गावाकडची पोरंच हुश्शार! ठाण्यातील एका तालुक्याचा विक्रम, तब्बल इतके विद्यार्थी पात्र!

Last Updated:

Navodaya Vidyalaya: जवाहर नवोदय विद्यालय परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला. यामध्ये ठाणे ग्रामीणमधील एकाच तालुक्यातील विद्यार्थ्यांनी मोठं यश मिळवलंय.

+
गावाकडची

गावाकडची पोरंच हुश्शार! नवोदय विद्यालय परीक्षेत मोठं यश, ठाणे जिल्ह्याचा निकाल

मुंबई : ‘मेहनत केली की यश नक्की मिळतं!’ हे पुन्हा एकदा सिद्ध झालंय. नवोदय विद्यालयाच्या प्रवेश परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला. यामध्ये ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी चमकदार कामगिरी करत मोठं यश मिळवलं आहे. या परीक्षेत ठाणे जिल्ह्यातील 30 जागांपैकी 23 विद्यार्थ्यांची निवड झाली असून, त्यातील 21 विद्यार्थी शहापूर तालुक्यातील आहेत.
एकाच तालुक्यातील 21 विद्यार्थी
नवोदय विद्यालयाच्या परीक्षेत ठाणे ग्रामीणसाठीच्या 30 जागांसाठी 23 विद्यार्थ्यांनी यश मिळवलं. विशेष म्हणजे यामध्ये केवळ शहापूर तालुक्यातील 21 विद्यार्थी आहेत. तर मुरबाड आणि भिवंडी तालुक्यातील प्रत्येकी 1 विद्यार्थी यशस्वी ठरले आहेत. विद्यार्थ्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांनी विशेष कौतुक केले आहे. तसेच, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) बाळासाहेब राक्षे यांनी विद्यार्थ्यांसह त्यांचे पालक, शिक्षक आणि मार्गदर्शकांचे अभिनंदन केले आहे.
advertisement
दरम्यान, विद्यार्थ्यांनी मिळवलेलं हे यश विद्यार्थ्यांच्या मेहनतीसोबतच पालकांचा पाठिंबा, शिक्षकांचे मार्गदर्शन आणि शाळेतील वातावरण यामुळे शक्य झाला आहे. या विद्यार्थ्यांना नवोदय विद्यालयात उत्तम शिक्षण मिळणार असून, त्यांचे उज्ज्वल भविष्य घडणार आहे.
ठाणे, पालघरसाठी 80 जागा
ठाणे आणि पालघर जिल्ह्यासाठी नवोदय विद्यालयात 80 जागा असतात. त्यापैकी 60 ग्रामीण आणि 20 शहरी विद्यार्थ्यांसाठी असतात. यातील ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागासाठी 30 जागा असून शहरी भागासाठी 10 जागा आहेत. संपूर्ण ठाणे जिल्ह्यासाठीच्या 30 जागांमध्ये 23 विद्यार्थ्यांनी यश मिळवले असून जिल्ह्यासाठी हे अभिमानास्पद आहे.
advertisement
नवोदय विद्यालय म्हणजे काय?
भारतातील हुशार आणि होतकरू विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे, यासाठी सरकारने जवाहर नवोदय विद्यालयांची स्थापना केली आहे. येथे इयत्ता 6 वीपासून 12 वीपर्यंत सी.बी.एस.ई. पॅटर्नवर मोफत शिक्षण दिले जाते. त्यामुळे दरवर्षी या शाळेत प्रवेश घेण्यासाठी हजारो विद्यार्थी प्रयत्न करतात.
view comments
मराठी बातम्या/करिअर/
गावाकडची पोरंच हुश्शार! ठाण्यातील एका तालुक्याचा विक्रम, तब्बल इतके विद्यार्थी पात्र!
Next Article
advertisement
BMC Mayor BJP List: भाजपच्या ४९ महिला बीएमसीमध्ये, महापौरपदासाठी या आहेत तगड्या दावेदार, कोणाची नावे चर्चेत, पाहा यादी..
भाजपच्या ४९ महिला बीएमसीमध्ये, महापौरपदासाठी या आहेत तगड्या दावेदार, कोणाची नावे
  • मुंबईवर यंदा भाजप आपला झेंडा फडकवण्यासाठी सज्ज झाली आहे.

  • आरक्षण 'सर्वसाधारण महिला' प्रवर्गासाठी निघाल्याने भाजपमधील महिला नगरसेविकांमध्ये

  • भाजपच्या ४९ महिला उमेदवारांनी विजय मिळवत आपले वर्चस्व सिद्ध केले आहे

View All
advertisement