AI शिकायचंय? आता घरबसल्या करता येणार कोर्स, तोही अगदी मोफत; पाहा कसा करायचा अर्ज?
- Reported by:Niranjan Sherkar
- Published by:Shankar Pawar
Last Updated:
AI Education: शिक्षण मंत्रालयाच्या SWAYAM या ऑनलाइन लर्निंग प्लॅटफॉर्मवरून मोफत एआय कोर्सेस सुरू करण्यात आले आहेत.
पुणे: कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) हे भविष्यकाळातील सर्वाधिक मागणीचे क्षेत्र ठरणार आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांना तांत्रिक ज्ञान आणि कौशल्य आत्मसात करण्याची सुवर्णसंधी आता सरकारने उपलब्ध करून दिली आहे. शिक्षण मंत्रालयाच्या SWAYAM या ऑनलाइन लर्निंग प्लॅटफॉर्मवरून मोफत एआय कोर्सेस सुरू करण्यात आले असून, हे कोर्स पूर्ण केल्यावर विद्यार्थ्यांना अधिकृत प्रमाणपत्र देखील मिळणार आहे.
एआयच्या मदतीने क्रीडा सामन्यांमधील बॉलचा वेग, दिशेचा अंदाज किंवा संगणकीय तंत्रज्ञानाचा वापर करून घटनांचे विश्लेषण करता येते. ह्याच पद्धतीचे प्रत्यक्ष प्रशिक्षण ‘एआय फॉर क्रिकेट अॅनालिसिस’ या कोर्समधून दिले जात आहे. त्याशिवाय डेटा सायन्स, मशीन लर्निंग, संगणकीय दृष्टिकोन, नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंग, सायबर सिक्युरिटी आदी विषयांवरील मोफत कोर्सेस विद्यार्थ्यांना घेता येतील.
advertisement
कुणाला मिळणार संधी?
हे कोर्स केवळ कॉलेजच्या विद्यार्थ्यांसाठीच नाहीत, तर शालेय स्तरावरील विद्यार्थी, प्रोग्रामिंग किंवा डेटा सायन्स क्षेत्रात करिअर करू इच्छिणारे कोणतेही विद्यार्थी व व्यावसायिक हे कोर्स सहज करू शकतात.
कोर्स कालावधी
प्रत्येक कोर्स 25 ते 45 तासांचा असून, त्यात व्हिडिओ लेक्चर्स, प्रॅक्टिकल प्रोजेक्ट्स आणि क्विझचा समावेश आहे. मोबाईल, लॅपटॉप किंवा डेस्कटॉपवर हे कोर्सेस सहज शिकता येतात.
advertisement
कशी करायची नोंदणी?
विद्यार्थ्यांना swayam-plus.swayam2.ac.in या अधिकृत वेबसाइटवर नोंदणी करून लॉगिन करावे लागेल. नोंदणी पूर्ण झाल्यानंतर कोर्स निवडून शिकण्याची प्रक्रिया सुरू करता येईल.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
Aug 28, 2025 10:38 AM IST
मराठी बातम्या/करिअर/
AI शिकायचंय? आता घरबसल्या करता येणार कोर्स, तोही अगदी मोफत; पाहा कसा करायचा अर्ज?








