मुलांच्या भविष्याची काळजी वाटतेय? बारावीनंतर 'या' ठिकाणी घ्या प्रवेश, नोकरी पक्की

Last Updated:

उमेदवारांनी कोणत्याही मान्यताप्राप्त मंडळातून किंवा संस्थेतून किमान 45% गुणांसह फिजिक्स, केमेस्ट्री किंवा बायोलॉजी विषयासह 12 वी उत्तीर्ण केली पाहिजे

भारतीय सैन्याचे आर्मी कॉलेज ऑफ नर्सिंग
भारतीय सैन्याचे आर्मी कॉलेज ऑफ नर्सिंग
नवी दिल्ली : आई-वडिलांना नेहमीच त्यांच्या मुलांच्या भविष्याची खूप चिंता असते. त्यांना 12 वी नंतर कुठे प्रवेश घ्यायला सांगावं, जिथे त्यांचे भविष्य सुरक्षित होईल, हा प्रश्न पालकांना सतावत असतो. आपल्या मुलाने 12 वी नंतर मेडिकलचं शिक्षण घ्यावं असं बऱ्याच पालकांना वाटतं. पण यासाठी NEET परीक्षा उत्तीर्ण करणं आवश्यक आहे. नीट ही मेडिकलच्या अभ्यासासाठी असलेली प्रवेश परीक्षा आहे. ही परीक्षा पास केल्याशिवाय डॉक्टर होण्यासाठी सरकारी कॉलेजेसमध्ये शिक्षण घेता येत नाही. पण तुम्ही जरी नीट पास केली नसेल तरी काळजी करण्याची गरज नाही. आम्ही अशाच एका कॉलेजबद्दल सांगणार आहोत, ज्या ठिकाणी तुम्हाला नीट पास न करताही प्रवेश घेता येतो. शिवाय इथं एकदा अॅडमिशन मिळालं की नोकरी मिळेलच अशी 100 टक्के खात्री असते. आर्मी कॉलेज ऑफ नर्सिंग असं या कॉलेजचं नाव आहे.
भारतीय सैन्याचे आर्मी कॉलेज ऑफ नर्सिंग
आर्मी कॉलेज ऑफ नर्सिंग, जालंधर कँट हे बाबा फरिद युनिव्हर्सिटी ऑफ हेल्थ सायन्सेस, फरिदकोटशी (पंजाब) संलग्न आहे. या ठिकाणी आठ सेमिस्टर म्हणजेच चार वर्षांचा B.Sc नर्सिंगचा डिग्री कोर्स करता येतो. आर्मी कॉलेज ऑफ नर्सिंगची (एसीएन) स्थापना लष्करावर अवलंबून असलेल्या महिलांसाठी करण्यात आली होती. या ठिकाणी भारतीय नौदल (आएन) आणि भारतीय हवाई दलाच्या (इंडियन एअर फोर्स) प्रत्येक वार्डासाठी एक जागा राखीव आहे. हे आर्मी वेल्फेअर एज्युकेशन सोसायटी (AWES) अंतर्गत कार्य करते, जी 137 आर्मी पब्लिक स्कूल आणि 12 व्यावसायिक प्रोफेशनल कॉलेजेसचं मॅनेजमेंट करते.
advertisement
भारतीय सैन्याच्या आर्मी कॉलेज ऑफ नर्सिंगमध्ये प्रवेशाचे क्रायटेरिया
उमेदवारांनी कोणत्याही मान्यताप्राप्त मंडळातून किंवा संस्थेतून किमान 45% गुणांसह फिजिक्स, केमेस्ट्री किंवा बायोलॉजी विषयासह 12 वी उत्तीर्ण केली पाहिजे. या सोबतच भारतीय सैन्य, भारतीय वायुसेना व भारतीय नौदलाच्या कर्मचाऱ्यांच्या मुलींसाठी एकेक जागा राखीव आहेत.
advertisement
भारतीय सैन्याच्या आर्मी कॉलेज ऑफ नर्सिंगमध्ये कसा मिळवायचा प्रवेश?
उमेदवारांची निवड आर्मी कॉलेज ऑफ नर्सिंग, जालंधर कँटद्वारे 30 जून 2024 रोजी देशभरातील निवडक केंद्रांवर परीक्षा आयोजित करून घेईल. ही ऑनलाइन प्रवेश परीक्षा ओएटी एसीएन आणि आर्मी इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग, गुवाहाटीसाठीही घेतली जाईल. ही परीक्षा उत्तीर्ण झाल्याशिवाय याठिकाणी प्रवेश मिळू शकत नाही.
view comments
मराठी बातम्या/करिअर/
मुलांच्या भविष्याची काळजी वाटतेय? बारावीनंतर 'या' ठिकाणी घ्या प्रवेश, नोकरी पक्की
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement