Government job : आता परीक्षा न देता मिळवा सरकारी नोकरी; या विभागात निघाली भरती, जाणून घ्या संपूर्ण माहिती एका क्लिकवर

Last Updated:

सरकारी नोकरीसाठी इच्छूक असलेल्या तरुणांसाठी सुवर्णसंधी आहे, तुम्हाला या विभागात परीक्षा न देताही नोकरी मिळू शकते.

News18
News18
ADA Recruitment 2024 : एरोनॉटिकल डेव्हलपमेंट एजन्सी (ADA) मध्ये नोकरी करण्यासाठी इच्छूक असणाऱ्या तरुणांसाठी सुवर्णसंधी आहे. एडीएमध्ये सल्लागार पदांच्या जागांसाठी भरती होणार आहे. तुम्हाला जर या पदासाठी अर्ज करायचा असेल तर तुम्ही एडीएची अधिकृत वेबसाईट असलेल्या ada.gov.in या वेबसाईटला भेट देऊन तुमचा अर्ज भरू शकता. एडीए 2024 मध्ये निघालेल्या या भरतीमध्ये तुमची जर सल्लागार म्हणून निवड झाली तर तुम्हाला एका चांगल्या पगारासह रोजगाराचं साधन उपलब्ध होणार आहे.
एडीएमध्ये सल्लागार पदाच्या एकूण 25 जागा निघाल्या आहेत. या पदांसाठी तुम्ही येत्या 31 मार्चपर्यंत अर्ज करू शकता. या पदामध्ये तांत्रिक कामासंबंधी 16 जागा तर बिगरतांत्रिक कामसाठी 9 जागा अशा एकूण 25 जागांवर भरती होणार आहे. तुम्हाला जर या पदासाठी अर्ज करायचा असेल तर संस्थेकडून त्या पदासाठी जी योग्यता देण्यात आली आहे, ती सर्व पात्रता तुम्ही पूर्ण करणं गरजेचं आहे. एडीएच्या अधिकृत वेबसाईटवर पात्रतेसबंधी सविस्तर माहिती देण्यात आली आहे.
advertisement
या पदांसाठी कोणतीही लेखी परीक्षा नाहीये, पात्र उमेदवारांची निवड ही मुलाखतीद्वारे होणार आहे. या पदासाठीची मुलाखत बंगळुरूमध्ये आयोजित करण्यात आलेली आहे. तुम्ही एडीएमध्ये सल्लागार पदासाठी अर्ज केल्यानंतर पुढील सर्व प्रक्रिया जसे मुलाखतीची तारीख, सिलेक्शन झाल्यास पुढील प्रक्रिया संस्थेतर्फे तुम्हाला इमेल किवां पोस्ट ऑफीसमध्ये अधिकृत पत्र पाठवून कळवण्यात येईल.
मराठी बातम्या/करिअर/
Government job : आता परीक्षा न देता मिळवा सरकारी नोकरी; या विभागात निघाली भरती, जाणून घ्या संपूर्ण माहिती एका क्लिकवर
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement