अमेरिकेत 38 लाखांना मिळणारी टेस्ला कार भारतात येताच 70 लाख कशी होते?
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
टेस्लाने भारतात पहिलं शोरुम मुंबईत सुरू केलं आहे. मॉडेल Y RWD ची किंमत 61 लाख 07 रुपये आहे. अमेरिकेत ही कार 38 लाख रुपयांना मिळते. इम्पोर्ट ड्युटीमुळे भारतात महाग आहे.
टेस्लाने भारतात पहिलं शोरुम मुंबईत सुरू केलं आहे. आज टेस्लाने दोन वेगवेगळ्या व्हेरिएट आज लाँच केलं आहे. टेस्लाने भारतात आपली पहिली इलेक्ट्रिक एसयूव्ही (SUV) 'मॉडल Y' च्या किमती जाहीर केल्या आहेत. टेस्लाच्या 'मॉडल Y RWD' ची ऑन-रोड सुरुवातीची किंमत 61 लाख 07 रुपये ठेवण्यात आली आहे. तर लाँग रेंज RWD व्हेरिएंटची किंमत 69.15 लाख रुपये आहे. ही इलेक्ट्रिक कार मुंबई, दिल्ली, गुरुग्राम या तीन शहरांमध्ये उपलब्ध होणार आहे. तिमाहीपासून कंपनी या कारची डिलिव्हरी सुरू करणार असल्याची माहिती समोर आली आहे.
अमेरिकेत स्वस्त भारतात इतकी महाग का?
अमेरिकेत ही कार सध्या 38 लाख रुपयांना मिळत असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. भारतात याची किंमत साधारण 60 ते 70 लाख रुपये आहे. यामागचं पहिलं कारण म्हणजे इम्पोर्ट ड्युटी आहे. भारतात ती कार आणण्यासाठी जास्त इम्पोर्ट ड्युटीवर पैसे खर्च करावे लागतात. साधारण एका कारवर 21 लाख रुपयांपर्यंत रक्कम इम्पोर्ट ड्युटीसाठी भरावी लागते. दुसरीकडे लॉजिस्टिक्सचा खर्च देखील आहे. तिसरं आणि महत्त्वाचं म्हणजे वाहतूक आणि कस्टममध्ये होणारा खर्च मोठा आहे. त्यामुळे ही कार भारतात जास्त महाग विकली जात आहे.
advertisement
ट्रम्प यांचं टेरिफ वॉर
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी टेरिफ लावण्याचा निर्णय घेतला आहे. ज्या देशांमध्ये अमेरिकेतून निर्यात होणाऱ्या वस्तूंवर टेरिफ लावला जातो. त्या त्या देशांकडून आयात होणाऱ्या वस्तूंवर देखील टेरिफ लावण्यात येणार आहे. या टेरिफ वॉरमुळे जगभरात भीतीचं वातावरण आहे. शिवाय याचा परिणाम आयात निर्यात करणाऱ्या दोन्ही देशांवर होणार आहे. मोबाईल पार्ट्स, आयफोन महाग होऊ शकतात. शिवाय इम्पोर्ट ड्युटी जास्त असल्याने भारतात अमेरिकेतून आयात होणाऱ्या वस्तू महाग मिळतात.
advertisement
टेस्लाकडून Y व्हेरिएंट लाँच
टेस्ला कंपनीने Y मॉडेलचे दोन व्हेरिएंट्स सध्या मार्केटमध्ये आणले आहेत (Standard RWD आणि Long Range RWD) सादर केली जातील. Standard RWD व्हेरिएंटमध्ये 60 kWh ची LFP बॅटरी दिली जाईल, जी सुमारे 500 किलोमीटरपर्यंतची ड्रायव्हिंग रेंज देईल आणि ही कार 0 ते 100 किमी/ताशी वेग सुमारे 5.6 सेकंदात पकडू शकते.
advertisement
दुसरीकडे, Long Range RWD व्हेरिएंटमध्ये 75kWh ची NMC बॅटरी असेल, ज्याची रेंज 622 किलोमीटरपर्यंत आहे आणि ही एसयूव्ही 5 सेकंदांपेक्षा कमी वेळात 0 ते 100 किमी/ताशी वेग गाठू शकते.
टेस्ला 'मॉडल Y मध्ये मिळतील हे हाय-टेक फीचर्स
टेस्ला 'मॉडल Yभारतात अनेक अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित फीचर्ससह लॉन्च केली जाईल. यात 'ओव्हर-द-एअर' (Over-the-Air) सॉफ्टवेअर अपडेट्स, मागील सीटसाठी स्वतंत्र टचस्क्रीन आणि इलेक्ट्रिक ॲडजस्टेबल मागील सीट्स दिले जातील अशी प्राथमिक महिती समोर आली आहे. यासोबतच टेस्लाचे प्रीमियम साउंड सिस्टीम आणि टेस्ला ॲपद्वारे 'रिअल-टाईम कंट्रोल'ची (Real-Time Control) सुविधा दिली जाईल.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
July 15, 2025 2:26 PM IST