर जाहीर केले आहे.  राज्यात सदर भाडेदरामध्ये एकसूत्रता, समानता असावी यासाठी राज्य परिवहन प्राधिकरणाने बैठकीत “महाराष्ट्र बाईक टॅक्सी नियम, २०२५” अंतर्गत राज्यात सेवा देणाऱ्या इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांचे भाडेदर प्रति कि.मी. १०.२७ रुपयेप्रमाणे आकारणी करण्यास मान्यता दिली. ॲग्रीगेटर बाईक टॅक्सीचा पहिला टप्पा १.५ कि.मी. असल्यामुळे पहिल्या टप्याचे भाडे १५ रुपये असेल आणि त्यानंतर पुढील प्रत्येक किलोमीटर दराप्रमाणे आकारणी करण्यात येईल.
advertisement
राज्य शासनाने ०४ जुलै २०२५ रोजीच्या अधिसूचनेद्वारे महाराष्ट्र बाईक-टॅक्सी नियम, २०२५ लागू केलं आहे. मोटार वाहन अधिनियम, राज्य परिवहन प्राधिकरण यांची २७७ वी बैठक अपर मुख्य सचिव, गृह विभाग (परिवहन) तथा अध्यक्ष, राज्य परिवहन प्राधिकरण यांच्या अध्यक्षतेखाली १८ ऑगस्ट २०२५ रोजी झाली होती.
राज्य परिवहन प्राधिकरणाने या बैठकीत मे. उबेर इंडिया सिस्टीम प्रा.लि, मे. रोपेन ट्रान्सपोर्टशन सव्हिसेस प्रा.लि, मे. ॲनी टेक्नोलॉजीसेस प्रा.लि यांना ३० दिवसाकरीता “मुंबई महानगर क्षेत्राकरीता” Provisional Licence जारी करण्यास मान्यता दिली. त्याचप्रमाणे अर्जदाराकडून ३० दिवसाच्या आत सर्व अटींची पूर्तता झाल्यानंतर पक्का परवाना प्रदान करण्याच्या अंतिम मान्यतेसाठी राज्य परिवहन प्राधिकरणासमोर सादर करण्याचे निर्देश प्राधिकरणाने दिले, असे अपर परिवहन आयुक्त यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळवलं आहे.
मराठी बातम्या/ऑटो/
E Bike Taxi: राज्यात आता ई-बाईक टॅक्सी सुरू होणार, पहिल्या 1.5 किमीसाठी भाडे जाहीर
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement