SAIL Salary: दहावी आणि ITI उत्तीर्ण असलेल्यांना स्टील ऑथॉरिटी ऑफ इंडियामध्ये नोकरीची संधी
- Published by:sachin Salve
- trending desk
Last Updated:
सरकारी नोकरी हे अनेक तरुणांचं स्वप्न असतं. त्यासाठी प्रत्येक जण मेहनत घेत असतो.
मुंबई, 31 ऑक्टोबर : सरकारी नोकरी हे अनेक तरुणांचं स्वप्न असतं. त्यासाठी प्रत्येक जण मेहनत घेत असतो. अनेक तरुणांना स्टील ऑथोरिटी ऑफ इंडिया (SAIL) या संस्थेमध्ये अटेंडंट कम टेक्निशियन ट्रेनी ही सरकारी नोकरी फार आवडते. इथे नोकरी मिळवण्यासाठी खूप मेहनत करावी लागते. या पदांसाठी अर्ज करण्याकरिता उमेदवारांनी इयत्ता 10वी आणि ITI उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. या पात्रतेशिवाय उमेदवारांना अर्ज करता येत नाही. तुम्हीदेखील दहावीनंतर आयटीआय कोर्स केला असेल तर स्टील ऑथोरिटी ऑफ इंडिया (SAIL) संस्थेमधली सरकारी नोकरी तुमची वाट पाहतेय.
या पदांवर निवड झालेल्या कोणत्याही उमेदवाराला रु. 26600-3%-38920/- इतकं वेतन मिळू शकतं. तुम्हीही या पदांसाठी अर्ज करण्याची तयारी करत असाल, तर तुम्हाला याबद्दलची सर्व माहिती असणं आवश्यक आहे. स्टील ऑथोरिटी ऑफ इंडिया (SAIL) संस्थेमध्ये नोकरी मिळवायची असेल तर काय करावं लागेल, हे जाणून घेऊ या.
'सेल'मध्ये अटेंडंट कम टेक्निशियन ट्रेनी या पदासाठी मिळणारा पगार
advertisement
या पदांसाठी निवडलेल्या कोणत्याही उमेदवाराला खाली दिलेल्या माहितीनुसार वेतन दिलं जातं
पे स्केल : 26600-3%-38920 रुपये
पे लेव्हल : S-3
बेसिक पे : 26,600 रुपये
महागाई भत्ता : 3931 रुपये
सिटी लेकल अलाउन्स : 240 रुपये
वर्किंग अलाउन्स : 2000 रुपये
टीपीटी/ए : 1200 रुपये
भत्ते (मूळ वेतनाच्या 45%) : 11,970 रुपये
advertisement
ग्रॉस वेतन : 45,941 रुपये
'सेल'मध्ये अटेंडंट कम टेक्निशियन ट्रेनी या पदांवर असलेल्यांना मिळणारे भत्ते आणि लाभ
· औद्योगिक महागाई भत्ता
· कॅफेटेरिया दृष्टिकोन आणि इतर भत्त्यांतर्गत भत्ते,
· अंशदायी भविष्य निर्वाह निधी
· ग्रॅच्युइटी कायद्यानुसार ग्रॅच्युइटी
· स्वत:साठी आणि कुटुंबासाठी मोफत वैद्यकीय उपचार
· घरभाडे भत्ता
सेल अटेंडंट कम टेक्निशियन ट्रेनी यांना कोणतं काम करावं लागतं?
सेल अटेंडंट कम टेक्निशियन ट्रेनी पदासाठी कट-ऑफ गुणांपेक्षा जास्त गुण मिळविणाऱ्या उमेदवारांना रूरकेला किंवा भोपाळ प्लांटमध्ये नियुक्त केलं जातं. तिथे त्यांना पुढील कामं करावी लागतात.
advertisement
- विविध मशीन्स आणि पार्ट्ससाठी फिटर म्हणून काम करणं.
- तांत्रिक बाबी योग्यरीत्या कार्यरत आहेत का याची तपासणी करणं हे इलेक्ट्रिशियनचं काम आहे.
- मशिनिस्ट म्हणून कारखान्यात असलेली मशीन्स सुस्थितीत आहेत की नाहीत याची तपासणी करणं.
सेल अटेंडंट कम टेक्निशियन ट्रेनी करिअर ग्रोथ
सेल अटेंडंट कम टेक्निशियन ट्रेनी परीक्षा पॅटर्नच्या विविध स्तरांमध्ये पात्र ठरलेल्या उमेदवारांना या कंपनीमध्ये प्लेसमेंट मिळते. प्रोबेशन कालावधी पूर्ण झाल्यानंतर त्या कर्मचाऱ्याला कंपनीचे कायमस्वरूपी कर्मचारी म्हणून समाविष्ट केलं जातं. तसंच उमेदवाराने दिलेली सेवा आणि अंतर्गत परीक्षेतल्या कामगिरीच्या आधारे अंतिम पदोन्नती दिली जाते.
advertisement
अशा प्रकारे तुम्हाला 'सेल'मध्ये नोकरी मिळेल
या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी कोणतीही मान्यताप्राप्त संस्था किंवा मंडळातून दहावी उत्तीर्ण केलेली असावी. तसंच, कोणत्याही मान्यताप्राप्त संस्थेतून फिटर/इलेक्ट्रिशियन/मशिनिस्ट संबंधित ट्रेडमध्ये आयटीआय (नियमित) प्रमाणपत्र असणं आवश्यक आहे. नियुक्तीशी संबंधित अधिक माहितीसाठी उमेदवार स्टील ऑथोरिटी ऑफ इंडिया लिमिटेड (SAIL) या संस्थेच्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊ शकतात.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
October 31, 2023 9:28 PM IST
मराठी बातम्या/करिअर/
SAIL Salary: दहावी आणि ITI उत्तीर्ण असलेल्यांना स्टील ऑथॉरिटी ऑफ इंडियामध्ये नोकरीची संधी