tata ची कमाल, आणखी एका SUV ने काढलं नाव, आधीच्या गाडीला टाकलं मागे!
- Published by:sachin Salve
- trending desk
Last Updated:
या कंपनीच्या कार सेफ्टी रेटिंग्जमध्ये आघाडीवर आहेत. यात टाटा पंच ईव्ही एसयूव्हीने तर फाईव्ह स्टार सेफ्टी रेटिंग मिळवलेले आहे
नवीन कार खरेदी करताना ग्राहक आता कारच्या फीचर्ससह तिची सेफ्टी रेटिंग्ज देखील विचारात घेतात. टाटा मोटर्स ही देशातील दिग्गज वाहन उत्पादक कंपनी आहे. या कंपनीच्या कार सेफ्टी रेटिंग्जमध्ये आघाडीवर आहेत. यात टाटा पंच ईव्ही एसयूव्हीने तर फाईव्ह स्टार सेफ्टी रेटिंग मिळवलेले आहे. ही कार सर्वात किफायतशीर मानली जाते. तुम्ही जर कार खरेदीचा विचार करत असाल तर सुरक्षेच्या दृष्टीने टाटा पंच ईव्ही हा चांगला पर्याय ठरू शकतो. या कारने सेफ्टी रेटिंगबाबत टाटाच्या खास कार मॉडेल्सना पिछाडीवर टाकले आहे.
भारतात सर्वात सुरक्षित कार कोणती कंपनी बनवते, या प्रश्नाचे एक उत्तर आहे आणि ते म्हणजे टाटा मोटर्स. इलेक्ट्रिक वाहनं असो अथवा इंटर्नल कम्बशन इंजिन अर्थात आयसीई मॉडेल्स, टाटा कारमध्ये सर्वोत्तम सुरक्षा मानके पाहायला मिळतात. ग्लोबल एनसीएपीमध्ये या वाहनांनी मिळवलेल्या सेफ्टी रेटिंगमुळे हे सिद्ध झाले आहे. तसेच कंपनीच्या कार मॉडेल्सनी भारतीय एनसीएपीमध्ये देखील लक्षवेधी कामगिरी केलेली आहे. आता टाटा पंच ईव्ही या कंपनीच्या सर्वात परवडणाऱ्या इलेक्ट्रिक एसयूव्हीला 5 स्टार सेफ्टी रेटिंग मिळालं आहे.
advertisement

नेक्सॉन ईव्ही, हॅरियर आणि सफारी या तीन एसयूव्हींना 5 स्टार सेफ्टी रेटिंग मिळालेले असून, त्यात आता पंच ईव्ही या चौथ्या मॉडेलचा समावेश झाला आहे. याचा अर्थ टाटाच्या चार एसयूव्हींना आत्तापर्यंत 5 स्टार सेफ्टी रेटिंग मिळालं आहे. टाटा पंच ईव्ही, टाटा नेक्सॉन ईव्ही, टाटा हॅरियर आणि टाटा सफारीने अॅडल्ट ऑक्युपंट प्रोटेक्शन आणि चाईल्ड ऑक्युपंट प्रोटेक्शन अशा दोन्ही श्रेणींमध्ये 5 स्टार रेटिंग मिळवलं आहे. विशेष बाब म्हणजे, या चारही एसयूव्ही कारने 5 स्टार सेफ्टी रेटिंग मिळवलं असलं तरी गुणांच्या बाबतीत टाटा पंच ईव्ही ही नेक्सॉन ईव्ही, हॅरियर आणि सफारीच्या तुलनेत सरस ठरली आहे.
advertisement
टाटा पंचची किंमत 10.99 लाख रुपये ते 15.49 लाख रुपयांपर्यंत (एक्स शोरूम) आहे. मार्केटमध्ये या कारला थेट प्रतिस्पर्धी सध्या नाही. टाटा पंच ईव्हीच्या स्टँडर्ड व्हॅरियंटमध्ये 60Kw मोटर (114Nm), 25Kwh बॅटरी पॅक देण्यात आले असून, ही कार 315KM रेंज (एमआयडीसी) देते असा दावा करण्यात आला आहे. तसेच लाँग रेंज व्हॅरियंटमध्ये 90kW मोटर (190 Nm), 35kwh बॅटरी पॅक देण्यात आले असून, ही कार 421Km रेंज (एमआयडीसी) असा दावा केला गेला आहे. सेफ्टी रेटिंगचा विचार करता, पंच ईव्हीला अॅडल्ट सेफ्टी श्रेणीत 32 पैकी 31.46 पॉईंट मिळाले आहेत. दुसरीकडे सफारी आणि हॅरियरला या श्रेणीत प्रत्येकी 30.08 पॉईंट मिळाले आहेत. नेक्सॉन ईव्हीला या श्रेणीत 29.86 पॉईंट मिळाले आहेत. चाईल्ड सेफ्टी श्रेणीत, पंच ईव्हीला 49 पैकी 45 पॉईंट मिळाले आहेत. त्या तुलनेत नेक्सॉन ईव्हीला 44.95 पॉईंट तर सफारी आणि हॅरियरला प्रत्येकी 44.54 पॉईंट मिळाले आहेत.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
June 14, 2024 10:32 PM IST


