तुमच्याकडे असेल हा दाखला तर लगेच करा अर्ज, स्पर्धा परीक्षेसाठी मोफत मार्गदर्शन अन् विद्यावेतन मिळणार!
- Published by:Shankar Pawar
- Reported by:Pragati Bahurupi
Last Updated:
MPSC Preparing: स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी खूशखबर आहे. या विद्यार्थ्यांना तयारीसाठी मोफत मार्गदर्शन आणि विद्यावेतन मिळणार आहे.
अमरावती: महाराष्ट्र शासनाकडून आदिवासी विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण दिले जाणार आहे. हे प्रशिक्षण आदिवासी उमेदवारांसाठी कार्यरत असलेल्या कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता माहिती व मार्गदर्शन केंद्र, अचलपूर कॅम्प, परतवाडा, जि. अमरावती येथे आयोजित केले जाणार आहे. विविध शासकीय पदांसाठी घेण्यात येणाऱ्या स्पर्धा परीक्षांचे विनामूल्य प्रशिक्षण येथे दिले जाणार आहे. आदिवासी सुशिक्षित उमेदवारांसाठी ही सुवर्ण संधी असमार आहे. याबाबत सविस्तर जाणून घेऊ.
स्पर्धा परीक्षा प्रशिक्षणासाठी पात्रता
1. उमेदवाराचे वय 18 ते 30 वयोगटातील असावे.
2. किमान एसएससी उत्तीर्ण असावे.
3. उमेदवाराची नोंदणी जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र कार्यालयात केलेली असावी.
कागदपत्रे कोणती लागतात?
1. शाळा सोडल्याचा दाखला
advertisement
2. जातीचे प्रमाणपत्र
3. दहावी उत्तीर्णची गुणपत्रिका
4. जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र येथील नोंदणी प्रमाणपत्र
5. पासपोर्ट आकाराचा फोटो
मुलाखतीला उपस्थित राहताना उमेदवारांनी यासह सर्व ओरिजनल कागदपत्रे सोबत असणे गरजेचे आहे.
अर्ज कुठे करायचा?
स्पर्धा परीक्षा प्रशिक्षणासाठी इच्छुक आणि पात्र असलेल्या उमेदवारांनी आपले अर्ज 29 जुलै 2025 पर्यंत केंद्राच्या कार्यालयात सादर करणे आवश्यक आहे. उमेदवारांच्या निवडीसाठी 30 जुलै 2025 रोजी दुपारी 12 वाजता मुलाखती आयोजित करण्यात येणार आहे.
advertisement
प्रशिक्षणाचा कालावधी आणि विद्यावेतन
या प्रशिक्षणाचा कालावधी 1 ऑगस्ट 2025 ते 15 नोव्हेंबर 2025 पर्यंत असणार आहे. म्हणजेच जवळपास साडेतीन महिन्यांच्या कालावधीत हे प्रशिक्षण पूर्ण होणार आहे. या कालावधीत प्रशिक्षणार्थींना दरमहा एक हजार रुपये विद्यावेतन म्हणून दिले जाईल. विशेष म्हणजे, प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केल्यानंतर, विद्यार्थ्यांना स्पर्धा विविध विषयांच्या चार महत्त्वाच्या पुस्तकांचा संच विनामूल्य देण्यात येणार आहे.
advertisement
उमेदवारांची मुलाखत झाल्यानंतर निवड यादी त्याच दिवशी सायंकाळी 5 वाजता कार्यालयीन सूचना फलकावर लावली जाईल. अधिक माहितीसाठी 07223-221205 किंवा 7709432024 या क्रमांकांवर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन अधिकारी यांनी केले आहे.
Location :
Amravati,Maharashtra
First Published :
July 16, 2025 1:06 PM IST
मराठी बातम्या/करिअर/
तुमच्याकडे असेल हा दाखला तर लगेच करा अर्ज, स्पर्धा परीक्षेसाठी मोफत मार्गदर्शन अन् विद्यावेतन मिळणार!