150 पेक्षा जास्त शिक्षक, हे आहे भारतातील शिक्षकांचे गाव, यंदाही अनेक विद्यार्थ्यांची निवड, सर्वत्र होतेय चर्चा

Last Updated:

teachers village - सध्या बेरोजगारीच्या प्रमाण वाढत आहे, असे दिसून येते. मात्र, या सर्व परिस्थितीत एक गाव असे आहे, ज्या गावात तब्बल 150 पेक्षा जास्त शिक्षक आहेत. यावेळीही या गावातील तब्बल 15 विद्यार्थ्यांनी बाजी मारत शिक्षकाची नोकरी मिळवली आहे.

गावातील विद्यार्ध्यांची कौतुकास्पद कामगिरी
गावातील विद्यार्ध्यांची कौतुकास्पद कामगिरी
आदर्श कुमार, प्रतिनिधी
पूर्वी चंपारण : सध्या बेरोजगारीच्या प्रमाण वाढत आहे, असे दिसून येते. मात्र, या सर्व परिस्थितीत एक गाव असे आहे, ज्या गावात तब्बल 150 पेक्षा जास्त शिक्षक आहेत. यावेळीही या गावातील तब्बल 15 विद्यार्थ्यांनी बाजी मारत शिक्षकाची नोकरी मिळवली आहे.
खजूरिया गावाची ही कहाणी आहे. बिहार राज्यातील पूर्वी चंपारण जिल्ह्यात आहे. बिहारमधील शिक्षक भरतीचा निकाल नुकताच जाहीर झाला आहे. यामध्ये 15 विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. यामध्ये 4 जण मुख्याध्यापक तर 11 विद्यार्थ्यांची कनिष्ठ शिक्षकपदी निवड झाली आहे. या गावात तब्बल 150हून अधिक शिक्षक आहेत, अशी माहिती येथील विद्यार्थी यांनी लोकल18 शी बोलताना दिली.
advertisement
2012 पासून गावातील विद्यार्थ्यांची तयारी -
गावातील विद्यार्थ्यांनी सांगितले की, 2012 पासून या गावातील विद्यार्थी सामूहिक तयारी करत आहेत. आम्ही सर्वजण ग्रुप डिस्कशन, दररोज सराव आणि सेल्फ स्टडी करतो. सोबतच ऑनलाइन अभ्यास आणि टेलिग्राम ग्रूपवर क्विज खेळून तयारी करायचो. याच तयारीचा परिणाम म्हणून आम्हाला बिहार TRE-1, 2 मध्ये 50 आणि TRE 3 मध्ये 15 विद्यार्थ्यांची निवड झाली. आतापर्यंत शेकडो विद्यार्थ्यांची शिक्षक म्हणून निवड झाली आहे. सैफ या तरुणाचे नाव मुंबईमध्ये बँकेत सुरक्षारक्षकाचे काम करतात आणि आई गृहिणी आहेत. आर्थिक स्थिती साधारण असल्याने त्याला गावातूनच तयारी करावी लागली.
advertisement
8 ते 10 तास अभ्यास -
शिक्षक म्हणून झालेला विद्यार्थी नीरज कुमारने सांगितले की, आमच्या गावात अभ्यासाचे वातावरण आहे. सहयोगाच्या भावनेतून याठिकाणी सीनिअर आम्हाला मार्गदर्शन करतात. कमजोर विद्यार्थ्यांनाही मदत करुन त्यांना प्रेरित केले जाते. ऑनलाइन कोर्स आणि सराव संच तयार करून अभ्यास केला जातो. मी अगदी सामान्य पार्श्वभूमीतून आलो आहे, असे तो म्हणाला. इंजमामुल हक या विद्यार्थ्याने म्हटले की, मी गावातच राहून तयारी केली आहे. मी रोज 8-10 तास अभ्यास करायचो, तेव्हाच मला यश मिळाले.
advertisement
कोणताही भेदभाव नाही -
गावातील मुलांचा निकाल आल्यानंतर गावात आनंदाचे वातावरण आहे. सर्व मुले मिळून मिसळून अभ्यास करतात. कुणीही बाहेर जात नाही. मुले मुली सर्वजण सोबत अभ्यास करतात. जाती धर्माचा कोणताही याठिकाणी भेदभाव केला जात नाही. सर्वजण याठिकाणी मन लावून अभ्यास कर असून गावाचे नाव मोठे करत आहेत, अशी प्रतिक्रिया वृद्ध नागरिक अब्दुल अहमद यांनी दिली. विद्यार्थ्यांच्या या कामगिरीमुळे या गावाची राज्यात चर्चा होत आहे.
view comments
मराठी बातम्या/करिअर/
150 पेक्षा जास्त शिक्षक, हे आहे भारतातील शिक्षकांचे गाव, यंदाही अनेक विद्यार्थ्यांची निवड, सर्वत्र होतेय चर्चा
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement