UPSC मध्ये बिहारचा टक्का घसरला, IAS-IPS अधिकाऱ्यांच्या संख्येत मोठी घट, कारण काय?
- Published by:Khushalkant Dusane
- local18
Last Updated:
यूपीएससी 2023 च्या निकालात हिंदी माध्यमाच्या निकालात बिहार सर्वात शेवटी आहे. यावेळी हिंदी माध्यमातून एकूण 42 उमेदवारांचा निकाल आला.
सच्चिदानंद, प्रतिनिधी
पाटणा : यूपीएससी परीक्षेत बिहार राज्याच्या विद्यार्थ्यांचा एकेकाळी डंका वाजायचा. मात्र, ही बाब आता जुनी झाली असल्याचे दिसत आहे. यूपीएससी परीक्षेत यशस्वी होण्याचे बिहारच्या तरुणाईचे प्रमाण आता कमी झाले आहे. एक काळ असा होता जेव्हा आयएएस कसे बनायचे, यासाठी बिहारच्या उमेदवारांना विचारा, असे म्हटले जायचे. मात्र, आताची आकडेवारी पाहता यूपीएससीमध्ये बिहारच्या तरुणाईचे प्रमाण कमी झाले आहे.
advertisement
2019 मध्ये 180 उमेदवार असे होते, ज्यांची निवड बिहारमधून झाली होती. मात्र, आता 2023 चा विचार केला असता फक्त 32 विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. 2019 पासून यूपीएससीमध्ये बिहारच्या उमेदवारांची आकडेवारी घसरत असल्याचे दिसत आहे. यावेळी ऑल इंडिया टॉप 10 रँकमध्ये राज्यातील एकही विद्यार्थी आपली जागा बनवू शकला नाही.
पितृ दोषामुळे आहे टेन्शन, तर वैशाख अमावस्येला आधी हे काम करा, मग पाहा फरक..
यूपीएससी 2023 च्या निकालात हिंदी माध्यमाच्या निकालात बिहार सर्वात शेवटी आहे. यावेळी हिंदी माध्यमातून एकूण 42 उमेदवारांचा निकाल आला. यामध्ये 37 मुले आणि 5 मुली आहे. यामध्ये सर्वात पुढे राजस्थान आहे. याठिकाणी हिंदी माध्यमाचे 18 उमेदवार यशस्वी झाले आहेत. दुसऱ्या क्रमांकावर उत्तरप्रदेशातून 12 विद्यार्थी यशस्वी झाले आहेत. लोकसंख्येचा विचार केला असता ही आकडेवारी खूपच कमी आहे. तर मध्यप्रदेशातून 9 उमेदवार आणि बिहार, छत्तीसगड आणि गुजरात येथून प्रत्येक 1 उमेदवार यशस्वी झाला आहे.
advertisement
5 वर्षांची आकडेवारी काय सांगते -
2019 मध्ये निवड झालेल्या एकूण 829 पदांमध्ये 180 उमेदवार हे बिहार राज्यातील होते. 2020 मध्ये निवड झालेल्या एकूण 761 पदांमध्ये 123 उमेदवार हे बिहार राज्यातील होते. 2021 मध्ये निवड झालेल्या एकूण 685 पदांमध्ये फक्त 56 उमेदवार हे बिहार राज्यातील होते. 2022 मध्ये निवड झालेल्या एकूण 933 पदांमध्ये फक्त 68 उमेदवार हे बिहार राज्यातील होते. 2023 मध्ये निवड झालेल्या एकूण 1016 पदांमध्ये फक्त 32 उमेदवार हे बिहार राज्यातील होते.
advertisement
काय आहे नेमकं काय कारण -
view commentsयावेळी पहिल्या दहामध्ये एकही जागेवर बिहारमधील उमेदवार आपले स्थान निर्माण करू शकला नाही. शिक्षणतज्ज्ञ गुरु रहमान यांच्या म्हणण्यानुसार, बिहारमधील यशस्वी विद्यार्थ्यांच्या संख्येत घट होण्याची अनेक कारणे असू शकतात. मात्र, अभ्यासक्रम आणि CSAT पॅटर्नमधील बदल हे यामागे एक प्रमुख कारण आहे. तसेच हिंदी भाषा हेसुद्धा एक दुसरे कारण यामागे आहे, असेही त्यांनी सांगितले.
Location :
Bihar
First Published :
May 08, 2024 1:11 PM IST
मराठी बातम्या/करिअर/
UPSC मध्ये बिहारचा टक्का घसरला, IAS-IPS अधिकाऱ्यांच्या संख्येत मोठी घट, कारण काय?


