शॉर्टकट वापरू नका! अन्यथा कट होतील मार्क, बारावी गणिताच्या पेपरसाठी लक्षात ठेवा ट्रिक्स
- Published by:Shankar Pawar
- Reported by:Apurva Pradip Talnikar
Last Updated:
HSC Exam 2025: बारावी बोर्ड परीक्षेला लवकरच सुरुवात होत आहे. या परीक्षेत बऱ्याचा विद्यार्थ्यांना गणिताचा पेपर अवघड वाटतो. प्राध्यापकांनी सांगितलेल्या टिप्स वापरल्यास पैकीच्या पैकी गुण मिळतील.
अपूर्वा तळणीकर, प्रतिनिधी
छत्रपती संभाजीनगर : माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या इयत्ता बारावीच्या परीक्षा आता लवकर सुरू होणार आहेत. बारावीची परीक्षेत गणितासारख्या विषयाचं विद्यार्थी टेन्शन घेतात. परंतु, पेपर सोडवताना काही ट्रिक्स वापरल्यास या विषयात देखील पैकीच्या पैकी मार्क मिळू शकतात. छत्रपती संभाजीनगर येथील प्राध्यापक प्रताप काशीद यांनी लोकल18 च्या माध्यमातून अशाच काही सोप्या ट्रिक्स सांगितल्या आहेत.
advertisement
गणिताचा पेपर सोडविताना विद्यार्थ्यांनी अत्यंत काळजीपूर्वक पेपर सोडवला पाहिजे. विद्यार्थ्यांनी सराव करताना पाठ्यापुस्तकातील सर्व प्रश्न सोडवले पाहिजेत. कारण बोर्डाच्या परीक्षेत पाठ्यपुस्तकातील प्रश्नांवर आधारित प्रश्नच प्रामुख्याने विचारले जातात. त्यामुळे पाठ्यपुस्तकातील कोणताही प्रश्न सोडून देऊन नये. सर्वच्या सर्व प्रश्न अभ्यासावेत. त्यामुळे परीक्षेची पूर्वतयारी चांगली होईल, असं प्राध्यापक सांगतात.
advertisement
शॉर्टकट वापरू नका
सर्वात महत्त्वाचं म्हणजे विद्यार्थ्यांनी गणित सोडवताना कुठल्याही प्रकारचा शॉर्टकट वापरू नये. गणितातील सर्व पायऱ्या अचूकपणे पूर्ण कराव्यात. स्टेप बाय स्टेप गणित सोडवल्यास कुठेही गुण कमी होणार नाहीत. बऱ्याचदा जेईई किंवा सीईटीची तयारी करणारे विद्यार्थी गणित सोडवताना शॉर्टकट वापरतात. तीच पद्धत बोर्डाच्या परीक्षेत वापरल्यास गुण कमी होतात. ही काळजी प्रत्येक विद्यार्थ्यानं घ्यावी, असं प्रा. काशीद सांगतात.
advertisement
जुन्या प्रश्नपत्रिका सोडवा
view commentsविद्यार्थ्यांनी पूर्वी झालेल्या प्रश्नपत्रिकांचा अभ्यास करावा. या प्रश्नपत्रिकांतील प्रश्न सोडवावेत. 3 वर्षांपूर्वीच्या प्रश्नपत्रिका आवर्जून पाहाव्यात. जवळपास 70 टक्के प्रश्नपत्रिका ही जुन्या प्रश्नपत्रिकांवर आधारित असू शकते. त्यामुळे गणिताच्या पेपरसाठी विद्यार्थ्यांनी या जुन्या प्रश्नपत्रिकांचा अभ्यास करावा. तर चांगला मार्क मिळतील, असं देखील प्राध्यापक काशीद सांगतात.
Location :
Aurangabad,Maharashtra
First Published :
February 04, 2025 8:48 PM IST
मराठी बातम्या/करिअर/
शॉर्टकट वापरू नका! अन्यथा कट होतील मार्क, बारावी गणिताच्या पेपरसाठी लक्षात ठेवा ट्रिक्स

