ground नसल्यानं सैन्यदलाच्या भरतीत अपयश, एकट्यानं बनवला 400 मीटरचा ट्रॅक, तरुणाईला देतोय free training
- Published by:Khushalkant Dusane
- local18
Last Updated:
अशाच एका तरुणाने या सर्व संकटांवर मात करत आज सर्वांसमोर आदर्श उभा केला आहे. समाजासाठी हा तरुण एक दिपस्तंभ बनला आहे.
दीपक कुमार, प्रतिनिधी
बांका : तुम्ही विद्यार्थी असाल किंवा नोकरी करत असाल तुम्हाला आयुष्यात एकदा तरी कदाचित अपयशाचा सामना करावा लागला असेल. अपयशामुळे आयुष्यात तणावत निर्माण होतो आणि ते त्यामुळे तुम्ही निराशावादी बनू शकतात. मात्र, अपयश आल्यानंतरही जे न खचता पुढे प्रयत्न करतात, त्यांना यश नक्कीच मिळते. कारण अपयश हीच अनेकदा यशाची पहिली पायरी आहे, असे म्हणतात. अपयश आल्यावर त्याला सामोरे जाण्याची फक्त जिद्द हवी.
advertisement
अशाच एका तरुणाने या सर्व संकटांवर मात करत आज सर्वांसमोर आदर्श उभा केला आहे. समाजासाठी हा तरुण एक दिपस्तंभ बनला आहे. विमल चौरसिया असे या तरुणाचे नाव होते. काही कारणास्तव ते सैन्यदलात जाऊ शकले नाही. मात्र, आज ते शेकडो तरुणांच्या स्वप्नांना बळ देत आहेत. विमल चौरसिया यांनाही सैन्यदलात जायचे स्वप्न होते. मात्र, काही कारणास्वत त्यांची निवड होऊ शकली नाही. आता ते तरुणांना नि:शुल्क प्रशिक्षण देऊन सैन्यदलात पाठवत आहेत.
advertisement
विमल चौरसिया हे बिहारच्या बांका येथील जुन्या बस स्टँड परिसरातील रहिवासी आहेत. लोकल18 शी बोलताना त्यांनी सांगितले की, बारावीच्या शिक्षणानंतर मी सैन्यदलात जाण्यासाठी तयारी सुरू केली. मात्र, ग्राऊंड नसल्याने खूप दूर जावे लागत होते आणि योग्यवेळी तयारी होत नव्हती. सैन्यदलात भरतीसाठी अनेकवेळा प्रयत्न केला. मात्र, अपयशच मिळाले. त्यामुळे असे वाटले की, ग्राऊंडच्या कमतरतेमुळे अपयश मिळाले. यानंतर शहराच्या आजूबाजूला ग्राऊंड तयार करण्याचा निर्णय घेतला.
advertisement
Somvati Amavasya : आज सोमवती अमावस्या, घरातील सर्व वाद दूर होणार, पितरांना मिळणार मोक्ष; जाणून घ्या, हा शुभ मुहूर्त
चना नदीच्या किनाऱ्यावर छोटी झाडी होती. ग्राऊंड तयार करण्यासाठी, तसेच ट्रॅक तयार करण्यासाठी ते एकटेच कुदळ घेऊन निघाले. यानंतर एका वर्षाच्या मेहनतीने 400 मीटरचा ट्रॅक त्यांनी बनवला. आज या मैदानाला मिलिट्री ग्राउंडच्या नावाने संपूर्ण जिल्ह्यातील लोक ओळखतात.
advertisement
या ग्राऊंडवर तयारी करत दरवर्षी अनेक तरुण सैन्यदलात भरती होत देशाची सेवा करत आहेत. हे मिलिट्री ग्राऊंड डिफेन्ससाठी वरदान सिद्ध होत आहे. तसेच लोकांचाही मोठा सहयोग मिळाला. या मैदानाची विशेष बाब म्हणजे सैन्यात भरती होणाऱ्या सर्व तरुणांच्या सहकार्याने हे लष्करी मैदानाची शोभा वाढत आहे, असेही त्यांनी सांगितले.
2018 पासून तरुणांना दिले जाते नि:शुल्क प्रशिक्षण -
विमल कुमार चौरसिया यांनी पुढे बोलताना सांगितले की, या मैदानातून सैन्यदलात किंवा इतर कोणत्याही क्षेत्रात यश संपादन केलेले सर्व तरुण सुट्टीमध्ये या मैदानावर येतात आणि मुलांना प्रशिक्षण देतात. तसेच त्यांच्या आर्थिक मदतीमुळे मुलांचे मनोबल वाढत आहे. या मैदानावर तुम्हाला नेहमी सैन्यात भरती होण्याच्या तयारीत असलेले तरुण दिसतील. याठिकाणी तरुणांना नि:शुल्क प्रशिक्षण दिले जात आहे. 2018 पासून हे कार्य अविरतपणे सुरू आहे.
advertisement
खो-खो आणि कबड्डी खेळणाऱ्या खेळाडूंनाही या मैदानात प्रशिक्षण दिले जाते. याठिकाणी तरुण आणि तरुणी दोघेही सैन्यात भरती होण्यासाठी प्रशिक्षण घेतात. तरुणांना प्रोत्साहन देण्यासाठी वेळोवेळी स्पर्धेचेही आयोजन केले जाते. त्यामुळे केवळ बांकाच नाही तर आजूबाजूच्या भागातील तरुणही याठिकाणी तयारीसाठी येतात, अशी माहिती त्यांनी दिली.
view commentsLocation :
Banka,Bihar
First Published :
April 08, 2024 8:15 AM IST
मराठी बातम्या/करिअर/
ground नसल्यानं सैन्यदलाच्या भरतीत अपयश, एकट्यानं बनवला 400 मीटरचा ट्रॅक, तरुणाईला देतोय free training


