Zilla Parishad School: महाराष्ट्रातली अशी झेडपीची शाळा, 3 वर्षांपासून ॲडमिशन हाऊसफुल; सेमी इंग्लिश, CBSE बोर्डाची शाळा काहीच नाही!
- Published by:Mohan Najan
- Reported by:Patel Irfan Hassan
Last Updated:
मुलांना दर्जेदार शिक्षण मिळावे यासाठी पालक आपल्या मुलांना खाजगी शाळेमध्ये प्रवेश घेत असतात. एकीकडे जिल्हा परिषदेच्या शाळेत प्रवेश होत नसताना दुसरीकडे या जिल्हा परिषदेच्या शाळेत ॲडमिशन फुल झाले आहेत.
सोलापूर : मुलांना दर्जेदार शिक्षण मिळावे यासाठी पालक आपल्या मुलांना खाजगी शाळेमध्ये प्रवेश घेत असतात. पण सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये प्रवेश घेण्यासाठी पालकांचा ओढा वाढला आहे. एकीकडे जिल्हा परिषदेच्या शाळेत प्रवेश होत नसताना दुसरीकडे पापरी येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत ॲडमिशन फुल झाले आहेत असा डिजिटल बोर्ड लावावा लागला आहे. या संदर्भात अधिक माहिती उपशिक्षक राजेंद्र भगवान सरवदे यांनी लोकल 18 शी बोलताना दिली.
सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील पापरी गावातील पीएम श्री आदर्श जिल्हा परिषद शाळेत पहिली ते चौथीपर्यंत प्रवेश हाऊसफुल्ल झाले असून नवीन प्रवेश बंद आहे असा डिजिटल फलक शाळेच्या प्रवेशद्वारासमोर लावण्यात आला आहे. प्रवेश जरी फुल्ल झाला असेल तरीदेखील पालक आपल्या मुलांचे ॲडमिशन घेण्यासाठी शाळेमध्ये गर्दी करत आहेत. तर या शाळेत केवळ पापरी गावातील विद्यार्थीच नव्हे तर इतर सहा ते सात गावांमधील विद्यार्थी देखील शिक्षण घेत आहेत.
advertisement
शाळेला 16 वर्षांपूर्वी ISO मानांकन प्राप्त झाले आहे. इयत्ता पाचवी पासून सेमी-इंग्रजी सुद्धा सुरू आहे. पीएम श्री आदर्श जिल्हा परिषद शाळेला 13 वेगवेगळे पुरस्कार मिळाले आहेत. तर या जिल्हा परिषदेच्या शाळेतील 25 शिक्षकांना आदर्श शिक्षक हा पुरस्कार मिळाला आहे. तसेच 200 हून अधिक विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती परीक्षेसाठी निवड झाली आहे.
advertisement
सोलापूर जिल्ह्यातील सर्वात जास्त पटसंख्या असलेली शाळा म्हणून पापरी गावातील पीएम श्री आदर्श जिल्हा परिषद शाळा म्हणून ओळखली जाते. एकीकडे जिल्हा परिषदेच्या शाळेत 20 पेक्षा अधिक विद्यार्थीही दिसणे अवघड झालेले असताना या शाळेचा इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतचा पट 827 आहे. तर या शाळेमध्ये प्रवेश घेण्यासाठी 300 विद्यार्थी सध्या वेटिंगवर आहेत. वर्ग संख्या, शिक्षकांची संख्या कमी असल्याने मुलांना प्रवेश देऊ शकत नाही. पीएम श्री आदर्श जिल्हा परिषद शाळेचा जिल्ह्यात मोठा बोलबाला आहे.
advertisement
Location :
Solapur,Maharashtra
First Published :
June 16, 2025 9:25 PM IST
मराठी बातम्या/करिअर/
Zilla Parishad School: महाराष्ट्रातली अशी झेडपीची शाळा, 3 वर्षांपासून ॲडमिशन हाऊसफुल; सेमी इंग्लिश, CBSE बोर्डाची शाळा काहीच नाही!