बारावीनंतर करा हे कोर्स, बस्स पैसाच पैसा मिळेल; पाहा तुमची आवडती स्ट्रिम आहे का?
- Published by:Kranti Kanetkar
- trending desk
Last Updated:
बारावीचा निकाल आल्यानंतर प्रत्येकजण देश-विदेशातील नामवंत विद्यापीठामध्ये पुढील अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेण्याचा प्रयत्न करीत असतो.
मुंबई : बारावी बोर्डाची परीक्षा सुरू झाली आहे. बारावी हा करिअरला दिशा देणारा महत्त्वाचा टप्पा समजला जातो. त्यामुळेच बारावीच्या परीक्षेसोबत विद्यार्थी जेईई, नीट, सीईटी सारख्या प्रवेश परीक्षांचीही तयारी करतात. बारावीचा निकाल आल्यानंतर प्रत्येकजण देश-विदेशातील नामवंत विद्यापीठामध्ये पुढील अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेण्याचा प्रयत्न करीत असतो.
असा प्रवेश घेताना अभ्यासक्रमातील आवडीनिवडी, करिअरच्या संधी आदींचा विचार केला जातो. पण तुम्हाला माहिती आहे का, बारावीनंतर पदवी अभ्यासक्रमाला प्रवेश घेताना असे बरेच कोर्स आहेत, जे केल्यानंतर तुम्हाला चांगल्या पगाराची नोकरी मिळू शकते.
आयुष्यात पैसा हा खूप महत्त्वाचा आहे, हे सर्वचजण मान्य करतात. गेल्या काही वर्षांमध्ये अशी अनेक उदाहरणं तुम्ही पाहिली असतील, ज्यांना शिक्षण पूर्ण करण्यापूर्वीच कोट्यवधी रुपयांचं पगाराचं पॅकेज ऑफर केलं गेलं. तुम्हालाही पदवीचा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर लगेच हाय पेईंग जॉब्ज मिळवायचे असतील, तर त्यासाठी कोणता अभ्यासक्रम करणं आवश्यक आहे, हे माहिती असणं गरजेचं आहे. चला तर, हे अभ्यासक्रम नेमके कोणते आहेत, ते जाणून घेऊ.
advertisement
मेडिकल किंवा हेल्थ सेक्टर
बारावी सायन्स केलेले विद्यार्थी मेडिकल किंवा हेल्थ सेक्टर संबंधित अभ्यासक्रमांना प्रवेश घेऊ शकतात. सायन्सच्या विद्यार्थ्यांसाठी एमबीबीएस हा एकमेव पर्याय नाही. तर, त्यांच्यासाठी फॉर्मसीपासून ते रिसर्चपर्यंत, हॉस्पिटलपासून ते औषध कंपन्यांपर्यंत संधी उपलब्ध आहेत. विद्यार्थी बारावी सायन्सनंतर त्यांच्या आवडीनुसार आणि क्षमतेनुसार मेडिकल अभ्यासक्रमांना प्रवेश घेऊ शकतात. या क्षेत्रातील मनुष्यबळाची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे.
advertisement
एअरलाइन झोनमध्ये करिअर
तुम्हाला एअरलाइन क्षेत्राशीसंबंधित करिअर करायचे असेल, तर तुमच्यासाठी पायलट बनणं हा एक उत्तम पर्याय आहे. पायलट, एअर होस्टेस, फ्लाइट स्टुअर्ड असे जॉब हे खूपच रोमांचकारी असतात. यामध्ये सुरुवातीलाच पगार लाखांमध्ये मिळतो. अनुभवानुसार पगारही वाढतो. पायलट होण्यासाठी विद्यार्थ्यांना एक विशेष पायलट ट्रेनिंग प्रोग्रॅम पूर्ण करावा लागतो. त्यानंतर पायलट लायसन मिळवता येते. एअर होस्टेस होण्यासाठी तुम्ही ट्रेनिंग कोर्स देखील करू शकता.
advertisement
एआय
आजच युग हे कॉम्प्युटरचं युग आहे. एआय अर्थात आर्टिफिशियल इंटिलिजन्स सेक्टरमध्येही आता वेगानं वाढ होतेय. तुम्ही सॉफ्टवेअर डेव्हलपर, डेटा ॲनालिस्ट, वेब डेव्हलपर, आर्टिफिशियल इंटिलिजन्स, मशीन लर्निंग, डेटा सायंटिस्ट यासारख्या क्षेत्रामध्येही करिअर करून चांगले पैसे कमाऊ शकता. नामांकित कंपन्या या क्षेत्रात करोडोंचे पॅकेज देतात. तसेच तुम्ही स्वतःची फर्म देखील काढू शकता.
advertisement
इंजिनीअरिंग
गणित विषयासह बारावी सायन्स केल्यानंतर तुम्ही चार वर्षांचा बी.टेक कोर्स करू शकता. कोणत्याही कॉलेजमधून इंजिनीअरिंग करून टॉप पॅकेजसह नोकरी मिळू शकते. मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, एरॉनॉटिकल किंवा कॉम्प्युटर सायन्स इंजिनीअरिंग करून तुम्ही नामवंत कंपनीमध्ये नोकरी मिळवू शकता. तसेच स्वतःची कंपनीही सुरू करू शकता. यामध्ये परदेशात जाण्याची संधीही मिळते.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
February 27, 2024 3:35 PM IST
मराठी बातम्या/करिअर/
बारावीनंतर करा हे कोर्स, बस्स पैसाच पैसा मिळेल; पाहा तुमची आवडती स्ट्रिम आहे का?


