PUC:...नाहीतर पंपावर मिळणार नाही पेट्रोल, महायुती सरकारचा मोठा निर्णय, सरनाईकांची घोषणा

Last Updated:

भविष्यातील पिढीला प्रदूषणमुक्त पर्यावरण देण्यासाठी सध्याच्या पिढीने स्वतः वर पर्यावरणपूरक काही निर्बंध घालून घेणं गरजेचं आहे. त्या उद्देशाने प्रत्येक वाहनाला दिलं...

News18
News18
मुंबई : सध्या जीएसटीच्या दरात कपात झाल्यामुळे ऑटो इंडस्ट्रीमध्ये वाहनांच्या किंमती चांगल्याच कमी झाल्या आहेत. त्यामुळे सर्वत्र आनंदाचं वातावरण आहे. पण, महाराष्ट्र सरकारने आता नवीन निर्णय घेतला आहे. जर वाहनांचं पीयूसी (PUC) अर्थात प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्र नसेल तर पेट्रोल पंपावर पेट्रोल मिळणार नाही, असे आदेशच राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले आहे. या निर्णयामुळे पीयूसी नसणाऱ्या वाहनांना फटका बसण्याची शक्यता आहे.
परिवहन आयुक्त कार्यालयात बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी पीयूसी संदर्भात काही महत्त्वाचे निर्णय घेतले आहे. यासह बैठकीत परिवहन विभागाच्या कार्यालयामध्ये आगीची पूर्वसूचना देणारी यंत्रणा लावणे, परिवहन भवन बांधकाम आदी बाबींचा आढावाही परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी बैठकीत घेतला.
"भविष्यातील पिढीला प्रदूषणमुक्त पर्यावरण देण्यासाठी सध्याच्या पिढीने स्वतः वर पर्यावरणपूरक काही निर्बंध घालून घेणं गरजेचं आहे. त्या उद्देशाने प्रत्येक वाहनाला दिलं जाणारं प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्र (PUC) हे वैध असणे गरजेचं आहे. अवैध प्रमाणपत्र निर्मितीची साखळी पूर्णतः बंद झाली पाहिजे, यासाठी भविष्यात प्रत्येक पेट्रोल पंपावर ‘नो पीयूसी नो फ्युएल’ उपक्रमाची अंमलबजावणी सक्तीने करण्यात यावी, असे आदेशच परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले आहे.
advertisement
पेट्रोल पंपावर CCTV व्हिडीओत नंबरप्लेट होईल कैद
"राज्यातील प्रत्येक पेट्रोल पंपावर सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या आधारे इंधन भरण्यासाठी येणाऱ्या प्रत्येक वाहनाचा वाहन क्रमांक तपासला (स्कॅन करून ) जाईल. जेणेकरून त्या माध्यमातून संबंधित वाहनाच्या प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्राची वैधता कळेल. जर त्या वाहनाचे प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्र वैध नसेल तर त्या वाहनाला इंधन दिले जाणार नाही.
advertisement
पेट्रोल पंपाशेजारीच मिळेल PUC प्रमाणपत्र
त्याच पेट्रोल पंपावर प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्र ताबडतोब काढून देण्याची व्यवस्था देखील केली जाईल. जेणेकरून वाहन चालकाची गैरसोय होणार नाही. या प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्राला युनिक आयडेंटी (UID) असणार आहे. त्यामुळे प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्राची वेळोवेळी वैधता तपासणी केली जाऊ शकते.
परिवहन विभाग राबवणार धडक मोहीम
भविष्यात वाहन विक्री करणाऱ्या शोरूम आणि वाहन दुरुस्ती करणारे गॅरेजमध्ये देखील प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्र देण्याची व्यवस्था करण्यात येईल. जेणेकरून रस्त्यावर चालणारे प्रत्येक वाहन हे वैध प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्र असलेलं असेल. ज्यामुळे प्रदूषण पातळी कमी होण्यास मदत होईल. त्याबरोबरच सध्या अवैध पद्धतीने प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्र काढणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यासाठी परिवहन विभागाने मोठी धडक मोहीम राबवावी, अशा सूचनाही परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी यावेळी दिल्या.
मराठी बातम्या/ऑटो/
PUC:...नाहीतर पंपावर मिळणार नाही पेट्रोल, महायुती सरकारचा मोठा निर्णय, सरनाईकांची घोषणा
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement