Maruti ची 33 किमी मायलेज देणारी बजेट कार, आता 67 हजाराने आणखी स्वस्त!

Last Updated:

मारुती 800 नंतर ऑल्टो K10 ने जागा घेतली. गेली अनेक वर्ष K10 ने विक्रीचा रेकॉर्ड कायम ठेवला होता. पण...

News18
News18
भारतातील सर्वात मोठी कार उत्पादक कंपनी मारुती सुझुकीने मध्यमवर्गीय कुटुंबीयांनी डोळ्यासमोर ठेवून एकापेक्षा एक अशा स्वस्त आणि मायलेजदार गाड्यांची निर्मिती केली. मारुती 800 नंतर ऑल्टो K10 ने जागा घेतली. गेली अनेक वर्ष K10 ने विक्रीचा रेकॉर्ड कायम ठेवला होता. पण, गेल्या काही महिन्यात अचानक Alto K10 च्या विक्रीत घट झाली. त्यामुळे आता मारुती सुझुकीने जुलै महिन्यात Alto K10 वर मोठा डिस्काउंट जाहीर केला आहे. जुलै महिन्यात जर तुम्ही Alto K10 खरेदी करणार असाल तर मारुती तुम्हाला तब्बल  67,100 रुपये इतका डिस्काउंट देत आहे.
मारुती सुझुकीने ऑटोमॅटिक (AGS) व्हेरिएंटवर सगळ्यात जास्त ऑफर देत आहे. एवढंच नाहीतर कॅश डिस्काउंटसोबतच एक्सचेंज बोनस आणि स्क्रॅपेज बोनस सारखे फायदे सुद्धा मिळतील. या कारची सुरुवाती किंमत 4.23 लाख रुपये आहे. ही देशातील सगळ्यात स्वस्त कार आहे. ही ऑफर ३१ जुलैपर्यंत असणार आहे.
Alto K10 मध्ये ६ एअरबॅग्स
अल्टो K10 च्या बेस मॉडेलमध्ये अनेक चांगले फीचर्स दिली आहेत. या फोर सीटर कारमध्ये ५ जण बसू शकतात. कारमध्ये बूटस्पेसदेखील भरपूर आहे. या कारचं डिझाईन तरुणांना आवडेल अशा पद्धतीने केलं आहे.   अल्टो K10 मध्ये सुरक्षिततेसाठी अनेक चांगली फीचर्स आहेत. या कारमध्ये आता केंद्र सरकारच्या नियमानुसार, ६  एअरबॅग्ज, सीट बेल्ट, अँटी-लॉक ब्रेकिंग सिस्टीमसह ईबीडी देखील आहेत. ही लहान कुटुंबासाठी अतिशय योग्य कार आहे.  उत्तम ब्रेकिंगसाठी यात डिस्क आणि ड्रम ब्रेकची सुविधा आहे.
advertisement
Alto K10 चं इंजिन
कारमध्ये 1.0L K10C पेट्रोल इंजिन असून, ते 49KW पॉवर आणि 89Nm टॉर्क जनरेट करतं. या कारमध्ये ग्राहकांना 5 स्पीड मॅन्युअल आणि AGS गिअरबॉक्सची सुविधा मिळते. या कारच्या पेट्रोल मॅन्युअल व्हॅरिएंटचं मायलेज 24.39 kmpl आहे. पेट्रोल एएमटीचं मायलेज 24.90 kmpl आहे. सीएनजी मोडवर ही कार एक किलो सीएनजीमध्ये 33.85 किलोमीटरपर्यंत मायलेज देते. या कारमध्ये 27 लिटरची फ्युएल टँक आणि 55 लिटरची सीएनजी टँक आहे.
मराठी बातम्या/ऑटो/
Maruti ची 33 किमी मायलेज देणारी बजेट कार, आता 67 हजाराने आणखी स्वस्त!
Next Article
advertisement
Shweta Tiwari: बोल्डनेसमध्ये लेकीला देते टक्कर, श्वेता तिवारी पलकपेक्षा किती मोठी? वयाचा फरक वाचून बसेल धक्का!
बोल्डनेसमध्ये लेकीला देते टक्कर, श्वेता तिवारी पलकपेक्षा किती मोठी?
    View All
    advertisement