AIIMS Recruitment 2025 : परीक्षा न देताच AIIMS मध्ये नोकरी मिळवण्याची संधी! महिन्याला 50,000 रुपये पगार, अर्ज कुठे आणि कसा कराल?

Last Updated:

Career News : ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेसमध्ये नोकरी मिळवण्याचे अनेक विद्यार्थ्यांचे स्वप्न असते. अशा विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सने भरतीची घोषणा केली आहे. यासाठी तुम्ही aiimskalyani.edu.in.या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन अर्ज करू शकतात.

News18
News18
मुंबई : ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेसमध्ये नोकरी मिळवण्याचे अनेक विद्यार्थ्यांचे स्वप्न असते. अशा विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सने भरतीची घोषणा केली आहे. यासाठी तुम्ही aiimskalyani.edu.in.या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन अर्ज करू शकतात.
किती पदे भरली जाणार?
या भरती अंतर्गत एकूण 45 पदे भरली जाणार आहेत. एम्समध्ये काम करू इच्छिणारे कोणीही 21 जानेवारी किंवा त्यापूर्वी अर्ज करू शकतात.
अर्ज करण्यासाठी काय करावे?
AIIMS च्या या भरतीसाठी जो कोणी अर्ज करण्याची योजना आखत आहे, त्याच्याकडे अधिकृत अधिसूचनेत दिलेली संबंधित पात्रता असणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा किती?
जे AIIMS च्या या पदांसाठी अर्ज करण्याचा विचार करत आहेत, त्यांची कमाल वयोमर्यादा 45 वर्षे असावी. त्यानंतरच ते अर्ज करण्यास पात्र मानले जातील.
advertisement
फी किती आहे?
एम्समध्ये फॉर्म भरण्यासाठी अर्जाची फी भरावी लागेल. या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना अर्ज फी म्हणून रु. 1000 भरावे लागतील. "एम्स कल्याणी अंतर्गत संसाधन खाते" च्या नावे NEFT द्वारे अर्जाची फी भरावी लागेल.
पगार किती?
या पदांसाठी जो उमेदवार निवडला जाईल, त्याला रु. 15,600 ते रु. 39,100 + ग्रेड पे 6,600 रु दिला जातो.
advertisement
दरम्यान, या पदांसाठी अर्ज करणाऱ्या कोणत्याही उमेदवाराची निवड केवळ मुलाखतीतील उमेदवाराच्या कामगिरीच्या आधारे केली जाणार आहे.
view comments
मराठी बातम्या/करिअर/
AIIMS Recruitment 2025 : परीक्षा न देताच AIIMS मध्ये नोकरी मिळवण्याची संधी! महिन्याला 50,000 रुपये पगार, अर्ज कुठे आणि कसा कराल?
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement