Car: 84 लाखांची मर्सिडीज फक्त 2.50 लाखांना विकली, BJP सरकारच्या निर्णयामुळे 'तो' ढसाढसा रडला!
- Published by:sachin Salve
- local18
Last Updated:
आपल्या दारात आलिशान किंवा दमदार अशी कार उभी असावी असं प्रत्येकाचं स्वप्न असतं. त्यात जर मग बीएमडब्ल्यू, मर्सिडीज किंवा ऑडी असेल तर विषयच नाही.
आपल्या दारात आलिशान किंवा दमदार अशी कार उभी असावी असं प्रत्येकाचं स्वप्न असतं. त्यात जर मग बीएमडब्ल्यू, मर्सिडीज किंवा ऑडी असेल तर विषयच नाही. काही जणांचं हे स्वप्न स्वप्नचं राहतं पण, हे स्वप्न पूर्ण करणारे फार कमी लोक असतात. कारण या गाड्यांची किंमतच तशी आहे. सहसा, आलिशान कार खरेदी करण्यासाठी तुम्हाला ५० लाखांपासून ते अनेक कोटी रुपये खर्च करावे लागू शकतात. पण कल्पना करा, जर तुम्ही खूप मेहनत करून आणि लाखो रुपये खर्च करून एक आलिशान कार खरेदी केली आणि ती कवडीमोल भावात विकावी लागली तर? दचूक नका, दिल्लीमध्ये एका वरुण विज नावाच्या व्यक्तीसोबत सरकारी नियमामुळे हा किस्सा घडला आहे.
८४ लाखांची कार २.५ लाखात विकली
दिल्लीच्या वरुण विजने २०१५ मध्ये मर्सिडीज-बेंझ ML350 ही आलिशान कार ८४ लाख रुपयांना विकत घेतली होती. पण आता दिल्ली सरकारच्या नवीन नियमानुसार, १० वर्षांपेक्षा जुन्या डिझेल वाहनांना आता इंधन मिळणार नाही, असं धोरण जाहीर करण्यात आलं आहे. या सक्तीमुळे वरुण विज याांनी आपली मर्सिडीज कार कार फक्त २.५ लाखांना विकावी लागली. कारणस ही कारण आता दिल्लीत काहीच उपयोगाची नव्हती.
advertisement
दिल्लीत डिझेल बंदी
दिल्लीमध्ये आता १० वर्षांपेक्षा जुन्या डिझेल वाहनांना आता इंधनच मिळणार नाही आणि १५ वर्षांपेक्षा जुन्या पेट्रोल वाहनांनाही हाच नियम लागू आहे. पण हा नियम सध्या फक्त दिल्लीतच लागू आहे. जर वरुण यांनी ही कार दिल्लीबाहेरील एखाद्याला विकली असती तर त्याला कदाचित त्याची किंमत खूप चांगली मिळाली असती. यासाठी अनेक ऑनलाइन वेबसाईट आहेत. ज्या संपूर्ण भारतात सेकंड हँड कार विकतात. अशा परिस्थितीत, वरुण यांना त्याच्या कारसाठी खूप चांगली किंमत मिळू शकली असती.
advertisement
सीएनजी कीट
कारमध्ये सीएनजी किट बसवणे हा देखील एक चांगला पर्याय असू शकतो. दिल्लीत सीएनजी कारवर बंदी नाही, म्हणून जर तुम्ही तुमच्या कालबाह्य झालेल्या कारमध्ये सीएनजी बसवले तर तुम्ही सहजपणे इंधन भरू शकता आणि बराच काळ गाडी चालवू शकता. सीएनजी पेट्रोल आणि डिझेलपेक्षाही स्वस्त आहे, ज्यामुळे इंधनाचा बराच खर्च दीर्घकाळात वाचू शकतो.
Location :
Delhi
First Published :
July 02, 2025 11:26 PM IST
मराठी बातम्या/ऑटो/
Car: 84 लाखांची मर्सिडीज फक्त 2.50 लाखांना विकली, BJP सरकारच्या निर्णयामुळे 'तो' ढसाढसा रडला!