आता एसयूव्ही घेण्याचं स्वप्न होईल पूर्ण! भारतात येतेय सगळ्यात स्वस्त धाकड SUV, टाटाला थेट टक्कर

Last Updated:

ही एसयूव्ही परवडणाऱ्या किमतीत बेस्ट ऑप्शन असणार आहे. सध्या मार्केटमध्ये असलेल्या सर्वात स्वस्त टाटाच्या नेक्सॉनला थेट टक्कर देणार आहे

News18
News18
भारतात सध्या एकापेक्षा एक अशा SUV ने मार्केट व्यापून गेलं आहे. मारुती सुझुकी, हुंदई, होंडा, टाटा मोटर्स आणि महिंद्राने एकापेक्षा एक अशा SUV गाड्या लाँच केल्या आहेत. आता एकेकाळी मार्केटमध्ये दबादबा निर्माण करणारी Renault पुन्हा एकदा एक धमाका करण्याच्या तयारीत आहे. Renault भारतातील सर्वात परवडणारी ऑटोमॅटिक Kiger SUV  लाँच करणार आहे. ही एसयूव्ही परवडणाऱ्या किमतीत बेस्ट ऑप्शन असणार आहे. सध्या मार्केटमध्ये असलेल्या सर्वात स्वस्त टाटाच्या नेक्सॉनला थेट टक्कर देणार आहे. मुळात,  Renault Kiger  ची विक्री वाढवण्यासाठी, रेनॉल्ट Kiger फेसलिफ्ट लाँच करणार आहे. अलीकडेच, या एसयूव्ही चाचणी दरम्यान दिसली आहे.
Renault Kiger फेसलिफ्ट भारतात टेस्ट दरम्यान दिसली आहे. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी या एसयूव्हीमध्ये महत्त्वाचे अपडेट्स दिले जाणार आहे. ही देशातील सर्वात परवडणाऱ्या एसयूव्हींपैकी एक ठरणार आहे. विशेष म्हणजे, Renault Kiger ला सेफ्टीमध्ये ४-स्टार सेफ्टी रेटिंग आहे. आता, रेनॉल्ट किगरला आवश्यक अपडेट देण्यास तयार आहे. तर आपण फेसलिफ्टकडून काय अपेक्षा करावी?
advertisement
Renault Kiger फेसलिफ्ट
किगर फेसलिफ्टच्या नवीन फोटोमधून एसयूव्हीच्या डिझाइनमध्ये काही मोठे बदल केल्याचं दिसून येत आहे., एसयूव्हीचा चेहरा सध्याच्या मॉडेलसारखाच आहे. पण  एक नवीन फ्रंट ग्रिल आणि एक नवीन फ्रंट बंपर दिला आहे. याशिवाय, एसयूव्हीमध्ये फॉग लॅम्प देखील असल्याची शक्यता आहे, जे एक Renault Kiger ला वेगळा लूक देतील. हेडलॅम्प डिझाइन सध्याच्या मॉडेलसारखेच आहे. पण, नव्याा मॉडेलमध्ये थोडेफार बदल केलेले आहे.  मागील प्रोफाइल देखील सारखेच दिसत आहे, पण, विक्रीसाठी ठेवलेल्याा मॉडेलमध्ये नवीन टेल लॅम्प आणि नवीन बंपर असं शकतं.
advertisement
इंटीरिअरमध्ये मोठे बदल
Renault Kiger फेसलिफ्टच्या इंटीरिअरमध्ये काही डिझाइन बदल देखील केले जाणार आहे. सुरुवातीला, डॅशबोर्ड डिझाइन नवीन फिचर्ससह असणार आहे. तसंच, निसान मॅग्नाइट प्रमाणे, किगर फेसलिफ्टमध्ये नवीन सॉफ्ट टच मटेरियल मिळू शकतं. असं असले तरी, एसयूव्हीला फ्रेश लूक देण्यासाठी किगरमध्ये काही महत्त्वपूर्ण डिझाइन अपडेट्स मिळतील.
इंजिन आणि पॉवर
इंजिनच्या बाबत बोलायचं झालं तर, Renault Kiger मध्ये समान पॉवरट्रेन पर्याय असतील. एसयूव्हीमध्ये १.०-लिटर टर्बो पेट्रोल इंजिनमध्ये ९९bhp आणि १५२Nm पॉवर जनरेट आणि १.०-लिटर NA पेट्रोल इंजिन ७१bhp आणि ९६Nm पॉवर जनरेट करते. टर्बो पेट्रोल व्हेरिएंटमध्ये ५-स्पीड एमटी किंवा सीव्हीटी गिअरबॉक्स मिळतो. तर एस्पिरेटेड पेट्रोल इंजिनमध्ये ५-स्पीड एमटी किंवा एएमटी मिळते. Renault Kiger फेसलिफ्टची किंमत 6.15 लाखांपासून सुरू होण्याची शक्यता आहे.
मराठी बातम्या/ऑटो/
आता एसयूव्ही घेण्याचं स्वप्न होईल पूर्ण! भारतात येतेय सगळ्यात स्वस्त धाकड SUV, टाटाला थेट टक्कर
Next Article
advertisement
Superstar Fathers Flop Sons: सुपरस्टार वडिलांची महाफ्लॉप मुलं, सिनेमे आपटले; मेकर्सही झाले कंगाल
सुपरस्टार वडिलांची महाफ्लॉप मुलं, सिनेमे आपटले; मेकर्सही झाले कंगाल
    View All
    advertisement