AI नं वाढवलं टेन्शन, 11 वी प्रवेशाचा कट ऑफ वाढणार, सायन्सला झुंबड

Last Updated:

दहावीचा निकाल नुकताच जाहीर झाला आहे. त्यामुळे आता 11 वी प्रवेशासाठी विद्यार्थी, पालकांची लगबग सुरू झाली आहे. मात्र, विज्ञान शाखेमुळे 11 वी प्रवेशाचा कट ऑफ वाढणार आहे.

News18
News18
मुंबई : दहावीचा निकाल नुकताच जाहीर झाला आहे. त्यामुळे आता प्रवेशासाठी विद्यार्थी, पालकांची लगबग सुरू झाली आहे. वैद्यकीय, अभियांत्रिकी, संगणकशास्त्रासह आता एआय सायबर विज्ञान, अवकाशशास्त्र, यांसारख्या व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश घ्यायचा असेल, तर अकरावीला विज्ञान शाखेतच प्रेवश घ्यावा लागेल. विज्ञान शाखेतूनच विद्यार्थ्यांना पुढे नीट, जेईई, सीईटी सारख्या परीक्षांना बसता येते आणि पुढील शिक्षणासाठी प्रेवश घेता येतो.
दरवर्षी उच्चशिक्षणात व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या शेकडोंनी संधी उपलब्ध करून देणाऱ्या विज्ञान शाखेत अकरावीला प्रवेश घेण्यासाठी अधिक झुंबड उडते, असं जाणकर सांगतात. एआयमुळे यंदा त्याच परिस्थितीतून कट ऑफचा टक्का वाढणार यात शंकाच नाही, असेही मत व्यक्त होत आहे.
सध्या एआयचा वापर मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यामुळे वैद्यकीयसह अभियांत्रिकी क्षेत्रात नव्याने आलेले एआय डेटा सायन्स, सायबर सुरक्षा अशा उच्च शिक्षणातील अभ्यासक्रमांची क्रेझ विद्यार्थ्यांमध्ये आता वेगाने वाढते आहे. त्या शिक्षणाचा पाया विज्ञान विषयावर आधारलेला असल्याने यापुढे अकरावीसाठीही या विज्ञान शाखेकडेच विद्यार्थ्यांचा कल वाढता राहण्याची शक्यता व्यक्त होत आहे, असं जाणकारांचं मत आहे. त्यामुळे यावर्षी कट ऑफ वाढण्याची शक्यता आहे.  
advertisement
मागील वर्षीचा कट ऑफ 
जयहिंद कॉलेज
97.6 
रुईया कॉलेज
96.6
के.सी. कॉलेज
95.8
वझे-केळकर कॉलेज
94.6
सीएचएम महाविद्यालय
94.6
बिर्ला महाविद्यालय, कल्याण
94.8
रूपारेल महाविद्यालय
advertisement
91.2
साठ्ये महाविद्यालय
91.4
मिठीबाई महाविद्यालय
  1. 2
  2. भवन्स महाविद्यालय, अंधेरी
    86.4
    ज्ञानसाधना महाविद्यालय, ठाणे
    81.6
    बी. एन. बांदोडकर महाविद्यालय, ठाणे
    92.6
    फादर ॲग्नेल महाविद्यालय, वाशी
    advertisement
    94.6
    विशेष म्हणजे व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी जरी विद्यार्थी पात्र झाला नाही तरी त्याला विज्ञान शाखेसह अन्य कोणत्याही प्रवेश घेता येतो. ती संधी इतर शाखांना लागू होत नाही. बारावीनंतर आवडीनुसार शाखा बदल करण्याची सुविधाही अनेक विद्यार्थी घेत असतात. मागील वर्षी कट ऑफचे आकडे जय हिंद महाविद्यालयात 96.6, रुईया कॉलेजमध्ये 96.2 आणि के. सी. कॉलेजमध्ये 95.8 इतके नोंदवण्यात आले होते.
    मराठी बातम्या/करिअर/
    AI नं वाढवलं टेन्शन, 11 वी प्रवेशाचा कट ऑफ वाढणार, सायन्सला झुंबड
    Next Article
    advertisement
    Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
    पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
      View All
      advertisement