advertisement

Bank of Maharashtra Recruitment 2025 : बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये अधिकारी होण्याची संधी! महिन्याला मिळणार 1,73,000 रु पगार, अर्ज कसा कराल?

Last Updated:

Bank of Maharashtra Recruitment Apply Onine : बँक ऑफ महाराष्ट्र ही देशासह राज्यातील एक अग्रगण्य बँक आहे. या बँकमध्ये नोकरी करण्याची इच्छा असणाऱ्या तरुणांना आनंदाची बातमी आहे. बँक ऑफ महाराष्ट्रने भरतीची घोषणा केली आहे. बँक ऑफ महाराष्ट्र (BOM) ने स्पेशलिस्ट ऑफिसर स्केल 2 ते 7 च्या विविध पदांसाठी भरती जाहिरात प्रसिद्ध केली आहे.

News18
News18
मुंबई : बँक ऑफ महाराष्ट्र ही देशासह राज्यातील एक अग्रगण्य बँक आहे. या बँकमध्ये नोकरी करण्याची इच्छा असणाऱ्या तरुणांना आनंदाची बातमी आहे. बँक ऑफ महाराष्ट्रने भरतीची घोषणा केली आहे. बँक ऑफ महाराष्ट्र (BOM) ने स्पेशलिस्ट ऑफिसर स्केल 2 ते 7 च्या विविध पदांसाठी भरती जाहिरात प्रसिद्ध केली आहे. यामध्ये जनरल मॅनेजर, असिस्टंट जनरल मॅनेजर, चीफ मॅनेजर, मॅनेजर आणि इतर अनेक पदांचा समावेश आहे. या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया बँकेच्या अधिकृत वेबसाइट bankofmaharashtra.in वर सुरू झाली आहे. ज्यामध्ये इच्छुक आणि पात्र उमेदवार शेवटची तारीख 17 फेब्रुवारी 2025 पर्यंत फॉर्म भरू शकतात. मग आता या भरती प्रक्रियासाठी अर्ज कसा करायचा? पात्रता आहे? हेच आपण जाणून घेणार आहोत.
पात्रता काय आहे?
बँक ऑफ महाराष्ट्रच्या या भरतीसाठी, उमेदवारांकडे संबंधित विषयात पदवी किंवा संगणक विज्ञान किंवा माहिती तंत्रज्ञानात बीई / बीटेक पदवी किंवा किमान 60 % गुणांसह एमसीए पदवी असणे आवश्यक आहे. शैक्षणिक पात्रतेव्यतिरिक्त, कामाचा अनुभव देखील आवश्यक आहे. उमेदवार भरतीच्या अधिकृत अधिसूचनेतून त्याची सविस्तर माहिती तपासू शकतात.
वयोमर्यादा किती?
बँक स्पेशालिस्ट ऑफिसर पदासाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांचे कमाल वय पदानुसार 55 वर्षांपर्यंत निश्चित केले आहे. उमेदवारांचे वय 31 डिसेंबर 2024 च्या आधारे मोजले जाईल. त्याच वेळी, राखीव प्रवर्गांना नियमांनुसार उच्च वयोमर्यादेत सूट देण्यात आली आहे.
advertisement
पगार किती दिला जाणार?
या पदांसाठी निवडलेल्या उमेदवारांना पदानुसार दरमहा 60,000 ते 1,73,860 रुपये वेतन दिले जाईल.
निवड प्रक्रिया कशी आहे?
या भरतीमध्ये, उमेदवारांची निवड लेखी परीक्षा (आवश्यक असल्यास), मुलाखतद्वारे केली जाणार आहे.
अर्ज शुल्क किती आहे?
ऑनलाइन अर्ज करताना सामान्य/ईडब्ल्यूएस/ओबीसी उमेदवारांना जीएसटीसह रु.1000 + रु.180 भरावे लागतील. तर एससी/एसटी/पीडब्ल्यूडी उमेदवारांना जीएसटीसह 100 रुपये + 18 रुपये भरावे लागतील.
advertisement
दरम्यान, बँकेच्या या भरतीशी संबंधित इतर कोणत्याही माहितीसाठी, उमेदवार हे बँक ऑफ महाराष्ट्रच्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊ शकता.
view comments
मराठी बातम्या/करिअर/
Bank of Maharashtra Recruitment 2025 : बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये अधिकारी होण्याची संधी! महिन्याला मिळणार 1,73,000 रु पगार, अर्ज कसा कराल?
Next Article
advertisement
Gold News: बदक कापायला घेतला अन् पोटात निघालं 'सोनं', घबाड पाहून गावकरी चक्रावले; शेतकरी एका झटक्यात झाला मालामाल
बदक कापायला घेतला अन् पोटात निघालं 'सोनं', घबाड पाहून गावकरी चक्रावले
  • अजब नशिबाची गजब गोष्ट

  • बदकाने अंडी नाही तर चक्क 'सोनं' दिलं

  • पाहा काय आहे नेमका प्रकार

View All
advertisement