कंत्राटी भरतीचे ते परिपत्रक फसवे? पाहा नेमकं काय आहे प्रकरण
- Published by:Mohan Najan
- Reported by:Niranjan Kamat
Last Updated:
राज्य महसूल विभागातर्फे कंत्राटी महाभरती 2025 अशा प्रकारचं मथळ्याखाली संदेश फिरत होता. मात्र कोल्हापूर जिल्हा प्रशासनाकडून परिपत्रकाबाबत स्पष्टीकरण देण्यात आलंय.
कोल्हापूर : गेल्या काही दिवसांपासून राज्य महसूल विभागातर्फे कंत्राटी कर्मचाऱ्यांची महाभरती घेण्यात येणार आहे. अशा प्रकारचे पत्र समाज माध्यमांमध्ये मोठ्या प्रमाणात चर्चा होती. राज्य महसूल विभागातर्फे कंत्राटी महाभरती 2025 अशा प्रकारचं मथळ्याखाली संदेश फिरत होता. मात्र कोल्हापूर जिल्हा प्रशासनाकडून परिपत्रकाबाबत स्पष्टीकरण देण्यात आलंय.
तसेच राज्य महसूल विभागामध्ये कंत्राटी महाभरती 2025 अशा प्रकारे प्रसिद्ध झालेलं परिपत्रकावर कोणत्याही उमेदवारांनी विश्वास ठेवू नये. तसेच महाभरती अंतर्गत येणारा हा संदेश कुठेही पसरवू नये, असं आवाहन कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालय, प्रशासनाकडून कळवण्यात आला आहे.
advertisement
काय आहे परिपत्रकामध्ये
राजू महसूल विभागामध्ये कंत्राटी महाभरती 2025 अशा मथळ्याखाली महसूल विभागामध्ये कंत्राटी भरती भरवण्यात येणार असल्याचा मजकूर आहे. त्यामध्ये चार जिल्ह्यांमध्ये ही भरती घेण्यात येणार असल्याचं नमूद केले. त्यापैकी पुणे जिल्हा, सातारा जिल्हा, कोल्हापूर जिल्हा, रत्नागिरी जिल्हा समाविष्ट आहे.

advertisement
यापैकी पुणे जिल्ह्यामध्ये डाटा एन्ट्री ऑपरेटर 60 पदे , कॉम्प्युटर ऑपरेटर 90 पदे, ड्रायव्हर 22 पदे भरण्यात येणार असल्याचा सांगितलं. तर सातारा जिल्ह्यात डाटा एन्ट्री ऑपरेटर 30 पदे, कॉम्प्युटर ऑपरेटर 50 पदे, ड्रायव्हर 12 पदे, भरवण्यात येणार असल्याचं सांगण्यात आलं होतं.
कोल्हापूर जिल्ह्यामध्ये डाटा एन्ट्री ऑपरेटर 29 पदे, कॉम्प्युटरऑपरेटर 35 पदे, ड्रायव्हर नऊ पदे.
advertisement
रत्नागिरी जिल्ह्यात डाटा एन्ट्री ऑपरेटर 50 पदे कॉम्प्युटर ऑपरेटर 64 पदे आणि ड्रायव्हर 17 पदे.
अशा चार जिल्ह्यांमध्ये महसूल विभागात कंत्राटी भरती घेण्यात येणार असल्याचे परिपत्रक गेल्या काही दिवसांपासून समाज माध्यमांमध्ये मोठ्या प्रमाणात व्हायरल होत होतं. यामध्ये अंतिम उमेदवारी अर्ज भरण्याचा दिनांक 15 जानेवारी 2025 आणि 16 जानेवारी 2025 असा देण्यात आलेला होता.
advertisement
मात्र जिल्हा प्रशासनाकडून या महसूल विभागामध्ये होणाऱ्या कंत्राटी भरतीचे परिपत्रक हे खोटे असून समाज माध्यमांमध्ये व्हायरल होणाऱ्या परिपत्रकावर उमेदवारांनी विश्वास ठेवू नये. तसेच आपल्या जिल्ह्याच्या महसूल विभागात जाऊन चौकशी करून मुलाखती देण्याचा आवाहन कोल्हापूर जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आलेला आहे.
view commentsLocation :
Kolhapur,Maharashtra
First Published :
January 14, 2025 4:11 PM IST


