दहाव्या वर्षी वडिलांचं छत्र हरवलं, आईने सुरू केली टिफिन सेवा, मुलानं जिद्द न हारता स्वत:ला केलं सिद्ध
- Published by:Khushalkant Dusane
- local18
Last Updated:
बबलू गुप्ता असे या तरुणाचे नाव आहे. बबलू गुप्ता हे 10 वर्षाचे असतानाच त्यांच्या वडिलांचे निधन झाले होते. तेव्हापासून ते बसमध्ये कंडक्टरची नोकरी आणि त्यांची आई टिफिन पुरवण्याचे काम करत होते.
विकाश कुमार, प्रतिनिधी
चित्रकूट : जर आयुष्यात तुम्हला जी गोष्ट मिळवायची आहे, त्यासाठी जर तुम्ही मनापासून प्रयत्न केले, सातत्य ठेवलं, संयम ठेवला तर एक दिवस तुम्हाला त्यात यश नक्कीच मिळते, हे पुन्हा एकदा एका तरुणाने सिद्ध करुन दाखवले आहेत. अत्यंत संघर्षातून या तरुणाने आपली स्वप्न पूर्ण केली आहेत.
बबलू गुप्ता असे या तरुणाचे नाव आहे. बबलू गुप्ता हे 10 वर्षाचे असतानाच त्यांच्या वडिलांचे निधन झाले होते. तेव्हापासून ते बसमध्ये कंडक्टरची नोकरी आणि त्यांची आई टिफिन पुरवण्याचे काम करत होते. आज त्यांच्या मुलाला त्यांच्या मेहतीने दोन बसचे मालक बनवले आहे.
advertisement
बबलू गुप्ता हे उत्तरप्रदेशातील चित्रकूटच्या माणिकपूर आर्य नगर येथील रहिवासी आहेत. वडिलांच्या निधनानंतर घरावर मोठे संकट कोसळले. यानंतर त्यांच्या आईने खानावळ सुरू केली आणइ त्या माध्यमातून त्या घरोघरी जेवणाचे डबे पोहोचवू लागल्या. यानंतर त्यांच्या मुलाने पान टपरी आणि चहाची टपरीही सुरू केली. दरम्यान, काही कालावधीनंतर बबलू गुप्ता यांनी कंडक्टरीची नोकरी केली. आज त्यांच्या मेहनतीने त्यांच्या स्वत:च्या दोन बस आहेत.
advertisement
mpsc success story : पतीनं दिली खंबीर साथ, अन् मुक्त विद्यापीठात शिक्षण घेतलेल्या महिलेची MPSC मध्ये क्लास 1 पदाला गवसणी!
त्यांची आई विमला देवी यांनी लोकल18 शी बोलताना सांगितले की, त्यांचे आयुष्य खूप कष्टदायी राहिले आहेत. माणिकपूरमध्ये त्यांचे एर लहान घर होते. ते तिथेच राहायचे. तिथेच त्यांची एक लहान चहाची टपरी होती. याठिकाणी बबूल एकेकाळी चहाची आणि पानटपरी चालवायचा. तसेच त्या जेवणाचे टिफिन तयार करून डॉक्टरांना देत असे.
advertisement
काही दिवसांनी बबलू दुसऱ्याच्या बसमध्ये कंडक्टर म्हणून काम करू लागला. काम करत असतानाच त्याने आपल्या मेहनतीने एक छोटी बस विकत घेतली आणि ती चालवायला सुरुवात केली. अनेक वर्षे एक बस चालवल्यानंतर त्याने आता दुसरी बस विकत घेतली. अशाप्रकारे त्याने हळूहळू आपल्या मेहनतीने प्रगती केली. त्यांच्या मेहनतीमुळे आज ते दोन लक्झरी बसचे मालक आहेत, अशी माहिती त्यांनी दिली.
view commentsLocation :
Chitrakoot,Uttar Pradesh
First Published :
March 25, 2024 11:56 AM IST
मराठी बातम्या/करिअर/
दहाव्या वर्षी वडिलांचं छत्र हरवलं, आईने सुरू केली टिफिन सेवा, मुलानं जिद्द न हारता स्वत:ला केलं सिद्ध


