Students Yojana: विद्यार्थ्यांना मिळतील महिन्याला 21,600 रुपये, महायुती सरकारची योजना, निकष काय?
- Published by:Mohan Najan
- Reported by:Niranjan Sherkar
Last Updated:
वसतिगृहात प्रवेश न मिळाल्याने शिक्षण सोडावे लागेल, असे आता होणार नाही. कारण, अशा विद्यार्थ्यांसाठी सरकारकडून योजना राबवली जात आहे.
पुणे: वसतिगृहात प्रवेश न मिळाल्याने शिक्षण सोडावे लागेल, असे आता होणार नाही. कारण, अशा विद्यार्थ्यांसाठी सरकारकडून ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना राबवली जात आहे. ही योजना इतर मागासवर्गीय (OBC), विमुक्त जाती (VJNT) आणि भटक्या जमाती तसेच विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी लागू आहे.
या योजनेतून वसतिगृह प्रवेश न मिळाल्यास विद्यार्थ्यांना आर्थिक मदत दिली जाईल. ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख सोमवार, 18 ऑगस्ट असून, पात्र विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ घेता येईल. ही योजना आदिवासी विकास विभागाच्या पं. दीनदयाल उपाध्याय स्वयं योजना आणि सामाजिक न्याय विभागाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेच्या धर्तीवर आहे. राज्य सरकारने इतर मागासवर्गीय, विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी ही स्वतंत्र ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना सुरू केली आहे.
advertisement
निकष काय?
1. विद्यार्थी बारावीनंतरचे शिक्षण घेत असावा.
2. अर्ज करताना किमान 60% किंवा त्याच्या प्रमाणात ग्रेड आवश्यक.
3. पालकांचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असावे.
4. विद्यार्थी ज्याठिकाणी शिक्षण घेत आहे, त्या शहरात/तालुक्यात वसतिगृह प्रवेश मिळालेला नसावा.
advertisement
5. अर्जदाराचे वय कमाल 30 वर्षांपेक्षा जास्त नसावे.
6. एका विद्यार्थ्याला जास्तीत जास्त 5 वर्षे लाभ.
7. इंजिनिअरिंग / वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी जास्तीत जास्त 6 वर्षे लाभ.
योजनेचे फायदे
1. दररोज 600 रुपये (वर्षाला सुमारे 21,600 रुपये) आर्थिक मदत.
2. भोजन, निवास आणि निवास भत्ता यासाठी थेट विद्यार्थ्यांच्या खात्यात रक्कम जमा.
अर्जासाठी आवश्यक कागदपत्रे
1. महाराष्ट्राचे रहिवासी प्रमाणपत्र.
advertisement
2. सक्षम प्राधिकाऱ्याद्वारे दिलेले जात प्रमाणपत्र (OBC, VJNT, भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्गासाठी).
3. शैक्षणिक गुणपत्रिका.
4. पालकांचे उत्पन्न प्रमाणपत्र.
5. वसतिगृह प्रवेश नाकारल्याचे प्रमाणपत्र.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
August 14, 2025 5:11 PM IST
मराठी बातम्या/करिअर/
Students Yojana: विद्यार्थ्यांना मिळतील महिन्याला 21,600 रुपये, महायुती सरकारची योजना, निकष काय?