टीव्ही पाहताना पाहिलं स्वप्न अन् ते जगलंसुद्धा, आता गावातील पहिली डॉक्टर बनणार रुचिका, प्रेरणादायी कहाणी
- Published by:Khushalkant Dusane
- local18
Last Updated:
रुचिका भादू असे या मुलीचे नाव आहे. बारावीच्या शिक्षणासोबत तिने आपले स्वप्न पूर्ण करुन दाखवले आहे. जाणून घेऊयात, तिच्या यशाची कहाणी.
मनमोहन सेजू, प्रतिनिधी
बाडमेर : बालपणी टीव्हीवर विविध कार्यक्रम, मालिका, चित्रपट पाहताना मुले प्रभावित होतात आणि त्यातील एखादी भूमिका त्यांना आवडते आणि मोठे झाल्यावर आपण तसेच बनावे, असे स्वप्न ते पाहतात. एका मुलीनेही टीव्हीवर पाहून आयुष्यात आपण डॉक्टर व्हावे, असे स्वप्न पाहिले होते. आता ही तरुणी गावातील पहिली डॉक्टर होणार आहे.
रुचिका भादू असे या मुलीचे नाव आहे. ती राजस्थान राज्यातील बाडमेरच्या निम्बानियाच्या ढाणी येथील रहिवासी आहे. बारावीच्या शिक्षणासोबत तिने आपले स्वप्न पूर्ण करुन दाखवले आहे. बाडमेर नवोदय विद्यालयाच्या इंग्रजी माध्यमातून बारावीच्या शिक्षणासोबत रुचिकाने नीट परीक्षेची तयारी केली आणि इतिहास रचला. रुचिका भादू हिने नीट परिक्षेत देशात 1351 रँक मिळवली आहे. तसेच ओबीसी प्रवर्गात तिने देशात 432 वे स्थान मिळवले आहे.
advertisement
रुचिका हिचे वडील जेठाराम भादू बाडमेर येथील राजकीय उच्च प्राथमिक विद्यालयात राउजी की ढाणी येथे शिक्षक आहेत आणि आई कमला देवी गृहिणी आहे. आमच्या मुलीने मोठ्या मेहनतीने हे यश मिळवले आहेत, अशी प्रतिक्रिया जेठाराम भादू यांनी व्यक्त केली.
advertisement
बारावीच्या परिक्षेसोबत केली नीटची तयारी -
रुचिका हिची आई कमला देवी यांनी आपल्या मुलीच्या यशाचे श्रेय तिची एकाग्रता आणि सातत्य याला दिले आहे. रुचिका ही शाळेत असताना एनसीसीमध्ये होती. तेव्हापासूनच तिच्या मनात देशात देशसेवेची भावना निर्माण झाली होती. तसेच देशाची सेवा ही फक्त सैन्यदलातच जाऊन नव्हे तर डॉक्टर होऊनही केली जाऊ शकते.
advertisement
यामुळे होतो इन्व्हर्टरच्या बॅटरीचा स्फोट, overheat पासून नेमका कसा बचाव कराल, महत्त्वाचा सल्ला
रुचिकाने 705 गुण मिळवले आहेत. इतकेच नाही तर रुचिकाने 12वीच्या परीक्षेसोबत NEET ची परीक्षा दिली होती. रुचिकाने NEET परीक्षेत बारावीत 93 टक्के गुण मिळवून यश मिळवले असेही तिने सांगितले. तिच्या आता तिच्या गावातील पहिली डॉक्टर होणार आहे. तिच्या या यशाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
Location :
Barmer,Rajasthan
First Published :
June 07, 2024 9:21 AM IST
मराठी बातम्या/करिअर/
टीव्ही पाहताना पाहिलं स्वप्न अन् ते जगलंसुद्धा, आता गावातील पहिली डॉक्टर बनणार रुचिका, प्रेरणादायी कहाणी