कारच्या मागच्या काचेवरील या लाइन्स डिझान्स नाहीत, तर वाचवतात जीव; तुम्हाला माहिती नसेल असा वापर
- Published by:Priya Lad
Last Updated:
तुम्ही कारच्या मागच्या काचेवर नीट पाहिलं तर तुम्हाला त्यावर रेषा दिसतील. सर्व कारच्या रिअर ग्लासवर या रेषा असतात.
नवी दिल्ली, 22 डिसेंबर : बाजारात बऱ्याच कंपन्यांच्या कार आहेत. ज्याच्या डिझाइन्स, फिचर्स वेगवेगळे आहेत. पण सर्व कारच्या बाबतीत काही गोष्टी मात्र सारख्या असतात. त्यापैकीच ही एक गोष्ट. कारच्या मागच्या काचेवर असणाऱ्या लाइन्स. तुम्ही कारच्या मागच्या काचेवर नीट पाहिलं तर तुम्हाला त्यावर रेषा दिसतील. सर्व कारच्या रिअर ग्लासवर या रेषा असतात. आता तुम्हाला ही कारवरील डिझाइन वाटेल मात्र ती डिझाइन बिलकुल नाही. तर या रेषा खरंतर जीव वाचवतात.
कारच्या मागच्या काचेवर असलेल्या या रेषांचाही फायदा आहे. त्याचाही वापर केला जातो. कदाचित अनेकांना हे माहिती नसेल. हिवाळ्यात तर या रेषा खूपच फायद्याच्या आहेत. यामुळे कित्येक जीव वाचण्यात मदत होते. आता ते कसं ते सविस्तर पाहुयात.
advertisement
या लाइन्स खरंतर डिफॉगर आहेत. थंडीच्या मोसमात पडणारं धुकं लक्षात घेऊन या रेषा बनवण्यात आल्या आहेत. दाट धुक्यामुळे ड्रायव्हरला मागचं काही दिसत नाही. यामुळे अपघाताचाही धोका असतो. आता चालक किंवा कोणताही प्रवासी गाडीतून पुन्हा पुन्हा बाहेर पडून काच साफ करू शकत नाही. अशा परिस्थितीत ही डिफॉगर लाइन चालकाला मदत करते. केवळ या डिफॉगर लाइनच्या मदतीने चालकांना त्यांच्या मागून येणारी वाहनं पाहता येतात.
advertisement
आता याचा वापर कसा करायचा, असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. ड्रायव्हर डिफॉगर लाइन चालू करून विंडशील्डमधून धुकं काढून टाकतो. फक्त काही सेकंदात, ड्रायव्हर फक्त एक बटण दाबून विंडशील्डमधून धुकं साफ करू शकतो. आता फक्त एक बटण दाबून काच एका क्षणात कशी साफ करता येईल असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. यासाठी गाडीत डिफॉगर स्विच असतो. तो चालू केल्यावर या रेषा गरम होतात कारण त्या धातूपासून बनवलेल्या आहेत. यामुळे काचेवर काचेवर साचलेले पाण्याचे थेंब आणि धुकं कोरडं होऊ लागतं. काही वेळातच सर्व पाण्याचे थेंब सुकतात.
advertisement
यामुळे ड्रायव्हरला मागचं सर्व स्पष्ट दिसतं आणि अपघात टाळता येतो. साहजिकच यामुळे जीव वाचतात.
Location :
Delhi
First Published :
Dec 22, 2023 7:19 PM IST
मराठी बातम्या/ऑटो/
कारच्या मागच्या काचेवरील या लाइन्स डिझान्स नाहीत, तर वाचवतात जीव; तुम्हाला माहिती नसेल असा वापर








