पगार 1 लाख 40 हजार, ग्रॅज्युएट तरुणांसाठी सरकारी नोकरीची संधी, पाहा कुठे करायचा अर्ज
- Published by:Kranti Kanetkar
- trending desk
Last Updated:
इंजिनीअरिंगच्या विद्यार्थ्यांसाठी नोकरीची सुवर्णसंधी, येथे सुरू आहे भरती
मुंबई : तुम्ही जर इंजिनीअरिंग किंवा बी.टेक पूर्ण केलं असेल, व नोकरीच्या शोधात असाल, तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. रामागुंडम फर्टिलायझर्स अँड केमिकल्स लिमिटेड कंपनीमध्ये विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेद्वारे नियुक्ती होणाऱ्या उमेदवाराला 40 हजार ते 1 लाख 40 हजार रुपयांपर्यंत पगार दिला जाईल. तर, काही पदांसाठी 12.99 लाख रुपयांचं वार्षिक पॅकेज देण्यात येईल. मुलाखतीद्वारे अंतिम उमेदवाराची निवड करण्यात येईल. ‘टीव्ही 9 हिंदी’ने या बाबत वृत्त दिलंय.
रामागुंडम फर्टिलायझर्स अँड केमिकल्स लिमिटेड कंपनीमध्ये इंजिनीअर, मेडिकल ऑफिसर यासह विविध पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. इच्छुक उमेदवार या पदांसाठी 31 मार्च 2024 पर्यंत कंपनीच्या अधिकृत वेबसाईटवरून rfcl.co.in अर्ज करू शकतात.
एकूण 27 जागांसाठी भरती
कंपनीने इंजिनीअर, मेडिकल ऑफिसर आणि केमिकल लॅबसह विविध पदांसह एकूण 27 रिक्त जागांसाठी अर्ज मागवले आहेत. ऑनलाईन अर्ज केल्यानंतर त्याची एक प्रत पोस्टाद्वारे कंपनीच्या पत्त्यावर पाठवावी लागेल. अर्ज करणाऱ्या उमेदवाराचं वय 30 वर्षांपेक्षा जास्त नसावं. वयोमर्यादा शिथिलतेबाबत अधिक माहिती कंपनीच्या वेबसाईटवर देण्यात आली आहे. खुल्या, ओबीसी आणि ईडब्ल्यूएस प्रवर्गातील उमेदवारांना 700 रुपये अर्जाचं शुल्क भरावं लागेल. तर, एससी आणि एसटी प्रवर्गांतील उमेदवारांना कोणतंही शुल्क भरावं लागणार नाही.
advertisement
असा करा अर्ज
कंपनीची अधिकृत वेबसाइट rfcl.co.in वर जा.
होम पेजवर दिलेल्या ‘करिअर टॅब’वर क्लिक करा.
येथे ‘नोटिफिकेशन’ या लिंकवर क्लिक करा.
आता ‘अप्लाय’ या लिंकवर क्लिक करा.
रजिस्ट्रेशन करा व तुमची माहिती भरा.
कागदपत्रं अपलोड करा आणि शुल्क भरा.
उमेदवाराची शैक्षणिक पात्रता
इंजिनीअरिंग पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे संबंधित विषयातील बी.टेक किंवा बीई पदवी असावी. तर सीनिअर केमिस्ट पदासाठी एमएससी केमिस्ट पदवी असणं आवश्यक आहे. मेडिकल ऑफिसर पदासाठी उमेदवाराने एमबीबीएस पदवीसह संबंधित विषयात एमडी किंवा एमएस केलेलं असावं. योग्य शैक्षणिक पात्रता असलेल्या उमेदवारांची कागदपत्रांची छाननी केल्यानंतर त्यांना मुलाखतीसाठी बोलवण्यात येईल. त्यानंतर मुलाखतीद्वारे नोकरीसाठी अंतिम उमेदवारांची यादी निवडण्यात येईल.
advertisement
दरम्यान, इंजिनीअरिंग पूर्ण झाल्यानंतर नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी ही एक उत्तम संधी आहे. निवड झालेल्या उमेदवारांना पगारही चांगला देण्यात येत आहे. या भरती प्रक्रियेच्या अधिक माहितीसाठी तुम्ही कंपनीच्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊ शकता.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
March 05, 2024 4:03 PM IST
मराठी बातम्या/करिअर/
पगार 1 लाख 40 हजार, ग्रॅज्युएट तरुणांसाठी सरकारी नोकरीची संधी, पाहा कुठे करायचा अर्ज


