UPSC परीक्षेची तयारी करताना या गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या, स्वत: IFS अधिकाऱ्यांनी दिली महत्त्वाची माहिती

Last Updated:

यूपीएससी पास होण्याचे लाखो उमेदवारांचे स्वप्न असते. मात्र, त्यामध्ये अनेक विद्यार्थ्यांनी नेमकी कशी तयारी करावी, कोणती पुस्तके वाचावी, कोणत्या विषयाला किती वेळ द्यावा, हे माहिती नसते. त्यामुळे योग्य मार्गदर्शन महत्त्वाचे असते.

यूपीएससी परीक्षा तयारी
यूपीएससी परीक्षा तयारी
सत्यम कुमार, प्रतिनिधी
भागलपुर : केंद्रीय लोकसेवा आयोगाची म्हणजे यूपीएससीची नागरी सेवा परीक्षा ही देशातील सर्वात कठीण परीक्षा मानली जाते. यासाठी खूप सारा वेळ द्यावा लागतो, मोठी तयारी करावी लागते आणि दबाव तसेच कुटुंबीयांच्या अपेक्षा असतात. अशा परिस्थितीत अभ्यास करणे आणि यशस्वी होणे हे एक मोठे आव्हान आहे. त्यामुळे योग्य मार्गदर्शन सर्वात गरजेचे आहे. म्हणून जर योग्य मार्गदर्शनासोबत आत्मविश्वासाने अभ्यास केला तर यश नक्कीच मिळते.
advertisement
यूपीएससी पास होण्याचे लाखो उमेदवारांचे स्वप्न असते. मात्र, त्यामध्ये अनेक विद्यार्थ्यांनी नेमकी कशी तयारी करावी, कोणती पुस्तके वाचावी, कोणत्या विषयाला किती वेळ द्यावा, हे माहिती नसते. त्यामुळे योग्य मार्गदर्शन महत्त्वाचे असते. याबाबत आयएफएस अधिकारी राहुल राज यांनी महत्त्वाचे मार्गदर्शन केले.
त्यांनी सांगितले की, तुम्ही ज्या परीक्षेची तयारी करत असाल, त्याचा अभ्यासक्रम तुम्हाला माहिती असायला हवा. यासोबतच जेव्हा तुम्ही इतिहास सारख्या विषयाची तयारी यूपीएससीसाठी करत असाल, तर संपूर्ण घटनाक्रम तुम्हाला माहिती असणे महत्त्वाचे आहे. जर राज्यशास्त्राची तयारी करत असाल तर लक्ष्मीकांत यांचे पुस्तक महत्त्वाचे आहे. भूगोल, अर्थशास्त्राची तयारी करत असाल तर एनसीइआरटीची पुस्तके महत्त्वाची आहेत.
advertisement
उजळणी महत्त्वाची -
राहुल राज हे सांगतात की, तुम्ही किती तास अभ्यास करत आहात, हे महत्त्वाचे नाही तर तुम्ही काय अभ्यास करत आहात, यावर लक्ष देणे महत्त्वाचे आहे. तुम्ही जो अभ्यास करत आहेत, तो काळजीपूर्वक समजून घेणे महत्त्वाचे आहे. कोणत्याही विषयाला हलक्यात घेऊ नका. त्या विषयाची संपूर्ण माहिती तुमच्या यशासाठी महत्त्वाची आहे.
advertisement
अभ्यासाचे वेळापत्रक तयार करायला हवे. एक एक प्रकरण संपवायची वेळ निश्चित करा. एकदा अभ्यास केल्यावर त्याची उजळणी करा. तेव्हा तुमच्या लक्षात सर्व गोष्टी राहतील आणि यश नक्की मिळेल.
मुलाखतीची तयारी कशी करावी -
राहुल राज पुढे म्हणाले की, अनेकदा मुले पूर्व आणि मुख्य परीक्षा पास करतात. मात्र, मुलाखत पास होत नाही. मुलाखतीसाठी ज्ञानासह आत्मविश्वास असणेही महत्त्वाचे आहे. तुम्ही जो अभ्यास केला आहे, त्याची कन्सेप्ट अगदी क्लिअर ठेवायची. काही प्रश्न त्यावरही येऊ शकतात. तुम्ही ज्या क्षेत्रात जाऊ इच्छिता, त्याची पूर्ण माहिती असणे आवश्यक आहे. तुम्ही जर अशा पद्धतीने तयारी केली तर तुम्ही मुलाखतीमध्ये निश्चितच यशस्वी व्हाल. अनेक जण मुलाखतीमध्ये घाबरुन जातात. असे अजिबात करू नये. आत्मविश्वासाने मुलाखत द्यावी, असा सल्लाही त्यांनी दिला.
view comments
मराठी बातम्या/करिअर/
UPSC परीक्षेची तयारी करताना या गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या, स्वत: IFS अधिकाऱ्यांनी दिली महत्त्वाची माहिती
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement