पहिलाच प्रयत्न, वय फक्त 24 आणि हवालदार झाला थेट हायकोर्टात अधिकारी, शेतकऱ्याच्या मुलाच्या जिद्दीची कहाणी
- Published by:Khushalkant Dusane
- local18
Last Updated:
शंभू कुमार हे अररिया जिल्ह्यातील जोगबनी नगर परिषदेच्या दक्षिण माहेश्वरी येथील रहिवासी आहे. शंभू कुमार याने सांगितले की, माझी 2022 च्या एसएससी एमटीएस आणि हवालदार परीक्षेत निवड झाली आहे.
पाटणा : ग्रामीण भागातील शेतकऱ्यांची मुलेही आता शेती नव्हे तर शिक्षण करुन मोठ्या अधिकारी पदावर रुजू होत आहेत. आपल्या मेहनतीने आणि कठोर परिश्रमाच्या बळावर आपले स्वप्न पूर्ण करत आहेत. आज एका शेतकऱ्याच्या मुलाची कहाणी जाणून घेऊयात, जो उच्च न्यायालयात अधिकारी झाला आहे. फक्त 24 व्या वर्षी त्याने हे यश मिळवले आहे.
शंभू कुमार असे या तरुणाचे नाव आहे. त्याचे वय फक्त 24 वर्षे आहे. शांत आणि सरल स्वभावाच्या शंभूने पहिल्याच प्रयत्नात पाटणा उच्च न्यायालयात सहाय्यक कक्ष अधिकारी पदाची परीक्षा पास केली आहे. त्याने त्याच्या या यशाचे श्रेय त्याचे वडील जीवन साह यांना दिले आहे. न्यायाधीश श्याम नाथ साह यांना त्याने आपली प्रेरणा मानली. या सर्व लोकांच्या योग्य मार्गदर्शनाने मला हे यश मिळाले, असे त्याने सांगितले.
advertisement
शंभू कुमार हे अररिया जिल्ह्यातील जोगबनी नगर परिषदेच्या दक्षिण माहेश्वरी येथील रहिवासी आहे. शंभू कुमार याने सांगितले की, माझी 2022 च्या एसएससी एमटीएस आणि हवालदार परीक्षेत निवड झाली आहे. मी गेल्या 3 महिन्यांपासून या पदावर काम करत आहे. आता पाटणा हायकोर्टात असिस्टंट सेक्शन ऑफिसर पदासाठी निवड झाली आहे. ही माझ्यासाठी मोठी उपलब्धी आहे. आधी नोकरीत रुजू होईन आणि मग भविष्याचा विचार करेन.
advertisement
नवोदय पासून झाली सुरुवात -
शंभू कुमार या तरुणाने सांगितले की, माझे प्राथमिक शिक्षण आधी जोगबनी मग नंतर जवाहर नवोदय विद्यालय अररिया येथे झाली. येथून 2014 मध्ये दहावी आणि 2016 मध्ये बारावीचे शिक्षण घेतले. यानंतर मग इग्नू येथून 2016 मध्ये पदवीचे शिक्षण पूर्ण केले. यानंतर स्पर्धा परीक्षेची तयारी केली. यानंतर 2022 मध्ये SSC MTS ची परीक्षा पास करुन हवालदार पदावर कार्यरत आहे. आता मी नोएडा येथे पोस्टेड असल्याचे त्याने सांगितले.
advertisement
यशात कुणाचं महत्त्व -
view commentsशंभूने सांगितले की, नोकरीनंतर अभ्यासासाठी फार कमी वेळ मिळाला. पण वेळ मिळेल तेव्हा अभ्यास करायचो. जितकी तुमची मेहनत महत्त्वाची आहे, तितकाच ज्येष्ठांचा आशीर्वादही महत्त्वाचा आहे. या दोन्ही गोष्टी जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत तुम्ही यशस्वी होऊ शकत नाही. विजय शंकर साह आणि रामनाथ साह यांनी शंभूच्या यशात वाढ केली आहे. शंभूने आपल्या यशाचे श्रेय आपले वडील जीवन साह, आई पालती देवी, शिक्षक भूषण भारती, बहीण गुड्डी, इंदू आणि सरस्वती यांना दिले आहे. न्यायाधीश श्यामनाथ भैया यांचे मला नेहमी मार्गर्शन मिळाले. या सर्वांच्या मार्गदर्शनाने आणि आशीर्वादाने मला हे यश मिळाले आहे.
Location :
Patna,Bihar
First Published :
March 19, 2024 11:15 AM IST
मराठी बातम्या/करिअर/
पहिलाच प्रयत्न, वय फक्त 24 आणि हवालदार झाला थेट हायकोर्टात अधिकारी, शेतकऱ्याच्या मुलाच्या जिद्दीची कहाणी


