अधिकारी असावा तर असा! MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी करतोय मोठं काम, Video पाहून कराल कौतुक

Last Updated:

मुंबई येथे राज्य कर निरीक्षक या पदावर असलेले बुद्धजय अण्णासाहेब भालशंकर हे एक कौतुकास्पद कार्य करत आहेत. ते समाजातील गरीब विद्यार्थ्यांना एमपीएससी, स्पर्धा परीक्षेसाठी मोफत प्रशिक्षण देत आहेत.

+
सोलापूरात

सोलापूरात MPSC परीक्षेसाठी फ्रीमध्ये ट्रेनिंग देणारा अधिकारी बुद्धजय भालशंकर

सोलापूर : मुंबई येथे राज्य कर निरीक्षक या पदावर असलेले बुद्धजय अण्णासाहेब भालशंकर हे एक कौतुकास्पद कार्य करत आहेत. ते समाजातील गरीब विद्यार्थ्यांना एमपीएससी, स्पर्धा परीक्षेसाठी मोफत प्रशिक्षण देत आहेत. एमपीएससीचे मोफत प्रशिक्षण देण्यासाठी त्यांनी अकॅडमी सुरू केली आहे. शहरातील विजापूर नाका परिसरात एका पत्र्याच्या शेडमध्ये त्यांनी अकॅडमी सुरु केली आहे.
बुद्धजय भालशंकर यांनी सोलापूर शहरात मागील तीन वर्षांपासून सम्यक अकॅडमी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र मोफत सुरू केले आहे. बुद्धजय भालशंकर हे मुंबईतील शासकीय कार्यालयातील कामे आटपून सोलापुरात येऊन शनिवारी आणि रविवारी विद्यार्थ्यांना मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन करतात.
advertisement
सम्यक अकॅडमी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रात 30 विद्यार्थी आज मोफत प्रशिक्षण घेत आहेत. समाजातील वंचित वर्गातील जो घटक आहे, ज्यांच्याकडे पैसे नाही, ज्यांना स्पर्धा परीक्षेचे ज्ञान भेटत नाही, अशा सर्व मुलांना याठिकाणी मोफत मार्गदर्शन करण्यात येते. हेच या मार्गदर्शन केंद्राचा हेतू आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून दर शनिवारी आणि रविवारी 30 विद्यार्थी एकत्र येऊन आयोगाच्या प्रश्नपत्रिका, नेमका अभ्यासक्रम काय आहे? परीक्षा पद्धती कशी असते? परीक्षेत कसे प्रश्न येतात? यावर मार्गदर्शन घेतात.
advertisement
तसेच बुद्धजय भालशंकर यांनी स्वखर्चाने विद्यार्थ्यांना पत्रावळी बनवण्याचे मशीन उपलब्ध करून दिली आहे. त्या मशिनद्वारे विद्यार्थी पत्रावळी, द्रोण, नाश्ता प्लेट, बफे प्लेट, यांसारख्या वस्तू तयार करून त्या मार्केटमध्ये विक्री करतात. तसेच या माध्यमातून आलेल्या उत्पन्नातून स्वतःची आर्थिक गरज विद्यार्थी भागवत आहेत. सम्यक अकॅडमीने कमवा आणि शिका या योजनेच्या माध्यमातून चालू केलेल्या उद्योगामार्फत ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना मोठा लाभ मिळत आहे.
advertisement
सम्यक अकॅडमीच्या 30 हून अधिक विद्यार्थी मोफत प्रशिक्षण घेत आहेत. तर या अकॅडमीतील 12 विद्यार्थ्यांची निवडही एमपीएससी मार्फत विविध पदावर झाली आहे. वंचित वर्गातील जो घटक आहे, त्या वंचित वर्गाचा प्रशासनामध्ये टक्का कसा वाढेल, हा हेतू डोळ्यासमोर ठेवून ही सम्यक अकॅडमी पे बॅक टू सोसायटी या विचारातून कार्य करत आहे. वंचित वर्गाला अधिकारी बनविण्यासाठी अधिकाऱ्यांनी सुरू केलेली अभ्यासाची चळवळ आहे.
मराठी बातम्या/करिअर/
अधिकारी असावा तर असा! MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी करतोय मोठं काम, Video पाहून कराल कौतुक
Next Article
advertisement
OTT Series: ओटीटीवरची 8 एपिसोडची हॉरर-थ्रिलर सीरीज, पाहून अंगावर येईल काटा
ओटीटीवरची 8 एपिसोडची हॉरर-थ्रिलर सीरीज, पाहून अंगावर येईल काटा
    View All
    advertisement